Home » 2700 वर्षांपूर्वी युनानमध्ये बनला होता पहिला रोबोट, असा आहे AI चा इतिहास

2700 वर्षांपूर्वी युनानमध्ये बनला होता पहिला रोबोट, असा आहे AI चा इतिहास

आता जरी आर्टिफिशियल इंटेलीजेंसवर वाद सुरु झाला असला तरीही याचा इतिहास 2700 वर्षांपूर्वीचा आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या विज्ञान इतिहासकारांनी असा दावा केला आहे की, AI आणि रोबोटची संकल्पना 2700 वर्षांपूर्वीच युनानमध्ये झाली होती.

by Team Gajawaja
0 comment
Talos
Share

आर्टिफिशियल इंटेलीजेंस म्हणजेच AI च्या वाढत्या वापराने जगभरात एक नवा वाद सुरु झाला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुद्धा एआयवर औपचारिकरित्या चर्चा झाली. यावेळी सुद्धा सदस्य देशांनी याबद्दल एकमत व्यक्त केले नाही. कोणी त्याला मानवी जीवनाला त्याचा धोका आहे तर कोणी यामुळे भविष्य बदलले जाईल असे म्हटले. (Talos)

आता जरी आर्टिफिशियल इंटेलीजेंसवर वाद सुरु झाला असला तरीही याचा इतिहास 2700 वर्षांपूर्वीचा आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या विज्ञान इतिहासकारांनी असा दावा केला आहे की, AI आणि रोबोटची संकल्पना 2700 वर्षांपूर्वीच युनानमध्ये (ग्रीस) झाली होती. त्यावेळी तो जगातील पहिला रोबोट बनवला गेला होता.

युनानमध्ये 2700 वर्षांपूर्वी एक कांस्य मानवाची निर्मिती केली होती. ब्रिटेनिकाच्या एका रिपोर्टनुसर, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधन अभ्यासक आणि विज्ञान इतिहासकार एड्रिएन मेयर यांनी दावा केला आहे की, त्या कांस्य मानवाचे नाव टॅलोस असे होते. तो बोलायचा पण व्यक्तीसारखे हावभाव करु शकत नव्हता. तो प्रत्येक असे काम करायचा जो व्यक्ती करु शकत होते.

असे म्हटले जाते री, टॅलोसची निर्मिती युनानी देवता हेफेस्टन याने केली होती. त्यांना आग आणि धातुचा देवता मानले जायते. टॅलोस व्यतिरिक्त हेफेस्टसने पेंडोरा आणि आणखी एक अन्य स्वचलित ग्रुप तयार केला होता. जे दररोजची कामे करायचे. एड्रियन मेयरने दावा केला आहे की, हेफेस्टनने जे आविष्कार केले होते ते आर्टिफिशियल इंटेलीजेंस आणि रोबोटिक्सच्या आधारावर होते. (Talos)

फार कमी लोकांना माहिती आहे की, एआयच्या आधुनिक युगाची सुरुवात दुसऱ्या महायुद्धादरम्यान झाली होती. त्यावेळी नाजी एनिग्मा कोडला तोडण्यासाठी एलन ट्यूरिंगने ट्यूरिंग टेस्ट केली होती. त्याच्या आधारावरुन हे शोधून काढायचे होते की, मशीन सुद्धा विचार करु शकते का? त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलीजेंसचे जनक मानले जाणारे जॉन मॅक्कार्थीने एआय हा शब्द तेव्हा जोडला जेव्हा त्यांनी कंप्युटर प्रोग्रामिंग भाषा एलएसआयपी तयार केली. जी आज सुद्धा एआयसाठी वापरली जाते. त्यावेळी जॉन मॅक्कार्थीने एआयला मशीन बनवण्याचे विज्ञान आणि इंजिनिअरिंगच्या रुपात त्याची व्याख्या केली होती. पहिला एआय आधारित प्रोग्राम लॉजिक थियोरिस्ट 1995-1956 मध्ये एलन नेवेल, जेसी शॉ आणि हर्बट साइमन यांनी मिळवून बनवल होता, जो गणितातील समस्या दूर करायचा.

हेही वाचा-YouTube वरुन कमावत असाल तर आधी ‘हे’ वाचा

तर 1960 आणि 1970 च्या दशकात जोसेफ वेइजेनबाम आणि एलिजा सारखे एआय कार्यक्रम सुरु झाले. ब्रिटानिकाच्या एका रिपोर्टनुसार दावा करण्यात आला की, तो असा काळ होता जेव्हा अमेरिकन शासकीय एजेंसींनी एआयच्या कार्यक्रमांना आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली होती. 1997 मध्ये जेव्हा तत्कालीन जगतील बुद्धिबळ खेळाडू गॅरी कास्परोवला आयबीएमच्या डीब्लू एआय कंप्युटर प्रोग्रामने हरवले तेव्हा संशोधांना आणखी एक मोठे यश मिळाले.हळूहळू ते दररोजच्या कामात वापरला जाऊ लागला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.