Home » आयुष्यातील समस्यांपासून मुक्त होण्यासाठी बंगळुरुतील या मंदिरात भाविकांची होते मोठी गर्दी

आयुष्यातील समस्यांपासून मुक्त होण्यासाठी बंगळुरुतील या मंदिरात भाविकांची होते मोठी गर्दी

बंगळुरुमध्ये असे एक मंदिर आहे जेथे आयुष्यातील सर्व दु:ख होतात असे मानले जाते. या मंदिराचा इतिहास 1 हजार वर्ष जुना आहे.

by Team Gajawaja
0 comment
Bengaluru Temple
Share

Bengaluru Temple : बंगळुरुमध्ये असे एक मंदिर आहे जेथे आयुष्यातील सर्व दु:ख होतात असे मानले जाते. या मंदिराचा इतिहास 1 हजार वर्ष जुना आहे. हे मंदिर चोल राजवंशाद्वारे उभारण्यात आले होते. या मंदिरात दररोज भक्तांची दर्शनासाठी फार मोठी गर्दी होते. खरंतर, मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविक येतात.

भगवान शंकरांच्या मंदिरात भक्त दररोज सोमवारी फार मोठी गर्दी करतात. जर तुम्हाला या ऐतिहासिक मंदिरात दर्शन घ्यायचे असल्यास ही माहिती फार महत्वाची आहे.

मुक्ती नाथेश्वर मंदिराची खासियत
मुक्ती नाथेश्वर मंदिर बंगळुरुतील कंक्रीट जंगलात आहे. भगवान शंकराला समर्पित असणाऱ्या या मंदिरात दर्शनासाठी भाविक फार मोठी गर्दी करतात. येथे पोहोचण्यासाठी गुगल मॅपचाही वापर करू शकता. खरंतर, मंदिर आकाराने लहान आहे. पण मंदिरातील चमत्कार फार मोठे मानले जातात. या मंदिरात भाविकांची मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. मंदिराच्या छतावर शिव-शक्तीची नक्षीकाम केलेले पहायला मिळते.

मंदिराची खासियत
-मंदिरात विशाल आकाराचा नंदी आहे.
-भाविक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शंकराकडे पाहून नंदीच्या कानात आपली इच्छा बोलावी लागते.
-भाविक असे मानतात नंदीच्या कानात बोललेली इच्छा भगवान शंकरांपर्यंत पोहोचली जाते.
-मंदिराचे दरवाजे फार सुंदर पद्धतीने सजवण्यात आले आहेत. याशिवाय मंदिराच्या भिंतीवर नक्षीकामही करण्यात आले आहे.
-बंगळुरुत फिरण्यासाठी एक उत्तम ठिकाणही हे मंदिर आहे. (Bengaluru Temple)

मुक्ती नाथेश्वर मंदिरापर्यंत कसे पोहोचाल?
-मंदिर 60 किमी दूर नेलमंगला तालुक्यात बिन्नमंगला येथे आहे. NH4 च्या मार्गाने तुम्ही मंदिरात पोहोचू शकतात.
-मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ एक तासांचा कालावधी लागतो.
-मंदिराची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून ते 8.30 वाजल्यापर्यंत मंदिर खुले राहते.


आणखी वाचा :
जगन्नाथ मंदिरातील रत्न भंडारा खुला होणार
कामाख्या देवीचं मंदिर म्हणजे एक शक्तीपीठ !

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.