Money Problems Tips : घरात पैसे ठेवण्यासाठी तिजोरीचा वापर केला जातो. वास्तुशास्रात तिजोरीसंदर्भात काही नियम सांगण्यात आले आहेत. यानुसार, तिजोरीसाठी योग्य दिशा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. जेणेकरुन तुमच्या पैशांमध्ये वाढ होण्याची शक्यता अधिक वाढली जाते. याशिवाय योग्य दिशेला तिजोरी असल्यास अनावश्यक खर्च कमी होतात. जाणून घेऊयात तिजोरी योग्य दिशेला नक्की का ठेवली पाहिजे आणि यामध्ये कोणत्या वस्तू ठेवणे शुभ मानले जाते याबद्दल अधिक.
वास्तुनुसार तिजोरी कोणत्या दिशेला असावी?
वास्तुशास्रानुसार, घरात तिजोरी ठेवण्यासाठी योग्य दिशा म्हणजे घरातील दक्षिण दिशा योग्य असून त्याचा दरवाजा उत्तर दिशेला उघडणारा असावा. वास्तुशास्रानुसार, तिजोरी या दिशेला ठेवणे अत्यावश्यक असते.
तिजोरीत ठेवा या वस्तू
कुबेर यंत्र
सनातन धर्मात भगवान कुबेराला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी भगवान कुबेराची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की, कुबेराची पूजा केल्याने धनलाभ होतो. अशातच घरातील पैशांमध्येही वाढ होण्यासाठी तिजोरीत कुबेर यंत्र ठेवले पाहिजे. वास्तुशास्रानुसार, कुबेर यंत्र धन आकर्षित करते.
आरसा
वास्तुशास्रानुसार, घराच्या तिजोरीत एक लहान आरसा ठेवावा. अशी मान्यता आहे की, असे केल्याने धनामध्ये वाढ होते. याशिवाय वास्तुशास्रानुसार, तिजोरीच्या आतमध्ये उत्तर दिशेच्या भिंतीला आरसा लावणे शुभ मानले जाते. (Money Problems Tips)
चांदीचे नाणे
वास्तुशास्रानुसार, तिजोरीच्या उत्तर दिशेच्या भिंतीवर चांदीचे नाणे किंवा भिंतीवर देवी लक्ष्मीचे चित्र असावे. देवी लक्ष्मी बसलेल्या मुद्रेत असावी. जेणेकरुन धनलाभ होण्याची शक्यता अधिक वाढली जाते.
रोख रक्कम
वास्तुशास्रानुसार, घरातील तिजोरी कधीच रिकामी ठेवू नये. यामध्ये तुम्ही दागिने किंवा महत्त्वाचे कागदपत्र ठेवू शकता. याशिवाय काही रोख रक्कमही ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या बँक खात्यात कितीही रक्कम असो पण तिजोरीत थोडीतरी रोख रक्कम ठेवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.