Tech Tips : स्मार्टफोन जुना झाल्यानंतर त्याचा परफॉर्मेन्स स्लो होतो. याशिवाय फोन वारंवार हँग होण्याची समस्या निर्माण होते. यामुळे तुम्ही त्रस्त आहात का? याबद्दलच्या काही टिप्स जाणून घेऊया. याआधी हे समजून गरजेचे आहे की, अखेर फोनमध्ये नक्की काय समस्या आहे. ज्यामुळे डिवाइस वारंवार हँग होतोय. यामागे पाच कारणे असू शकतात.
-तुमच्या फोनमध्ये स्टोरेज कमी असल्यास यामधील अॅप स्लो चालतात किंवा क्रॅश होतात.
-जुन्या फोनमधील अॅप जे अपडेट्स केले नसतील त्यांच्यामध्ये बग असू शकतात. याचा फोनच्या परफॉर्मेन्सवर परिणाम होऊ शकतो.
-अत्याधिक प्रमाणात अॅप बॅकग्राउंडला सुरू राहिल्यानेही फोन हँक किंवा स्लो चालतो.
-फोनच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये बग असल्यास तो हँग होऊ शकतो.
-काही प्रकरणात फोन हँग झाल्यास हार्डवेअरची समस्या उद्भवू शकते. जसे की, खराब मेमोरी अथवा बॅटरी.
फोन हँग होत असल्यास नक्की काय करावे?
फोनचा स्टोरेज क्लिअर करा
-नको असलेल्या फाइल फोनमधून हटवा.
-फोनचा स्टोरेज कमी असल्यास व्हिडीओ, फोटो किंवा दुसऱ्या मोठ्या फाइल्स क्लाऊड स्टोरेज अथव मेमोरी कार्डमध्ये ट्रान्सफर करा.
-कॅश फाइल आणि डेटा क्लिअर करा.
अॅप अपडेट्स करा
-गुगल प्ले स्टोअर सुरू करा आणि तेथे सर्व लेटेस्ट वर्जन अपडेट करा.
-जुन्या अॅपला अनइंस्टॉल करा ज्याचा तुम्ही वापर करत नाहीत.
बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले अॅप बंद करा
स्मार्टफोन हँग होत असल्यास फोनच्या बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले अॅप बंद करा. (Tech Tips)
फोन रिस्टार्ट करा
तुमचा फोन आठवड्यातून कमीतकमी एकदा रिस्टार्ट करा. असे केल्याने कॅशे डेटा आपोआप क्लिअर होतो.