प्रयागराज येथील महाकुंभमध्ये रोज कोटी भाविक येत असून पवित्र संगम स्थानावर स्नान करीत आहेत. या प्रयागराजमध्ये देशविदेशातील भाविक जसे मोठ्या संख्येनं येत आहेत, तसेच या महाकुंभमधील साधूंची संख्याही मोठी आहे. 13 आखाड्यातील साधूंसह अन्य साधूंचीही संख्या मोठी आहे. या साधूंचे जीवन बघण्यासाठीही मोठ्या संख्येनं भाविक या महाकुंभमध्ये येत आहेत. त्यातील अनेक साधू त्यांच्या साधनेनं आणि वेषभुषेमुळे प्रसिद्ध होत आहेत. या महाकुंभमध्ये मस्क्युलर बाबा आणि एमटेक बाबा हे आता प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. गेल्या महिन्याभरात सात फूट उंचीचे, हातावर रुद्राक्षाच्या माळा लावलेले, अंगावर भगवे वस्त्र असलेल्या एका साधुंचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या साधुंची तुलना काहींनी भगवान परशुरामांबरोबरही केली. पिळदार शरीरवृष्टी असलेल्या या साधुंना मस्क्युलर बाबा असे नावही देण्यात आले आहे. या बाबांना महाकुंभमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.(Prayagraj)
या बाबांचे नाव आत्माप्रेमगिरी असे आहे. महाकुंभच्या निमित्तानं ते भारतात आले असून गेली 30 वर्ष आत्माप्रेमगिरी महाराज नेपाळमध्येच रहात आहेत. अर्थात ते नेपाळचेही रहीवासी नाहीत. तर ते जन्मानं रशियान आहेत. रशियामध्ये रहात असतांनाच त्यांचा ओढा सनातन धर्माकडे लागला. त्यानंतर त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करत सनातन धर्मासाठी आपले जीवन समर्पित केले. रशियामध्ये ते शिक्षक म्हणून काम करत होते. आता आत्माप्रेमगिरी महाराज हे त्यांचे नाव असून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपले आयुष्य असल्याचे ते सांगतात. त्यांचे खरे नाव आत्माप्रेमगिरी असले तरी सोशल मिडियामध्ये ते मस्क्युलर बाबा म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. या मस्क्युलर बाबांचे व्यायाम करतांनाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यांच्या अंगावरील भगवी वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि चेहऱ्यावरील तेज यामुळे त्यांना भगवान परशुरामही म्हणण्यात येत आहे. नेपाळमध्ये रहाणारे हे आत्मप्रेमगिरी महाराज जुना आखाड्याचे सदस्य आहेत. (Social News)
याशिवाय महाकुंभमध्ये एका आणखा एका साधुंनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहेत. हे साधू उच्चशिक्षीत आहेत. त्यांनी एमटेक केले असून एकेकाळी त्यांना 40 लाख पगार होता. तसेच त्यांच्या हाताखाली किमान 400 कर्मचारी काम करत होते. मात्र सनातन धर्माची ओढ लागल्यामुळे या सर्वांचा त्याग करुन ते साधू झाले. आता एका साधूसारखे ते जीवन जगत आहेत आणि छोट्याश्या तंबूमध्ये रहात आहेत. या बाबांचे नाव दिगंबर कृष्णगिरी महाराज आहे. त्यांना एमटेक बाबा म्हणूनही ओळखले जाते. दिगंबर कृष्णगिरी महाराज हे मोठ्या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करत होते. त्यांना 40 लाख पगार आणि अन्य सुविधाही होत्या. मात्र 2010 पासून त्यांचे या सर्वांपासून लक्ष उडाले आणि त्यांचा धार्मिक कार्यात सहभाग वाढला. त्याच वर्षी, म्हणजे, 2010 मध्ये त्यांनी आपल्या नावासह सर्व संपत्तीचा त्याग करत संन्यास घेतला. त्यांनी याआधी हरिद्वारमध्ये 10 दिवस भिक्षा मागून एक कठिण व्रत पूर्ण केले. त्यांचा जन्म बेंगळुरुमधील एका ब्राह्मण कुटुंबात झाला असून त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण उच्चशिक्षित आहेत. त्यांनी कर्नाटक विद्यापीठातून एम टेक पदवी घेतली आहे. कुटुंबात धार्मिक वातावरण असल्यामुळे त्यांचा ओढा पहिल्यापासूनच या सर्वात अधिक होता. (Prayagraj)
================
हे देखील वाचा : Mahakumbhmela महाकुंभमेळ्यासाठी जाताय मग ‘हे’ अॅप डाऊनलोड कराच
Prayagraj : महाकुंभमध्ये होतेय, नागा साधू होण्यासाठी परीक्षा
================
मात्र डेहराडूनवरुन एक दिवस परत असतांना त्यांना एक साधूंचा मोठा गट दिसला. तेव्हापासून साधू म्हणजे काय, ते कसे रहातात, त्यांची दिनचर्या कशी असते, याची माहिती त्यांनी घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर सर्व आखाड्यांची माहिती घेतली. एक दिवस हरिद्वार गाठले, आणि त्यांच्याजवळील सर्व वस्तूंचे, पैशाचे दान केले. तिथे गंगेत स्नान केल्यापासून त्यांनी भगवी वस्त्र परिधान केली आणि गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घातल्या. त्यानंतर हरिद्वारमध्येच 10 दिवस भिक्षा मागून ध्यानधारणा केली. मग त्यांनी निरंजन आखाड्यामध्ये प्रवेश केला. महंत श्री राम रतन गिरी महाराजांकडून दीक्षा घेत, दिगंबर कृष्णगिरी महाराज हे नाव धारण केले. सध्या दिगंबर कृष्णगिरी महाराज हे उत्तरकाशीतील एका छोट्या गावात रहात असून सनातन धर्माचा प्रचार, प्रसार करीत आहेत. (Social News)
सई बने