बहुतांश लोकांना लहान लहान गोष्टींवरुन राग येते. कधी कधी तर असे होते की, ते रागात काय बोलतायत हेच त्यांना कळत नाही. पण वारंवार राग येणे हे काही ठिक नाही. या गोष्टीमुळे तुमच्या व्यक्तीमत्वावर वाईट परिणाम होतो. त्याचसोबत तुमच्यापासून लोक चार हात लांबच राहण्याचा प्रयत्न करतात. तसेच तुमचे असे वागणे करियर ही धोक्यात आणू शकते. जर तुम्ही असे कामाच्या ठिकाणी वागलात तर तुमची इमेज इतरांच्या समोर डाउन होते हे लक्षात ठेवा. (Anger Control Tips)
सतत एखाद्या गोष्टीचा राग केल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर ही त्याचा वाईट प्रभाव होतो. तुम्ही नेहमीच दु:खी राहता. तणाव वाढतो. या सर्व गोष्टींचा एकूणच परिणाम तुमच्या कामावर होते. अशातच राग कसा नियंत्रित करायचा याच बद्दलच्या काही खास टीप्स जाणून घेऊयात.
-दुर्लक्ष करा
काही गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास शिका. काही गोष्टी मज्जा म्हणून केल्या जातात तेव्हा त्या अधिक सीरियस घेऊ नका. ही गोष्ट आपल्या आयुष्यासाठी फार महत्वाची असते. त्यामुळे अशा गोष्टी दुर्लक्षित करा. काही लोकांचे असे ही होते की, ते मुद्दाम तुम्हाला राग येईल असे काहीतरी करतात. असे होत असेल तर काहीच बोलू नका किंवा रिअॅक्ट होऊ नका.
-शेयर करा
जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा खुप राग येत असेल तर ती शेयर करा. अशा व्यक्तीसोबत शेयर करा जी तुम्हाला समजून घेते. यामुळे तुमचे मन हलके झाल्यासारखे वाटेल. अशातच तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवता ही येईल.
-समजूतदारपणाने घ्या
काही गोष्टी अशा असतात ज्या समजूतदारीने घेतल्या पाहिदेत. काही वेळेस असे होते की, आपणच योग्य आहोत असे वाटते. परंतु कारण जाणून घेतल्याशिवाय आपण कधीकधी राग करतो. अशातच गरजेचे आहे की, तुम्ही यावर बोला. गोष्टी स्पष्ट करा.
-दीर्घ श्वास घ्या
जेव्हा तुम्हाला खुप राग आला असेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या. जवळजवळ १० वेळा तुम्ही असे करा. यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. तसेच तुम्ही रागावर ही नियंत्रण मिळवू शकता. (Anger Control Tips)
हेही वाचा- उन्हाळ्यात थंड पाणी पित असाल तर थांबा, आधी हे वाचा
-दुसऱ्या गोष्टींमध्ये व्यस्त व्हा
जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्हाला आवडत असलेल्या दुसऱ्या गोष्टी करा. जसे की, तुम्ही गाणी ऐकू शकता. या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीशी बातचीत ही करु शकता. यामुळे तुम्ही राग नियंत्रित करु शकता.