Home » शून्य रूपयाच्या नोटेबद्दल तुम्ही ऐकलंय का? 5 वर्ष चलनात वापरली होती ही नोट!

शून्य रूपयाच्या नोटेबद्दल तुम्ही ऐकलंय का? 5 वर्ष चलनात वापरली होती ही नोट!

तुम्ही 100, 50 किंवा 500 रूपयाची नोट चलनासाठी वापरता. पण तुम्हाला माहितेय का, एकेकाळी देशात शून्य रूपयाची नोट देखील चलनात होती.

by Team Gajawaja
0 comment
Zero rupee note
Share

Zero Rupee Note :  भारतीय चलनातील नोटा देशातील प्रत्येकाकडे असतात. तुम्ही एक रुपया ते दोन हजार रूपयांच्या नोटा पाहिल्या असतील. पण तुम्हाला माहितेय का, देशात एकेकाळी शून्य रूपयांची नोट देखील चलनात होती. खरंतर शून्य रूपयाच्या नोटेचे मूल्य नव्हते. केवळ ती छापण्यातच नव्हे तर चलनात देखील लोकांना दिली गेली. खरंतर या नोटेची का गरज भासली याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…

वर्ष 2007 मध्ये चेन्नईतील पाच पिलर (5 Piller) या एनजीओने शून्य रूपयांची नोट छापली होती. या नोटेवर सरकार किंवा आरबीआयकडून कोणतीही गॅरेंटी देण्यात आली नव्हती ना ती चलनात आणण्यात आली होती. खरंतर ही नोट हजारो लोकांमध्ये पोहोचल्यानंतर एनजीओने जनतेमध्ये खास मेसेज दिला होता. ही नोट हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलगू भाषेत छापण्यात आली होती.

का भासली शून्य रूपयाच्या नोटेची गरज?
खरंतर देशातील शासकीय कार्यलयांमध्ये भ्रष्टाचार ऐवढा वाढला होता की, यामुळे लोक त्रस्त झाले होते. प्रत्येक कामासाठी लाच घेतली जात होती. याच कारणास्तव पाच पिलर या एनजीओने एक अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत शून्य रूपयांची नोट छापून रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि बाजांमध्ये वाटली गेली. एनजीओने लोकांना भ्रष्टाचार आणि लाच घेण्याच्या मुद्द्याच्या विरोधात जागृक करण्यास सुरूवात केली. (Zero Rupee Note)

एनजीओने लग्न समारंभात जाऊनही लोकांना जागृक करणारी बुकलेट आणि शून्य रूपयांच्या नोटा वाटल्या. ऐवढेच नव्हे विद्यार्थी आणि जनतेनेही 30 फूट लांब आणि 15 फूट रुंद अशी शून्य वॅल्यू असणाऱ्या नोटेचा बॅनरही लावला. या बॅनरसोबत एक हजारांपेक्षा अधिक शाळा, कॉलेज आणि जनसभांमध्ये जाऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात तरुणांना जागृक केले. हे अभियान पाच वर्ष सुरू होते आणि यादरम्यान पाच लाखांहून अधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.


आणखी वाचा:
इतिहासात पहिल्यांदाच होणार हिवाळी चारधाम यात्रा
RBI कडून ॲलर्ट! ट्रेडिंगसाठी हे ॲप वापरत असाल तर लगेच करा Delete
स्मार्टफोनची स्क्रिन स्वच्छ करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.