हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये यंदाच्या वर्षी सिंगापुरच्या पासपोर्टला सर्वाधिक पॉवरफुल असल्याचे सांगितले गेले आहे. याच्या माध्यमातून लोकांना देशातील २७७ देशांपैकी १९२ देशांमध्ये व्हिजाशिवाय प्रवास करता येणार आहे. सातत्याने ५ वर्ष टॉप पोजिशनवर राहिल्याने जापानचा पासपोर्ट तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. जपानच्या पासपोर्टच्या माध्यमातून १८९ देशांमध्ये व्हिजा-फ्री प्रवास केला जाऊ शकतो. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत भारताच्या रँकिंगमध्ये सुद्धा सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षात तो ८५ व्या स्तरावर होता. आता तो ८० व्या रँकवर पोहचला आहे. अशातच असा प्रश्न उपस्थितीत होतो की, पासपोर्टची रँकिंग कशी ठरवली जाते आणि भारताच्या रँकिंगमध्ये का सुधारणा झाली त्याबद्दल अधिक.(Henley Passport Index)
हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार, कोणत्याही देशाचा पासपोर्ट हा पॉवरफुल असणे म्हणजे याचा अर्थ असा होतो की, येथील लोक व्हिजाशिवाय सर्वाधिक देशांमध्ये प्रवास करु शकतो. जसे सिंगापुरचा पासपोर्ट सर्वाधिक पॉवरफुल असून येथील सर्वाधिक लोक सर्वाधिक १९२ देशांमध्ये व्हिजाशिवाय प्रवास करू शकतात. अशाच प्रकारे दुसऱ्या रँकवर जर्मनी, इटली आणि स्पेन आहे. या पासपोर्टच्या मदतीने १९० देशांमध्ये वीजा-फ्री प्रवास करता येऊ शकतो.
कशी ठरवली जाते पासपोर्टची रँकिंग?
पासपोर्टची रँकिंग तयार करण्याचे काम लंडन इमिग्रेशन कंसल्टेंसी हेनली अॅन्ड पार्टनर्स करते. ही एजेंसी प्रत्येक वर्षी रँकिंग जारी करते. रँकिंग कोणत्या आधारावर ठरवली जाते हे पाहूयात.
हेनली अॅन्ड पार्टनर्स कंसल्टेंसीच्या पासपोर्ट रँकिंग इंटरनॅशनल एयर ट्रांसपोर्ट एसोसिएशनकडून जारी होणाऱ्या डेटाच्या आधारावर करते. रँकिंग ठरवण्यामागे काही कारणं असतात. जसे की, एखादा देश दुसऱ्या देशातील लोकांना आपल्या येथे व्हिजाशिवाय एंन्ट्री देत असेल तर त्या देशाला १ पॉइंट दिला जातो. वीजा ऑन अरावल आणि परदेशी प्रवासासंदर्भातील काही फॅक्टर्स आणि देशांमधील आपापसातील संबंध सुद्धा यासाठी जबाबदार असतात. यावरुन ठरवले जाते की, तुमच्या देशाच्या पासपोर्टची रँकिंग मजबूत असणार की कमजोर.
या व्यतिरिक्त प्रत्येक देशाच्या व्हिजासाठी विविध गाइडलाइन्स असतात. जो देश याचे पालन करतो त्याला सहज व्हिजा मिळतो. कोणता देश त्या मागणीला पूर्ण करतो हा फॅक्टर सुद्धा इंडेक्स रँकिंगमध्ये महत्त्वाची भुमिका बजावतो.(Henley Passport Index)
भारताबद्दल बोलायचे झाल्यास तर हेनले पासपोर्ट इंडेक्सने आपल्या पासपोर्टला ८० वे रँकिंग दिले आहे. भारतीय प्रवासी जगातील ५७ देशांमध्ये व्हिजाशिवाय किंवा व्हिजा ऑन अरावलच्या माध्यमातून प्रवास करु शकतो. व्हिजा ऑन अराइवलचा अर्थ असा होतो की, कोणत्याही देशात पोहचल्यानंतर मिळणारा व्हिजा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशांसोबत असलेले भारताचे संबंध आणि वाढत्या इकोनॉमीमुळे भारताचा पासपोर्ट मजबूत असल्याचे हे एक मोठे कारण आहे.
हेही वाचा-देशातील अनोखे रेल्वे स्टेशन, 4 भाषांमध्ये प्रवाशांना दिली जाते सुचना
तर जगातील सर्वाधिक कमजोर पासपोर्ट रँकिंग असणारा देश म्हणजे अफगाणिस्तान, इराक, सीरिया, पाकिस्तान, यमन यांचा समावेश आहे. अशातच अफगाणिस्तानचा पासपोर्ट जगातील सर्वाधिक कमजोर पासपोर्ट आहे.