सध्या डिजिटल युगात आपण जगत जरी असलो तरीही आपल्याला कधी ना कधी पाकिटातील पैशांची गरज भासतेच. अशाच आपण एटीएममध्ये जाऊन पैसे काढतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, जगात असे सुद्धा एक एटीएम आहे जेथे जाण्यासाठी तुम्हाला ढगांमधून जावे लागते. म्हणजेच खुप मैल प्रवास केल्यानंतर ज्या उंचीवर ते एटीएम बांधण्यात आले आहे ते पाहून प्रत्येकालाच प्रश्न पडेल ऐवढ्या उंचावर एटीएम कोण बांधत आणि लोक खरंच ऐवढ्या लांब पैसे काढण्यासाठी येत असतील का? याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात जगात असे एटीएम नक्की आहे तरी कुठे? (World Highest ATM)
खरंतर पाकिस्तानच्या सीमेवर खुंजेरब जवळ असे एटीएम बनवण्यात आले आहे. या एटीएमच्या आसपास वीजेची व्यवस्था सुद्धा नाही तरीही ते उत्तम पद्धतीने काम करते. येथे लोक सहजपणे पैसे सुद्धा काढू शकतात. या एटीएमला जगातील सर्वाधिक उंच एटीएमच्या रुपात ओळखले जाते.

किती उंचीवर स्थित आहे हे एटीएम
पाकिस्तान मधील खुंजेराब जवळ हे एटीएम बनवण्यात येणार आहे. १५,३९६ फूट उंचीवर स्थित एटीएम हे बर्फाच्छादित डोंगरांनी घेरलेले आहे. जे २०१६ मध्ये सुरु करण्यात आले होते. ऐवढ्या उंचीवर असल्याकारणास्तव याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वाधिक उंच एटीएमचा दर्जा मिळाल आहे.
पवन आणि सौर उर्जेवर चालते हे एटीएम
खरंतर जगातील हे सर्वाधिक उंच एटीएम आपल्या देशापासून अधिक दूर नाही आहे. कारण ते चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर खुंजेरबजवळ बनवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या डोंगरांवररील परिसर गिलगिट-बाल्टिस्तान मध्ये असलेल्या एटीएमचा हे क्षेत्र नेहमीच बर्फाच्छादित असते. ऐवढ्या उंच डोंगरांवर वीजेचे कोणतेच कनेक्शन नसते. या ठिकाणी सौर आणि पवन उर्जेचा वापर केला जातो. खरंतर हे एटीएम बॉर्डरवर तैनात असलेल्या गार्ड्सला येथून पैसे काढता येतील म्हणून उभारले गेले. (World Highest ATM)
हे देखील वाचा- नाणी, दागिने, मुर्त्या…पाकिस्तानात मिळाले जगातील सर्वाधिक जुने बौद्ध मंदिर
खुप मुश्लिकलने येथे पैसे पोहचवले जातात पैसे
एटीएमच्या देखरेखीसाठी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करण्यात आलेला नाही. याच्या सर्वात जवळ बँक ८२ किमी दूर आहे. येथूनच एटीमध्ये पैसे पोहचवले जातात. या एटीएम पर्यंत पोहचण्यासाठी त्यांना वेगाने वाहणारे वारे, वादळ, भूस्खलन आणि डोंगरांवरुन जावे लागते.
दरम्यान, खुंजेबर मध्ये पाकिस्तानातील तिसरे सर्वाधिक मोठे राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे. येथे हिम बिबट्या आणि लुप्तप्राय मार्को पोलो कोल्ह्यांचे सुद्धा घर आहे. काराकोरमच्या रेंज मध्ये राहणारी अन्य जनावरांमध्ये हिमालन आइबेक्स, हिमालयन ब्राउन बीयर, तिबेटियन कोल्हे सुद्धा दिसून येतात.