Yellow Teeth Remedies : चेहऱ्याचे सौंदर्य कितीही राखले तरीही हसताना प्रथम तुमचे दात दिसतात. काहीजणांना आपल्या पिवळ्या दातांमुळे मोकळेपणाने हसता देखील येत नाही. अशातच दात स्वच्छ आणि पांढरे होण्यासाठी बहुतांशजण दिवसातून दोनदा ब्रशही करतात. पण तरीही दात पिवळेच राहतात.
पिवळ्या दातांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. जेणेकरुन दात स्वच्छ होण्यासह त्यावरील पिवळेपणाही निघून जाईल. जाणून घेऊया याबद्दल अधिक…..
दात पिवळे का होतात?
दात पिवळे होण्यामागे काही कारणे आहेत. काही गोष्टी खाल्ल्याने किंवा आजारपणामुळेही दात पिवळे होतात. याशिवाय वाढते वय, दातांची काळजी न घेणे, दात स्वच्छ न घासणे, धुम्रपान, चहा-कॉफीचे अत्याधिक सेवन अशी देखील दात पिवळे होण्यामागील काही कारणे आहेत.
पिवळ्या दातांसाठी घरगुती उपाय
पिवळ्या दातांसाठी तुम्ही केळ्याची साल, स्ट्रॉबेरी, राईचे तेल, पिंक सॉल्टसह कडुलिंबाच्या काडीचा वापर करू शकता. याच्या मदतीने तुम्ही पिवळे दात स्वच्छ करू शकता.
दिवसातून कितीवेळा ब्रश करावा?
पांढऱ्या आणि स्वच्छ दातांसाठी दिवसातून दोनदा ब्रश करण्याचा सल्ला दिला जातो. पहिल्यांदा ब्रश सकाळी उठल्यानंतर आणि त्यानंतर रात्री झोपण्याआधी करावा. (Yellow Teeth Remedies)
अशा पद्धतीने करा ब्रश
डेंटल एक्सपर्ट्स सांगतात की, आपण कमीत कमी दोन मिनिटांपर्यंत ब्रश करावा. ब्रश करताना दातांवर दबाव टाकू नये. दातांच्या हिरड्या व्यवस्थितीत स्वच्छ कराव्यात. जेणेकरुन तोंडात जमा झालेला बॅक्टेरिया स्वच्छ होण्यास मदत होईल. (Yellow Teeth Remedies)
याशिवाय बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये हाइड्रोजन पॅराऑक्साडस मिक्स करा. याच्या पेस्टने दात ब्रश केल्यास दातांवर जमा झालेला प्लाक आणि बॅक्टेरिया दूर होईल आणि दात चमकतील. खरंतर ही पेस्ट पाण्याने धुवावी.
(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)
आणखी वाचा :