अवघ्या काही दिवसांत बाप्पाचे आगमन होणार आहे. वर्षभर ज्या बाप्पाच्या आगमनाची आपण आतुरतेने आणि चातकासारखी वाट बघत असतो अखेर तो बाप्पा आता येणार आहे. आपल्या घरी विराजमान होत आपल्या पाहुणचार स्वीकारणार आहे. त्यासाठी आपण तयारी देखील सुरु केली आहे. बाप्पाला कुठे बसवायचे?, काय सजावट करायची?, प्रसादाला काय काय ठेवायचे? आदी अनेक गोष्टींवर सध्या घरांघरांमध्ये चर्चा सुरु आहे.
मात्र यासोबतच पूजेची तयारी देखील सुरु आहे. पूजेसाठी लागणारे सामान आणण्यापासून ते बाप्पाच्या मूर्तीपर्यंत सर्वच गोष्टी आता अगदी घाईघाई मध्ये होताना दिसत आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का? तुम्ही ज्या बाप्पाला अगदी मनोभावे घरी आणतात, त्याची विशिष्ट दिवस भक्तिपूर्वक पूजा करतात, त्याच बाप्पाच्या पूजेमध्ये काही चूक झाली तर त्या पूजेचे आपल्याला फळ मिळत नाही. त्यासाठी बाप्पाची पूजा करताना?, पूजेची तयारी करताना हा लेख नक्की वाचा. या लेखात आपण जाणून घेऊया बाप्पाची पूजा करताना कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे.
यावर्षी गणेश चतुर्थी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून १ मिनिटांनी सुरू होणार असून, ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी संपेल. उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीच्या मान्यतेनुसार गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे.
- घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी, घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी.
- गणपतीची मूर्ती उजवीकडे तोंड करून स्थापित करा आणि दररोज गंगाजलाने ते स्थान शुद्ध करा.
- गणेशाची पूजा करताना स्वच्छता आणि शुद्धतेची विशेष काळजी घ्या.
- गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे.
- त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यात गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये.
- त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी.
- दररोज सकाळ संध्याकाळ गणेशमूर्तीसमोर दिवा लावून पूजा करावी.
- गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे.
- जोपर्यंत श्रीगणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा भोजन द्यावे.
- ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल, कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत.
- आपल्या पुराणांनुसार तुळशीचा उपयोग भगवान शंकर आणि पुत्र गणेश यांच्या पूजेत केला जात नाही. असे मानले जाते की, श्रीगणेशाने तुळशीला शाप दिला होता की, तुळशीचा वापर त्याच्या पूजेत होणार नाही. त्यामुळे गणेशाच्या पूजेत तुळशीचा वापर करू नका. याउलट गणेशाच्या पूजेत दुर्वा वापरणे शुभ आणि चांगले मानले जाते.
- गणेश आणि चंद्र देव यांचे नाते चांगले मानले जात नाही. असे म्हणतात की एकदा चंद्राने गणेशाच्या गज रूपाची विटंबना केली होती, त्यामुळे गणेशाने चंद्राला शाप दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल. त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीलाही चंद्रदर्शन शास्त्रात निषिद्ध मानले जाते. या दिवशी चंद्राला पाहिले तर चोरीचा आळ येतो अशी मान्यता आहे.
======
हे देखील वाचा : देवघरात ‘या’ वस्तू ठेवल्याच पाहिजे
======
- गणपतीच्या पूजेत तुटलेला तांदूळ वापरू नये. त्याऐवजी अख्खा तांदूळ वापरा, जो कुठेही तुटलेला नाही.
- गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये केतकीचे फुले वापरली जात नाही. त्याऐवजी तुम्ही जास्वंद वापरा.
- गणेशाच्या पूजेत शिळी किंवा सुकलेली फुले वापरू नका. जर तुमच्याकडे ताजी फुले नसतील तर तुम्ही फक्त दुर्वा अर्पण करू शकता.
- गणपतीच्या मूर्ती जवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये. कारण चामडं जनावरांपासून बनला असतो. म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट, जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे.