Snoring Habit Remedies : हेल्दी राहण्यासाठी गरजेचे आहे की, तुम्ही रात्री पुरेशी झोप घ्यावी. याशिवाय दिवसभर धावपळ करून रात्री शांत झोप घ्यावी असे प्रत्येकाला वाटते. पण पार्टनरच्या घोरण्याच्या सवयीमुळे तुमच्या झोपेचे खोबरं होत. काहींना जोरजोरात घोरण्याची सवय असते. अशातच पार्टनरला घोरण्याच्या सवयीपासून दूर ठेवण्यासाठी पुढील काही घरगुती उपाय करू शकता.
आलं
आल्याचे सेवनाने ब्लड सर्कुलेशन उत्तम राहते. यामध्ये पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखी पोषण तत्त्वे असतात. याशिवाय तुमचे स्नायू रिलॅक्स होण्यास आल्यामुळे मदत होते. घोरण्याच्या सवयीपासून दूर राहण्यासाठी तुम्ही आल्याचा वापर करू शकता.
हळदीचे दूध
पार्टनरची घोरण्याची सवय दूर करायची असल्यास तुम्ही हळदीचे दूध त्याला देऊ शकता. यामुळे ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत राहण्यासही मदत होईल.
खजूर
रात्री झोपण्यापूर्वी खजूर खाल्ल्याने घोरण्याची समस्या दूर होऊ शकते. तुम्ही दूधासोबतही खजूर खाऊ शकता. अथवा खजूराचे मिल्कशेक देखील पिऊ शकता. (Snoring Habit Remedies)
सफरचंद खा
रात्री झोपण्याआधी सफरचंद खाल्ल्याने घोरण्याची समस्येपासून दिलासा मिळू शकतो. सफरचंदात काही पोषण तत्त्वे असतात. दररोज सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला काही आरोग्यदायी फायदेही होतात.
टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.