Home » शरीराला डिटॉक्स करण्यासाठी खास टिप्स

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी खास टिप्स

आपल्या सर्वांनाच हेल्दी रहायचे असते. मात्र अज्ञातपणे आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपले आरोग्य बिघडले जाते. हेल्दी राहण्यासाठी शरीराला डिटॉक्स करणे अत्यंत गरजेचे असते.

by Team Gajawaja
0 comment
body detox tips
Share

आपल्या सर्वांनाच हेल्दी रहायचे असते. मात्र अज्ञातपणे आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपले आरोग्य बिघडले जाते. हेल्दी राहण्यासाठी शरीराला डिटॉक्स करणे अत्यंत गरजेचे असते. जेव्हा शरीरात टॉक्सिन्स जमा होऊ लागतात तेव्हा त्याचा थेट परिणाम हा शरीराच्या संचलनावर होतो. यामुळे शरीरातील महत्त्वाचे फंक्शन्स प्रभावित होऊ लागतात. शरीरात टॉक्सिन्स जमा झाल्यास बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच पोट बिघडणे, थकवा जाणवणे, डोळ्यांखाली सूज येणे अशा समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. अशा प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळीच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून डिटॉक्स करणे गरजेचे आहे. त्यामुळे एक्सर्ट्सचे पुढील काही सल्ले जरुर पाहू शकता. (body detox tips)

डाएटमध्ये प्रोबायोटिक्सचा समावेश करा
हेल्दी राहण्यासाठी डाएटमध्ये प्रोबायोटिक्सचा समावेश केला पाहिजे. यामुळे गट हेल्थ उत्तम राहते. आपल्या गटात काही गुड बॅक्टेरिया असतात त्यामुळे पचनक्रिया सुधारली जाते. या गुड बॅक्टेरियाचे प्रमाण कमी झाल्यास गट हेल्थ बिघडते. यामुळे गॅस, ब्लोटिंग, अपचन आणि अॅसिडिटी होऊ शकते. गट हेल्थ बिघडल्याने शरीरात टॉक्सिन्स जमा होऊ लागतात. त्यामुळे डाएटमध्ये दही आणि फर्मेंटेड फूड्सचा समावेश करावा.

दिवसभरात एकदा तरी लिंबू पाणी प्या
लिंबू शरीराला डिटॉक्स करण्यास उत्तम मानला जातो. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ऐवढेच नव्हे तर शरीरातील टॉक्सिन्स दूर करण्यासही मदत होते. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट होते. त्यामुळे दिवसभरातून एकदा तरी लिंबू पाण्याचे सेवन करावे.

एकापेक्षा अधिकवेळा कॅफेनचे सेवन करणे टाळा
चहा आणि कॉफी अधिक प्रमाणात प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते. यामुळे दिवसभरातून एकदाच चहा-कॉफीचे सेवन करावे. उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिणे टाळावे. यामुळे पचनासंबंधित समस्या वाढू शकता. तर संध्याकाळनंतर कॅफेन घेतल्यास स्लीप साइकलवर परिणाम होऊ शकतो. (body detox tips)

12-14 तासांचे फास्टिंग ठेवा
आपल्या मील्सदरम्यान किती अंतर आहे याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. जेव्हा तुम्ही 12-14 तास फास्टिंग करता यामुळे शरीर स्वत:हून डिटॉक्स होते. आपले यकृत शरीराला डिटॉक्स करते. त्यामुळे रात्री जवळजवळ 7 वाजता डिनर करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7-8 वाजेपर्यंत नाश्ता करावा. यामुळे शरीरात जमा झालेले विषाक्त पदार्थ बाहेर निघण्यास वेळ मिळतो.


हेही वाचा- Bottle Gourd Juice Benefits: मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्यांसाठी गुणकारी आहे दूधी भोपळ्याचा रस !

(टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.