Success Story: मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्य नडेला यांनी जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगभरातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या सीईओ पैकी ते एक आहे. त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे पद्म भूषणे गौरवण्यात आले आहे. भारत रत्न आणि पद्म विभूषण नंतर पद्म भूषण देशातील तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार मानला जातो.
भारतवंशीय असलेल्या सत्य नडेला यांचे करियर आणि आयुष्य हे प्रत्येक तरुणाला त्याच्या आयुष्यात प्रोत्साहन देणारे आहे. नडेला यांनी पाहिलेले स्वप्न आणि ते सत्यात उतरवण्यापर्यंतचा प्रवास हा नेहमीच एखाद्याला त्यांच्याकडे आकर्षित करतो. त्यांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी यामुळेच ते आज जगातील सर्वाधिक मोठ्या टेक कंपनीचे सीईओ आहेत. अमेरिकेत ते एक प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक ओळखले जातात.
हैदराबाद मधून सुरु झाला प्रवास
नडेला यांचा जन्म १९ ऑगस्ट १९६७ रोजी हैदराबाद मध्ये झाला होता. त्यांचे वडिल १९६२ च्या बॅचचे एक आयएएस अधिकारी होते. त्यांची आई एक लेक्चरर होती. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण हैदराबाद मधून पूर्ण केले. त्यानंतर मनीपाल इंस्टीट्युट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी १९८८ मध्ये इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग केली.
त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते युएसला गेला. तेथे त्यांनी University of wisconsoon madison मधून कंप्युटर सायन्सचे शिक्षण घेतले. तसेच १९९७ मध्ये सत्य नडेला यांनी University of Chicago Booth मधून एमबीएची डिग्री घेतली.
मायक्रोसॉफ्टचा प्रवास
नेडाल दीर्घकाळ मायक्रोसॉफ्ट सोबत काम करत आहेत ते १९९२ मध्ये एक तरुण इंजिनिअरच्या रुपात कंपनीत आले होते. त्यानंतर त्यांनी कंपनीत राहून प्रगती केली आणि आज ते कंपनीचे सीईओ झाले आहेत. १९९२ मध्ये कंपनीशी जोडले गेल्यानंतर २००० मध्ये माइक्रोसॉफ्ट सेंट्रलचे उपाध्यक्ष बनले. त्यानंतर माइक्रोसॉफ्ट बिझनेस सॉल्यूशने कॉर्पोरेट उपाध्यक्ष झाले. त्यानंतर प्रगती करत ते माइक्रोसॉफ्ट ऑनलाईन सर्विसचे वरिष्ठ उपाध्यक्ष झाले. त्यांनी कंपनीत राहून फार प्रगती केली. अशाच प्रकारे ते सर्वस अॅन्ड टूल्स डिविजनचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी कंपनीला फार मोठा नफा कमावून दिला होता. (Success Story)
सत्या नडेला यांचा Success मंत्रा
एका मुलाखतीत त्यांनी आपल्या यशाचा मंत्रा सांगितला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की,काहीतरी करण्याची खुप इच्छा होती. पुढे त्यांनी म्हटले होते, जी लोक मला ओळखतात ते म्हणतात माझी ओळख ही ज्ञान आणि काहीतरी शिकण्याची आहे. मी जेवढी पुस्तक वाचतो त्याहून अधिक मी पुस्तक खरेदी करतो. ज्ञान आणि शिकण्याची भूक माझी ओळख दाखवते.
क्लाउड गुरु नावाने प्रसिद्ध
जगभरात सत्या नडेला हे क्लाउड गुरु नावाने सुद्धा ओळखले जातात. क्लाउड त्या सुविधेला म्हटले जाते जी इंटरनेटवर पूर्णपणे चालते आणि त्या संबंधित सेवा किंवा कंप्युटर फाइल्स इंटरनेटच्या माध्यमातून जगातील कोणत्याही कोपऱ्यात वापरली जाऊ शकते.
हेही वाचा- Success Story: दलित समाजातील अरबपति- राजेश सरैया
क्रिकेटची फार आवड
सत्या नडेला यांना सुरुवातीपासूनच क्रिकेट फार आवडते. ते बालपणी सुद्धा फार क्रिकेट खेळायचे. क्रिकेट व्यतिरिक्त ते सिएटल मधील एका अमेरिकन फुटबॉल टीम सीहोक्सचे मोठे फॅन आहे. तसेच आपल्या फिटनेसकडे ते अधिक लक्ष देतात. त्याचसोबत त्यांना गोड खाणे सुद्धा फार आवडते.