प्रयागराजमध्ये होणा-या महाकुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येऊ लागले आहेत. 12 वर्षातून होणा-या या सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यासाठी करोडो भाविक आले तरी या कुंभमेळ्याचे प्रमुख आकर्षण असते ते तेथील आखाडे आणि आखाड्यातील साधू-संत. या प्रत्येक आखाड्याचे वैशिष्टय आहे. या सर्व आखाड्यामध्ये अयोध्येतील दिगंबर आखाडा हा सर्वात मोठा आखाडा म्हणून ओळखला जातो. वैष्णव पंथाचा सर्वात मोठा आखाडा असलेल्या दिगंबर आखाड्याचा धार्मिक ध्वज पाच रंगांचा आहे. अन्य 13 आखाड्यांमध्ये नागा साधू असतात. पण या दिंगबर आखाड्यात नागा साधू नसतात, येथील सर्वच साधू हे विशेष अंगरखा घालतात आणि अंगावर धोतर गुंडाळतात. 13 जानेवारी 2025 पासून प्रयागराज येथे हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव साजरा होणार आहे. या महाकुंभमेळ्यासाठी हिंदू धर्मातील सर्वच 14 आखाड्यांची तयारी सुरु झाली आहे. या सर्वात अयोध्या येथील दिगंबर आखाडाही भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजमध्ये दिगंबर आखाड्याचा भव्य मंडप उभारण्यात येत असून आता 26 फेब्रुवारीपर्यंत या आखाड्यातर्फे हजारो भाविकांसाठी भोजनरुपी प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. या दिगंबर आखाड्याचे साधू-संतही मोठे असून त्यांच्यासाठीचे भोजन हे वेगळे असून त्याचीही तयारी चालू झाली आहे. कपाळावर उभे त्रिपुंड टिळक लावणारे हे दिगंबर आखाड्याचे साधू आता प्रयागराजमध्ये दिसू लागले आहेत. (Maha Kumbh Mela)
दिगंबर आखाड्यातील साधू त्यांच्या गळ्यात हार घालतात. तसेच जाड पांढरे कपडे अंगावर घेतात आणि सांडव्याच्या चिमटाही त्यांच्या हातात असतो. वैष्णव संप्रदायातील तीन आखाड्यांमध्ये दिगंबर आखाडा सर्वात मोठा आखाडा मानला जातो. दिगंबरा आखाड्याचे साधू नागा साधू म्हणून ओळखले जात नाहीत. या आखाड्यातील साधू अंगावर विशेष अंगरखा आणि धोतर परिधान करतात. दिगंबर आखाड्याचा धार्मिक ध्वज पाच रंगांनी सजलेला असतो. त्यावर प्रभू रामांचे परमभक्त श्री हनुमान विराजमान असतात. दिगंबर आखाड्यात देशभरात 450 हून अधिक मठ आणि मंदिरे आहेत. यात दिगंबर आखाड्याचे साधू राहतात आणि ध्यान धारणा आणि त्यांच्या शस्त्रांस्त्रामध्ये पारंगत होतात. दिगंबर आखाड्याची स्थापना 500 वर्षापूर्वी झाल्याची माहिती आहे. या आखाड्याचे मुळ अयोध्येत आहेत. सध्या या आखाड्यात दोन लाखांहून अधिक वैष्णव साधु-संत उपस्थित आहेत. हे सर्व साधुसंत वेगवेगळ्या आश्रमात राहून आपली नित्यसाधना करतात. मात्र त्यांच्यासाठी महाकुंभमेळा हा सर्वांना एकत्र भेटण्याचे स्थान असते. (Social News)
आखाड्यातील अनेक साधू ही अतिशय दुर्गम स्थानाताली आश्रमात राहतात. तिथे संपर्काची कुठलिही साधने नसली तरी ते महाकुंभमेळ्यासाठी बरोबर हजर होतात. प्रत्येकाला ग्रहांच्या दिशेचे ज्ञान असल्यामुळे हे संत बरोबर महाकुंभमेळ्याच्या ठिकाणी आपल्या आखाड्यात दाखल होतात. हा महाकुंभमेळा या सर्वांसाठी एका गेटटुगेदरसारखा असतो. यात सर्व एकत्र येऊन आपल्या धार्मिक ज्ञानाचे आदान प्रदान करतात. दिगंबर आखाड्यातही निवडणुका होतात, हे विशेष. श्री महंत असे या आखाड्याच्या सर्वोच्च पदाचे नाव आहे. श्री महंत पदासाठी दर 12 वर्षांनी महाकुंभाच्या वेळी निवडणूक घेतली जाते. दिगंबर आखाड्याशी संबंधित अनेक उप आखाडे देखील आहेत. खाकी आखाडा, हरिव्यासी आखाडा, संतोषी आखाडा, निरवलंबी आखाडा, हरिव्यासी निरावलंबी आखाडा हे दिगंबर आखाड्याचे भाग आहेत. या सर्वांनाही या प्रक्रियेत सहभागी करण्यात येते. त्यामुळेच या महाकुंभमेळ्यात देशाच्या कुठल्याही कानाकोप-यात असलेले दिंगबर आखाड्याचे साधु कुठल्याही आमंत्रणाशिवाय प्रयागराजला हजर होतात. (Maha Kumbh Mela)
========
हे देखील वाचा : महाकुंभमेळ्यात महिलांना रोजगार !
========
महाकुंभमेळ्याची सुरुवात झाल्यावर पहिल्या शाही स्नानाला हे सर्व दिगंबरी साधू एकत्र, मोठ्या जल्लोशानं जातात. सध्या या आखाड्याचे प्रमुख कृष्णदास महाराज आहेत. चित्रकूट, अयोध्या, नाशिक, वृंदावन, जगन्नाथपुरी आणि उज्जैन येथे प्रत्येकी एक स्थानिक श्री महंत आहेत. आखाड्याकडे स्वतःची मोठी शेतजमिन आहे. त्यावरच संत आणि तपस्वी यांच्यासाठी भोजन, प्रसाद, फळे, आदींची व्यवस्था केली जाते. महाकुंभमेळा आणि गुजरातच्या जुनागढमधील गिरनार येथे होणारा महाशिवरात्रीचा मेळा यासाठी हे सर्व साधू एकत्र येतात आणि नंतर पुन्हा आपापल्या आराधनास्थळी जातात. (Social News)
सई बने