युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सिनेमा, कॉमेडी, फॅशन आणि शिक्षणासह अन्य काही गोष्टींसंदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ पाहू शकतो. सुरुवातीच्या काळात युट्यूब वरील व्हिडिओ पाहताना जाहिरात दाखवली जायची. मात्र आता दिवसागणिक युट्यूब वरील जाहिरातींची संख्या अधिकाधिक वाढत चालली आहे. अशातच आपण जेव्हा एखादा व्हिडिओ पाहत असतो तेव्हा मध्येच जाहिरात सुरु झाली की आपल्याला कंटाळा येतो. अशातच तुम्ही युट्युबवरील व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचे प्रीमियम वर्जन डाऊनलोड करु शकता. यासाठी मात्र तुम्हाला काही शुल्क मोजावा लागतो. (YouTube Video Advertisement)
युट्युब पाहताना जाहिरात दिसू नये म्हणून ट्रिक
-जर तुम्ही लॅपटॉप किंवा कंप्युटरवर युट्युबच्या माध्यमातून व्हिडिओ पाहत असाल तर सर्वात प्रथम क्रोम ब्राउजर सुरु करा.
-क्रोम ब्राउजरमध्ये युट्युब सर्च करा
-आता कोणताही व्हिडिओ सुरु करा
-वरती सर्च बारवर URL वर क्लिक करुन युट्यूब मध्ये T नंतर एक हायफन (-) टाका
-आता तुम्ही मोफत कंप्युटर किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून जाहिरातींशिवाय युट्युब वरील व्हिडिओ पाहू शकता

स्मार्टफोनवर अशा पद्धतीने जाहिरातींशिवाय पहा व्हिडिओ
-स्मार्टफोनमध्ये जाहिरातींशिवाय युट्युब वरील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही क्रोम ब्राउजर प्रथम सुरु करता
-आता क्रोम ब्राउजरवर डेस्कटॉप मोड सुरु करा
-क्रोम ब्राउजरवर डेस्कटॉप मोड सुरु झाल्यानंतर त्यामध्ये युट्युब सर्च करा
-युट्युब मध्ये कोणताही व्हिडिओ सुरु करा
-त्यानंतर युआरएलवर क्लिक करा आणि युट्युबमध्ये टी नंतर एक हायफन टाका
-अशा प्रकारे तु्म्ही स्मार्टफोनवर सुद्धा जाहिरांतीशिवाय व्हिडिओ पाहू शकता. (YouTube Video Advertisement)
हे देखील वाचा- आता ग्राहकांना खरेदी करता येणार नाही नवे सिम कार्ड, जाणून घ्या अधिक
दरम्यान, युट्युब कडून आता लवकरच आपल्या प्रीमियम सेवेचा लाभ घेणाऱ्या युजर्सला झटका मिळू शकतो. कारण युट्युब 4K व्हिडिओ पर्यंतच आपली प्रीमियम सेवा मर्यादित केली जाऊ शकते. मॅकरियूमर्सच्या नुसार रेडिट आणि ट्विटरवर याबद्दल काही ग्राहकांनी उल्लेख क केला की, त्यांनी आयओएससह अन्य काही प्लॅटफॉर्मवर सुद्धा या संदर्भातील नोटिस पाठवण्यास सुरुवात केली आहे.
तर युएसमध्ये एक स्टँडर्ड युट्यूब प्रीमियम प्लॅनची किंमत ११.९९ डॉलर आहे. यामध्ये तुम्हाला अॅड फ्री व्हिडिओ, बॅकग्राउंड प्लेबॅक आणि ऑफलाइन पाहण्यासाठी व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा मिळते. प्लॅटफॉर्मने नुकतेच असे म्हटले की, ते आपल्या मोबाईल अॅपमध्ये आपल्या प्रीमियम ग्राहकांसाठी एका नव्या फिचर संदर्भात टेस्टिंग करत आहेत. जेणेकरुन त्यांना कोणताही व्हिडिओ झूम करुन पाहणे शक्य होणार आहे.