One Day Trip Tips : जेव्हा कधी एखाद्या ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करत असाल तेव्हा मनात विविध प्रश्न निर्माण होतात. जसे की, पॅकिंग कसे करावे, काय सोबत घेऊन जावे. काही लोक प्लॅन बनवल्यानंतर लगेच पॅकिंग करण्यास सुरूवात करतात. कितीही व्यवस्थितीत पॅकिंग केले तरीही काही ना काही गोष्टी आपण बॅगेत भरणे विसरतोच. यावेळी स्मार्ट पद्धतीने पॅकिंग करणे अत्यंत गरजेचे असते.
बॅग पॅकिंग करताना अशा काही गोष्टी बॅगेत भराव्यात ज्या खरंच गरजेच्या आहेत. सर्वप्रथम म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी जात आहात हे लक्षात घेऊन त्यानुसार बॅग पॅकिंग करावे. अशातच एका दिवसासाठी तुम्ही फिरायला जात असल्यास बॅगेत कोणत्या वस्तू असाव्यात याबद्दल जाणून घेऊया अधिक….
-स्नॅक्स आणि पाण्याची बॉटल
तुम्ही एका दिवसाच्या ट्रिपसाठी एखाद्या ठिकाणी जात असल्यास सोबत काही स्नॅक्स आणि पाण्याची बॉटल जरूर ठेवा. याशिवाय बॅगेत एखादी ज्युसची बॉटलही ठेवू शकता. यामुळे प्रवासादरम्यान तुम्हाला भूक लागल्यास तुम्ही ते खाऊ शखता.
-मेकअप प्रोडक्ट्स
कोणत्याही ठिकाणी जाताना आपले मेकअप प्रोडक्ट्ससोबत ठेवा. मेकअप प्रोडक्ट्ससाठी लहान बॉक्स तयार करा. यावेळी देखील जे गरजेचे मेकअप प्रोडक्ट्स आहेत तेच बॅगेत भरा. अन्यथा बॅगेचे वजन वाढले जाऊ शकते.
-मोबाइल चार्जर
एका दिवसासाठी भले बाहेर फिरायला जाताय तरीही सोबत मोबाइल चार्जर नक्की ठेवा. जरी फोनची बॅटरी कमी झाल्यास तुम्ही तो चार्ज करू शकता. याशिवाय सोबत लॅपटॉप, कॅमेरा अशा काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्यास त्याचेही चार्जर घेण्यास विसरू नका. (One Day Trip Tips)
-कपडे
फिरायला जाताना स्टाइलिश दिसण्यासाठी काही कपडे नक्कीच बॅगेत भरा. पण नक्की कोणत्या ठिकाणी जाताय त्यानुसार कपड्यांची निवड करा. जर हिवाळ्यात एखाद्या ठिकाणी फिरायला जाताय तर उबदार कपडे जरूर ठेवा.