आज सगळीकडे ख्रिसमसचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ख्रिश्चन लोकांचा सण असलेल्या ख्रिसमसला भारतातही मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाते. यादिवशी ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये जाऊन प्रेयर अर्थात प्रार्थना करतात. भारतात देखील मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन बांधव आहेत. त्यामुळे इथे देखील अनेक सुंदर सुंदर चर्च आहेत. आता चर्च म्हटले की आपल्याला लगेच डोक्यात विचार येतो तो गोव्याचा. गोव्यामध्ये अतिशय सुंदर आणि आकर्षक, जुने चर्च आहेत. मुख्य बाब म्हणजे या सर्व चर्चला अतिशय जुना आणि रंजक इतिहास आहे. मात्र गोव्यासोबतच भारतात इतरही ठिकाणी खूपच सुंदर चर्च आहेत. आज ख्रिसमसच्या निमित्ताने आपण त्याबद्दलच जाणून घेऊया. (Christmas 2025)
ख्रिस्त चर्च, शिमला
‘हिल्स क्वीन’ शिमलाच्या रिज मैदानावर हे ऐतिहासिक ख्रिस्त चर्च आहे. १८५७ मध्ये बनवलेले हे उत्तर भारतातील दुसरे सर्वात प्राचीन चर्च आहे, ज्याचे सौंदर्य आजही बऱ्याच लोकांना आकर्षित करते. हे चर्च निओ-गॉथिक स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे. आकर्षक वास्तुकला, शांत आणि ऐतिहासिक ठिकाण असलेल्या या चर्चला सर्वच पर्यटक भेट देतात. (Marathi News)

सेंट अँड्र्यूज बेसिलिका अर्थुनकल चर्च, अल्लेप्पी
सेंट अँड्र्यूज बेसिलिका, ज्याला अर्थुनकल चर्च म्हणूनही ओळखले जाते. हे चर्च अलेप्पी, केरळमधील एक प्रसिद्ध आणि सुंदर ऐतिहासिक चर्च आहे, जे पोर्तुगीज मिशनऱ्यांनी १६ व्या शतकात बांधले होते हे चर्च सेंट सेबेस्टियनला समर्पित आहे. या चर्चचे बांधकाम हे पोर्तुगीज आणि स्थानिक केरळ स्थापत्यकलेचे सुंदर मिश्रण आहे आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. हे चर्च दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर चर्च आहे. (Todays Marathi Headline)

वेलंकन्नी चर्च, तामिळनाडू
या चर्चला ‘बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ गुड हेल्थ’ म्हणून ही ओळखले जाते. हे चर्च १६ व्या शतकात बनवले गेले आहे. हे चर्च तामिळनाडूतील नागापट्टिनम जिल्ह्यात असलेले एक प्रसिद्ध कॅथोलिक चर्च आहे. हे चर्च ‘लेडी ऑफ गुड हेल्थ’ म्हणून ओळखले जाते आणि जगभरातील ख्रिश्चन भाविकांसाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, जेथे दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठा वार्षिक उत्सव साजरा होतो आणि हजारो लोक ‘माता मारिया’च्या दर्शनासाठी येतात. (Top Marathi News)

सांताक्रूझ बॅसिलिका चर्च, कोची
कोचीमधील सांताक्रूझ बॅसिलिका चर्च हे एक ऐतिहासिक कॅथोलिक चर्च आहे. जे त्याच्या उत्कृष्ट स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे. हे चर्च फोर्ट कोचीमध्ये आहे आणि पोर्तुगीजांनी बांधलेल्या भारतातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. हे चर्च त्याच्या गोथिक स्थापत्यशास्त्र, सुंदर भिंतीचित्रे आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे, जेथे लिओनार्डो दा विंचीच्या ‘द लास्ट सपर’ ची प्रतिकृती देखील आहे. (Top Stories)

मेरीची हेल्प ऑफ ख्रिश्चन कॅथेड्रल चर्च, कोहिमा
कोहिमा येथील मेरीची हेल्प ख्रिश्चन कॅथेड्रल चर्च हे एक महत्त्वाचे कॅथोलिक चर्च आहे, जे त्याच्या अनोख्या नागा-शैलीतील वास्तुकला, लाकडी कोरीव येशूच्या मोठ्या १६ फूट उंच मूर्तीसाठी ओळखले जाते. दुसऱ्या महायुद्धातील जपानी आणि ब्रिटिश सैनिकांमधील सलोख्याच्या बैठकींसाठी सुद्धा हे चर्च प्रसिद्ध आहे, जे शांतता आणि प्रार्थनेचे केंद्र म्हणून हे चर्च ओळखले जाते. हे चर्च कोहिमाच्या बिशपचे मुख्य चर्च आहे आणि बिशपच्या ‘कॅथेड्रा’ (खुर्ची) मुळे याला कॅथेड्रल म्हणतात. (Latest Marathi Headline)

सेंट पॉल कॅथेड्रल चर्च, कोलकाता
कोलकात्यामधील हे आकर्षक चर्च ब्रिटिशांनी इंडो-गॉथिक शैलीमध्ये बनवले होते आणि आशिया खंडातील हे पहिली एपिस्कोपेलियन चर्च देखील आहे. कोलकातामधील सेंट पॉल कॅथेड्रल हे इंडो-गॉथिक शैलीतील एक भव्य चर्च आहे. हे चर्च भव्य वास्तुकला, सुंदर काचेच्या खिडक्या आणि उंच शिखर यासाठी प्रसिद्ध आहे. बिशप डॅनियल विल्सन यांनी १९व्या शतकात (१८३९ मध्ये पायाभरणी) हे बांधले होते, जे कोलकातातील एक महत्त्वाचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ आहे. (Top Trending News)

=======
Santa Claus : ख्रिसमसच्या दिवशी लहान मुलांमध्ये गिफ्ट्स वाटणारा सांताक्लॉज नेमका आहे तरी कोण?
SantaClaus : ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज लाल रंगाचेच कपडे का घालतो?
Christmas : ख्रिसमस अँथम असणाऱ्या ‘जिंगल बेल्स’ गाण्याची इंटरेस्टिंग गोष्ट
=======
बॅसिलिका ऑफ बॉम जीसस, गोवा
हे चर्च बारोक आर्किटेक्चरचे एक सुंदर उदाहरण आहे. ४०० वर्षांहून अधिक जुन्या या चर्चला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. ही बॅसिलिका पोर्तुगीज भारताची माजी राजधानी असलेल्या जुन्या गोव्यात स्थित आहे आणि येथे सेंट फ्रान्सिस झेवियरचे पार्थिव अवशेष आहेत. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
