आपल्या देशात प्राचीन काळातील अनेक मंदिरे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बृददेश्वर मंदिर. हे मंदिर दक्षिण भारतात असून प्राचीन वस्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. बृहदेश्वर मंदिर तमिळनाडूतील तंजौर मध्ये असलेल्या एका हिंदू मंदिरापैंकी एक आहे जे 11 व्या दशकाच्या सुरुवातीला तयार करण्यात आले होते. जगात हे एकमेव असे मंदिर आहे जे ग्रेनाइटने तयार करण्यात आलेले आहे. आपली भव्यता, वास्तुशिल्प आणि मध्यावर असलेल्या घुमटामुळे लोक या मंदिराकडे फार आकर्षित होतात. तर जाणून घेऊयात या मंदिराच्या काही रहस्यांबद्दल अधिक. (Brihadeeswarar temple)
वास्तुकलेचा अद्भूत नमूना
मंदिराची बांधणी ही 1003-1010 ईसवीच्या दरम्यान चोल शासक प्रथम राजराज चोल यांनी केली होती. त्यांच्या नावार याला राजराजेश्वर मंदिराचे नाव दिले गेले आङे. हे मंदिर द्रविड वास्तुकलेचा एक अमूल्य ठेवा आहे. या मंदिराची वास्तू पाहून तुम्ही त्याचा मोहात पडाल. 13 मजली असलेल्या या मंदिराची उंची 66 मीटर आहे. मंदिर हे भगवान शंकराला समर्पित करण्यात आलेले आहे.
असे बनवले गेले हे मंदिर
जवळजवळ 216 फूट उंच असणाऱ्या या मंदिराला 130,000 टन ग्रेनाइटच्या दगडांनी तयार करण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, तंजौरच्या आसपास 60 किमी पर्यंत कोणताही डोंगर किंवा खडकाळ भाग सुद्धा नाही. अशातच असा प्रश्न उपस्थितीत राहतो की, ऐवढ्या जड वजनाचे दगड नेमके कोठून आणले गेले. असे सांगितले जाते की, 3 हजार हत्तींच्या मदतीने हे दगड येथे आणले गेले होते.
सिमेंट किंवा प्लास्टरचा वापर नाही
या दगडांना जोडण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सिमेंट, प्लास्टर किंवा अन्य कोणत्याही वस्तूचा वापर करण्यात आलेला नाही. केवळ दगडांना एखाद्या कोड्याप्रमाणे एकमेकांना जोडले गेले आहे. मंदिराचा मजबूत आधार सुद्धा या प्रकारे तयार करण्यात आला आहे की, हजारो वर्षानंतर सुद्धा हे मंदिर आज व्यवस्थितीत उभे आहे. (Brihadeeswarar temple)
मंदिराचा विशालकाय घुमट
मंदिराचा विशालकाय घुमट हा एक फार सुंदर आहे. तो एका विशालकाय दगडापासून तयार करण्यात आलेला आहे. त्याचे वजन 80 पेक्षा अधिक आहे. त्यावेळी जेव्हा क्रेनकिंवा लिफ्ट वगैरे नव्हती, तरीही ऐवढे विशालकाय घुमट बांधले गेले. त्याचसोबत मंदिरात एक मोठे शिवलिंग सुद्धा आहे. याच कारणास्तव त्याला बृहदेश्वर नाव दिले गेले आहे.
हेही वाचा- महाराणा कुंभाचे नीलकंठ महादेव मंदिर
विशालकाय नंदीबैल
मंदिराची आणखी एक खासियत अशी की, येथे शंकराचे वाहन समजला जाणारा नंदी बैल सुद्धा आहे. तो सुद्धा एक मोठा दगड कापून तयार करण्यात आलेला आहे. त्याची उंची 13 फूट आहे.