इस्रोने आँध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन आंतराळ केंद्रावरुन आपले सर्वाधिक लहान रॉकेट एसएसएलवी-डी२ (SSLV-D2) लॉन्च केले आहे. याचे पूर्ण नाव स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हिकल आहे. इस्रोकडून यामध्ये अर्थ ऑब्जरवेशन सॅटेलाइट EOS-07 पाठवण्यात आले आहे. या रॉकेटचे वजन १५६.५ किलोग्रॅम आहे. इस्रोने सांगितले की प्रक्षेपणाच्या 15 दिवसांमध्ये नवीन रॉकेट एसएसएलवी-डी३ने तीन सॅटेलाइट इस्रोच्या EoS-07, अमेरिकेतील फर्म Antaris Janus-1 आणि चेन्नई येथील आंतराळ स्टार्टअप SpaceKidz च्या AzaadiSAT-2 ला ४५० किमी गोलाकार कक्षेत यशस्वीपणे स्थापित केले आहे.
इस्रोचे हे यंदाच्या वर्षातील पहिले मिशन आहे. इस्रोने असे सांगितले की, एलवी डी२ ने तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत स्थापन केले आहे. साडे सहा तासांच्या उलट मोजणीनंतर ३४ मीटर लांब रॉकेटला हे सतीश धवन आंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले. इस्रोच्या लहान उपग्रह प्रक्षेपण वाहन बाजारात यश मिळवण्यासाठी या प्रक्षेपणाकडून खुप अपेक्षा आहेत. (SSLV-D2)
गेल्या SSLV-D1 मध्ये झाली होती गडबड
गेल्या वर्षात ऑगस्ट महिन्यात इस्रोने स्मॉल सॅटेलाइट लॉन्चिंग व्हिकलचा वापर केला होता. दरम्यान, काही तांत्रिक गडबडीमुळे त्या सॅटेलाइट सोबतचा संपर्क तुटला होता. इस्रोने म्हटले होते की, हे सॅटेलाइट चुकीच्या ऑर्बिटमध्ये प्रस्थापित झाले आहेत. याच कारणास्तव ते काही कामाचे नाहीत. इस्रोने पहिल्यांदा अशा प्रकारचा प्रयत्न केला होता की, लहान सॅटेलाइट पाठवण्यासाठी कमी क्षमता असणारे लॉन्चिंग व्हिकलचा वापर केला जाईल. जेणेकरुन त्याचा खर्च कमी होईल.
इस्रोने असे सांगितले होते की, जो एसएसएलवी-डी१ ने जे सॅटेलाइट पाठवले ते ३६५ किमी सर्कुलर ऑर्बिट ऐवजी 356X76 किमीच्या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये गेले होते. यामुळे ते सॅटेलाइट कामाचे राहिलेले नाहीत. समस्या अचूक कळली आहे. सेंसरमध्ये गडबड झाल्याने कळले नाही. या कारणामुळे ते सॅटेलाइट आपल्या मार्गापासून दूर गेले होते.
हे देखील वाचा- युक्रेन-रशियानंतर आता ‘या’ दोन देशामध्ये होणार युद्ध?
दरम्यान, इस्रोचे प्रमुख सोमनथ यांनी असे म्हटले की, इस्रो २०२३ मध्ये काही अभियान सुरु करणार आहेत. ते आपल्या मानवयुक्त आंतराळ अभियान गगनयानची तयारी सुद्धा करणार आहेत. तर एसएसएलवीच्या प्रक्षेपणानंतर पीएसएलवी सी ५५ मिशनच्या प्रक्षेपणाच्या अभियानाची सुरु करण्यात आलीआहे. हे प्रक्षेपण न्यू स्पेस इंडिया लिमिटेडसाठी असणार आहे. जे एक व्यावसायिक प्रक्षेपण आहे.