Peacock Dream Interpretation : मोर एसा एक सुंदर पक्षी आहे ज्याला पाहून प्रत्येकाला आनंद होतो. काहीजण घरात मोरपंख घरात ठेवतात. खरंतर मोरपंख घरात ठेवण्यामागे धार्मिक महत्त्व आहे. खरंतर श्रीकृष्णाला मोरपंख अतिशय प्रिय आहे आणि ते आपल्या मुकुटात धारण करायचे. पण तुम्हाला माहितेय का, स्वप्नात मोर दिसण्याचा काय अर्थ होतो?
स्वप्नात मोर दिसणे
स्वप्नात मोर दिसणे उत्तम मानले जाते. वास्तू आणि ज्योतिष शास्राव्यतिरिर्त आपल्या पौराणिक कथांमध्येही भगवान श्रीकृष्ण आपल्या मुकुटावर मोराचे पंख लावायचे. खरंतर, मोर हा भगवान कार्तिकेय यांचे वाहन आहे. स्वप्नात मोर दिसणे अत्यंत शुभ मानले जाते.
स्वप्नात मोर दिसणे म्हणजे तुमच्या आयुष्यात देवी लक्ष्मी आणि विष्णूची कृपा तुमच्यावर आहे. याशिवाय तुम्हाला धनलाभ होण्याचेही हे संकेत आहेत. एखाद्या समस्येचा तुम्ही सामना करत असाल तरीही त्या दूर होणार असल्याचे संकेत आहेत. याशिवाय आयुष्यात सुंदरतेचे आगमन होणार आहे. (Peacock Dream Interpretation)
याशिवाय स्वप्नात मोर दिसण्याचा असा अर्थ होतो की, हे भव्यतेचे प्रतीक आहे. पण स्वप्न नक्की कोणत्या कारणास्तव पडले आहे देखील समजून घेणे आवश्यक आहे. म्हणजेच झोपण्याआधी तुम्ही मोर पाहिलाय का की खरंच मोर स्वप्नात आला आहे. सातत्याने मोर स्वप्नात दिसत असल्यास शुभ मानले जाते. खरंतर ज्योतिष आणि वास्तुशास्रात मोरपंख घरात ठेवण्याचे काही उपाय सांगण्यात आले आहेत.
(टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.)