निसर्गातील झाडाझुडपांचे फार महत्व असते. याच्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजन मिळतो. या व्यतिरिक्त आपल्याला फळे, फूलं, लाकूड आणि अन्य महत्वाची पोषक तत्व ही मिळतात. झाडांच्या माध्यमातून आपल्याला अधिकाधिक फायदाच होते. परंतु हे गरजेचे नाही की, सर्वच झाडं ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. काही झाडंझुडपं ही धोकादायक असतात. यामुळे आपलेच नुकसान होऊ शकते. अशातच जगात असे एक विषारी झाडं आहे त्याच्या खाली पावसाळ्यात उभं राहिल्यास अंगावर फोड येऊ लागतात. याच बद्दल आपण जाणून घेऊयात. (Worlds poisonous tree)
झाडाचा प्रत्येक भाग असतो विषारी
मैंशनील असे झाडाचे नाव आहे. या झाडामध्ये विष असते. परंतु त्याचे फळ अत्यंत विषारी मानले जाते. याच्या फळाचा आकार हा लहान सफरचंदासारखाच असतो. परंतु तुम्ही ते चाखून जरी बघितले तरीही तुमचा मृत्यू होऊ शकतो. याला ‘मृत्यूचे लहान सफरचंद’ असे ही म्हटले जाते.
हे झाड फ्लोरिडा आणि कॅरेबियन समुद्र तटावर आढळते. असे म्हटले जाते की, जर एखादा व्यक्ती जरी याच्या संपर्कात आल्यानंतर त्वचेवर फोड येतात. त्याचसोबत पावसाळ्यात पावसापासून बचाव होण्यासाठी चुकून तुम्ही या झाडाखाली उभे राहिल्यास पानांवरील पडलेला थेंब जरी तुमच्या शरिरावर पडला तरीही तुमची त्वचा जळते.
अंधत्व येऊ शकते
मैंशीनील झाडाचा कोणताही हिस्सा व्यक्तीच्या डोळ्यांपर्यंत पोहचल्यास तर व्यक्तीला अंधत्व येऊ शकते. याच कारणास्तव लोकांना या झाडाच्या संपर्कात येण्यापासून आणि त्याची फळं खाण्यापासून रोखले जाते. या झाडाच्या आसपास सुचना फलक ही लावले जातात की, त्यापासून दूर रहावे. (Worlds poisonous tree)
लगेच परिणाम दिसून येतो
एक वैज्ञानिक निकोल एच स्ट्रिकलँन्ड यांच्या मते ते एकदा त्यांचा मित्र टोबॅगो सोबत कॅरेबियन आयलँन्डवर होते. तेथे त्यांनी या झाडाचे फळं खाल्ले होते. तेव्हा त्यांना सपूर्ण शरिरात जळजळ होऊ लागली आणि सूज आली. दरम्यान, लगेच उपचार मिळाल्याने ते बरे झाले.
हे देखील वाचा- मटारचे फायदे माहिती असतीलच पण तोटे माहिती आहे का?
फर्निचर बनवण्यासाठी केला जातो वापर
स्थानिक कारपेंटर याच्या लाकडापासून फर्निचर बनवतात. दरम्यान, ते कापताना खुप सावधगिरी बाळगावी लागते. त्याची लाकडं कापल्यानंतर वापर करण्यापूर्वी ते खुप वेळ उन्हात सुकवावे लागता. त्यामुळे त्यामधील विष निघून जाते. त्यानंतरच त्यापासून फर्निचर बनवले जाते.