Home » America : 8647 हत्येचा कट !

America : 8647 हत्येचा कट !

by Team Gajawaja
0 comment
America
Share

अमेरिकेमध्ये 8647 या आकड्याची सध्या चर्चा सुरु झाली आहे. जो तो आपल्यापरिनं 8647 म्हणजे काय, याचा शोध घेत आहे. पण याचा अर्थ शोधला आहे तो अमेरिकेतील गुप्तचर संघटनेनं. 8647 हा नुसता आकडा नसून तो एक गुप्त कोड असल्याचा गुप्तचर संघटनेचा संशय आहे. हा आकडा आणि अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याही जवळचा संबंध आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा कट अमेरिकेमध्ये शिजत असून त्यात खूद्द अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेचे माजी अधिकारीच असल्याचा आरोप झाल्यानं खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या एफबीआयचे माजी संचालक, डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ट्रम्प यांच्या चिरंजीवांनी केला आहे. या आरोपानुसार 8647 हा त्या सर्व योजनांचा कोड आहे. या सर्वांबाबत आता नव्यानं चौकशी सुरु झाली असून डोनाल्ड ट्रम्प यांना खुद्द आपल्याच देशातील गुप्तचर संघटनांपासून धोका निर्माण झाला आहे. (America)

हे सर्व प्रकरण एफबीआय या अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेचे माजी संचालक जेम्स कोमी यांच्या एका पोस्टनंतर सुरु झाले. समुद्रकिना-यावर फिरणा-या जेम्स कोमी यांनी किना-यावरील शंख शिंपले गोळा केले आणि त्यापासून एक आकडा तयार केला. हा आकडा होता 8647. या शंखापासून तयार केलेल्या कलाकृतीचा त्यांनी फोटो काढला आणि तो सोशल मिडियावर शेअर केला. 8647 या आकड्यांचा हा फोटो शेअर झाल्यावर त्याचा अर्थ काय, याची स्पर्धा सुरु झाली. अर्थात ज्यांनी हा फोटो शेअर केला, आणि हा आकडा बनवला ते काही साधारण व्यक्ती नव्हते. सुपरपॉवर अशा अमेरिकेच्या एफबीआय या गुप्तचर संघटनेचे ते माजी संचालक होते. (International News)

जेम्स कोमी यांनी हा फोटो शेअर करतांना ‘समुद्रकिनारी फिरताना मला एक सुंदर कवचाचा आकार सापडला.’ अशी कॅप्शनही दिली. यामुळे अधिक बुचकाळ्यात पडायला झाले. मात्र ही त्यांची पोस्ट ज्युनिअर डोनाल्ड ट्रम्प या ट्रम्प यांच्या चिरंजीवांनी पाहिली आणि मग त्याची फोड करायला सुरुवात केली. यात मग एफबीआयचे विद्यमान संचालक काश पटेल यांचीही एन्ट्री झाली. मग या 8647 आकड्याची फोड काय हे स्पष्ट झाले, आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. वास्तविक 47 हा आकडा थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष आहेत. तर 86 हा मुळ अमेरिकन भाषेतील एक शब्द आहे. त्याचा अर्थ मुळापासून काढून टाका, किंवा फेकून द्या असा होतो. काही ठिकाणी 86 या आकड्याला ‘मृत्युदंड’ किंवा ‘हत्या’ या अर्थाने देखील वापरले जाते. (America)

जेम्स कोमी यांनी सोशल मिडियावर टाकलेल्या 8647 या आकड्याची अशी उकल झाल्यावर सर्वत्र खळबळ उडाली. हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट असल्याची चर्चा सुरु झाली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या जीवाला धोका आहे, असे लक्षात आल्यावर तेथील सर्व गुप्तचर संघटना सतर्क झाल्या. मात्र एफबीआयचे माजी संचालकच या फोटोचे जनक असल्यानं या सर्वांची गोची झाली आहे. ट्रम्प पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले होते तेव्हा त्यांचे आणि जेम्स कोमी यांचे संबंध चांगले नव्हते. त्यावेळी दुखावलेल्या जेम्स यांनी ट्रम्पना राष्ट्राध्यक्ष पदावरुन दूर कऱण्याचे प्रयत्न सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली. हा वाद वाढल्यावर जेम्स कोमी यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली. शिवाय आपल्या फोटोमागचे स्पष्टीकरणही दिले. समुद्रकिनाऱ्यावर दिसणा-या शंखशिंपल्यांचा फोटो काढण्यासाठी त्यांना एका आकड्यात बांधल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (International News)

==============

हे देखील वाचा : America : भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या विद्यापीठापर्यंतचा प्रवास अडचणीचा !

Balochistan : म्हणून बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळं व्हायचंय !

==============

माझ्या मनात असा कोणताही हेतू कधीच नव्हता. मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधात आहे, म्हणत त्यांनी तो पोस्टच काढून टाकली. पण एफबीआयचा संचालक असलेल्या व्यक्तीनं कुठलाही विचार न करता 8647 हा आकडा तयार करणे, हे योगायोग नसल्याचे ट्रम्प यांच्या हितचिंतकांचे म्हणणे आहे. जेम्स कोमी हे 2013 ते 2017 या काळात एफबीआय संचालक होते. रशिया आणि ट्रम्प यांच्या 2016 च्या निवडणूक मोहिमेतील कथित संबंधांची चौकशी करत असताना ट्रम्प यांनी त्यांना काढून टाकले होते. रशियाच्या बाजुने ते असल्याचा तेव्हा आरोप कऱण्यात आला होता. कोमी यांना हा अपमान जिव्हारी लागला होता. सध्या कोमी एक गुन्हेगारी कथा लेखक म्हणून लोकप्रिय ठरत आहेत. त्यांचे ‘एफडीआर ड्राइव्ह’ हे नवं पुस्तक प्रकाशनच्या मार्गावर आहे. त्याआधीच त्यांची ज्या एफबीआय चे त्यांनी संचालकपद भूषविले आहे, त्याच एफबीआय मार्फत चौकशी चालू झाली आहे. (America)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.