बाकरवडीचं नाव जरी काढलं तरी लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतंच. अगदी सर्वसामान्यांपासून ते high-five लोकांच्या घरात बाकरवडी पाहायला मिळते आणि दुपारच्या चहा सोबत जर बाकरवडी असेल तर मग अगदी मन भरून पावत. अहाहा.. मला तर हे तुम्हाला सांगताना देखील तोंडाला पाणी सुटतंय. त्यामुळे बाकरवडी हा विषय प्रत्येकाच्या अगदी जिव्हाळ्याचाच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यात ती बाकरवडी चितळ्यांची असेल तर मग विषयच संपला. मुळात बाकरवडी म्हंटलं की चितळेच प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर येतात. पुण्यात दुपारी दुकान उघडताच सर्व बाकरवड्या ह्या ३ ते ४ तासात संपून जातात. त्यामुळे या बाकरवडीचा fan following किती मोठा आहे हे कळलंच असेल. तर गोड
-आंबट- तिखट अश्या तिरंगी चवीची जादू केलेली बाकरवडी मूळची कुठली हे तुम्हाला माहित आहे का ? या बाकरवडी चा इतिहास नेमका आहे तरी काय ? आणि ही बाकरवडी चितळे बाकरवडी म्हणून famous झाली तरी कशी ? जाणून घेऊ. (Chitale Bandhu)
बाहेरून पुण्याला भेट द्यायला येणाऱ्या प्रत्येक माणसाचा प्रोग्रॅम हा ठरलेला असतो. तो म्हणजे मस्तपैकी शनिवारवाड्याला भेट देण, तुळशी बागेत- लक्ष्मीरोडला शॉपिंग या सगळ्या धामधुमीमध्ये पुण्यात जाऊन एक गोष्ट न चुकता करणे ती म्हणजे चितळे बंधू मिठाईवाल्यांच्या दुकानात रांग लावून उभं राहून बाकरवडी विकत घेणे. परंतु मंडळी तुम्हाला चितळे हा ब्रँड कसा तयार झाला हे तुम्हाला माहित आहे का ? तर पुण्यातील प्रसिद्द चितळे बंधू हे एका महामारीमुळे अस्तित्वात आलं असं म्हंटलं जात. चितळे या ब्रँडची सुरुवात भास्कर गणेश चितळे (Bhaskar Ganesh Chitale) यांनी १९३९ साली साताऱ्यात “चितळे डेरी” या नावाने सुरु केला. भास्कर गणेश चितळे यांना बाबासाहेब म्हणून देखील ओळखल जायच. आज सातासमुद्रापार पोहचलेला हा चितळे ब्रँडचे प्रमुख बाबासाहेब चितळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातल्या लिंबगोवा या खेड्यातले. त्यांचा मूळ व्यवसाय हा दुधाचा होता. त्यामुळे त्यांच्याकडे ६०० म्हशी होत्या आणि ह्या म्हशीचं दूध पुण्यात (Pune) ते विकायचे. परंतु त्याच वेळी आलेल्या काही साथीच्या रोगामुळे त्यांचा हा सुरळीत चालेल व्यवसाय ठप्प झाला. (Marathi News)

परंतु १९३० साली त्यांनी एक उपक्रम सुरु केला होता पण दुर्दैवाने त्यात त्यांना अपयश आलं. परंतु या आलेल्या अपयशामुळे डगमगून न जाता
ते पुन्हा उभे राहिले व व्यवसाय सुरु केला. श्रीखंड, दही असे दुधापासून बनलेल्या पदार्थांमुळे चितळे ब्रँड लगेच आठवतो. पुढे त्यांनी maintain केलेल्या quality मुळे लोकं त्यांच्या ह्या ब्रँडला भरभरून प्रतिसाद देऊ लागले. त्यानंतर रघुनाथ चितळे व नरसिंह चितळे ह्या दोन बंधूंनी (Chitale Bandhu) ह्या ब्रँडची पहिली branch “चितळे बंधू मिठाईवाले “ या नावाने १९५० साली पुण्यात सुरु केली. आणि बघता बघता हा ब्रँड पुण्यात इतका लोकप्रिय झाला की लोकांना काही आणायचं असेल की चितळेच आठवतात. जसं पुण्यातील पुणेरी पाट्या फेमस आहेत; तसंच चितळे बाकरवडी दिसली की तुम्ही पुण्याचे वाटतं… ? हा प्रश्न हमखास विचारलाच जातो. हा ब्रँड आता तेथे राहणाऱ्या लोकांची ओळखच बनलीये असं म्हणायला हरकत नाही. (Chitale Bandhu)
पण तुम्हाला हे माहित आहे का ? ही खुसखुशीत, खमंग ,चटकेदार अशी बाकरवडी नेमकी आहे कुठची ? आणि तुम्हाला हाही प्रश्न पडला असेलच बाकरवडी हा शब्द आला तरी कुठून ? गुजरात मध्ये “भाकरवडी” म्हणून अधिक लोकप्रिय असलेला पदार्थ पुढे महाराष्ट्रात “बाकरवडी ” या नावाने लोकप्रिय झाला. हा नाश्ता मूळचा गुजरातचा आहे परंतु या पदार्थाला महाराष्ट्रात आल्यावर अधिक लोकप्रियता मिळाली. १९७० मध्ये “रघुनाथ चितळे” हे गुजरातच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी तिथे असलेलं “जगदीश फरसाण” च्या त्या बाकरवाडीन त्यांचं लक्ष्य वेधून घेतलं. गुजरातची ही बाकरवडी जरी चवीला गोड असली तरी त्यातल्या मसाल्यांच्या कॉम्बिनेशनमुळे त्यांच्या डोक्यात गुजरातची ही बाकरवडी पक्की बसली. तसाच काहीस नरसिंह चितळे यांच्या बाबतीतही झालं गुजरात मधून आलेली ही बाकरवडी आधीच महाराष्ट्रात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध होतीच त्यातच एकदा आणि शेजाऱ्याने बनवलेला लोकप्रिय गुजराती नाश्ता बाकरवडी नरसिंह चितळे यांनी चाखला या पदार्थात फरक इतकाच होता कि त्यांनी केलेला हा पदार्थ नागपुरी प्रकारचा केला होता. “पुडाची वडी “ प्रसिद्ध असलेला हा नागपुरी पदार्थ त्यांच्यादेखील पसंतीस पडला आणि ही पुडाची वडी आणि गुजराती बाकरवडीचा आकार एकत्र चितळे बाकरवडी हा पदार्थ तयार झाला. अखेर १९७० सालीच “चितळे बंधू “ ह्या ब्रँड न बाकरवडी विकण्यास सुरवात केली. (Marathi News)
===============
हे देखील वाचा : करोडपती भिकारी जे कमावतात सामान्यांपेक्षा जास्त!
===============
१९८९ मध्ये वाढत्या मागणीमुळे यूरोपच्या जर्मनी आणि हॉलंड मधून बाकरवडी बनवण्यासाठी खास डिझाईन केले गेले आणि ते भारतात मागवण्यात आले. ह्या टेकनॉलॉजिच्या साथीमुळे ९० च्या दशकात चितळे बंधूंचा बाकरवडीचा खप हा ३०० हुन अधिक वाढलेला होता. बाकरवडी ही मुळात आली गुजरतमधून परंतु तिला राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर चविष्ट आणि प्रसिद्द करण्याचं काम केलं ते चितळे ब्रँड ने. वाढत्या मागणीने त्या काळी रघुनाथ चितळे यांनी मुंबईमधील प्रभादेवी सोबतच मध्यप्रदेश, गुजरात ,आंध्रप्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी BRANCHES सुरु केल्या. त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी BRANCHES असणं ही खूप आगळीवेगळी गोष्ट मानली जायची आणि हे त्याकाळी चितळे ब्रँड ने करूनही दाखवलं. तसंच ह्या ब्रँड ने ही घोडदौड इथेच मर्यादित न ठेवता आज सिंगापुर, अमेरिका या परदेशी देशांमध्ये देखील त्यांच्या शाखा व बाकरवडी प्रेम भारताप्रमाणे तसच पाहायला मिळत. (Chitale Bandhu)
ह्यावरून एक नक्कीच लक्षात येत की १९३० पासून सुरु झालेला “चितळे डेरी” व्यवसाय बुडण्यापासून ते “चितळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रिस” हा भलामोठा प्रवास ,संघर्ष वाखाणयाजोग आहे. तसाच ह्या मोठ्या साम्राज्यात उभ्या असलेल्या ह्या चार पिढ्या त्यांची मेहनत आज सफल झाली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. “बाकरवडी” ही तर आज चितळे बंधूंची ओळखच बनली असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे बाकरवडी म्हंटल की चितळे हे समीकरण प्रत्येकाच्या हृदयात अगदी घट्ट बसलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही .. नाही का ?
