जर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावत असाल तर सावध व्हा.कारण आपल्या कमावलेल्या पैशांचा हिशोब हा इनकम टॅक्स डिपार्टमेंटला देत टॅक्स भरावा लागतो. त्याचसोबत युट्यूबवरुन तुम्ही कसे पैसे कमावू शकता याबद्दल सुद्धा कोणता व्हिडिओ बनवू शकत नाही. खरंतर असे करणे बेकायदेशीर आहे. हा सल्ला तुम्ही नेहमीच लक्षात ठेवा. कारण नुकत्याच युपी मधील एका युट्यूबरच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, त्याने युट्यूबच्या माध्यमातून बेकायदेशीररित्या कमाई केली आहे. मात्र या संदर्भात अधिक खुलासा आयकर विभागाने केलेला नाही. (YouTube Monetization Rules)
हे प्रकरण बरेली मधील आहे. आयकर विभागाने येथील तस्लीम नावाच्या एका युट्यूबरच्या घरावर छापेमारी केली.छापेमारीत त्याच्या घरातून तब्बल 24 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. विभागाने हे पैसे आपल्या ताब्यात घेतले आहेत. तर तस्लीम याच्या परिवाराने या छापेमारीला कट असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावणे गुन्हा नाही असे ही त्यांनी म्हटले आहे. युट्यूबवरुन झालेल्या कमाईतून 4 लाखांचा टॅक्स सुद्धा भरला आहे.
तस्लीम फिरोज याचा भाऊ फिरोज याचे असे म्हणणे आहे की, तस्लीमचा ‘ट्रेडिंग हब 3.0’ या नावे युट्यूब चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून त्याचा भाऊ शेअर मार्केट संदर्भातील व्हिडिओ अपलोड करतो. फिरोजने दावा केला आहे की, युट्यूबच्या माध्यमातून करण्यात आलेल्या 1.2 कोटी रुपयांच्या कमाईतून त्याने आधीच 4 लाखांचा टॅक्स सुद्धा दिला आहे. छापेमारी हा एक विचारपूर्वक कट आहे. आयकर विभागाने छापेमारी बद्दल अधिक माहिती दिलेली नाही.
एका रिपोर्टनुसार, युट्यूबच्या माध्यमातून झालेल्या कमाईला व्यवसायातून झालेली कमाई असे म्हटले जाते. चार्टर्ड अकाउंटेट असे म्हणतात की, जर एकूण कमाई ही एक कोटींपेक्षा अधिक असेल तर युट्यूबरला आयकर विभागाच्या कलम 44 एबी अंतर्गत युट्युबरला आपल्या अकाउंटचे ऑडिट करावे लागेल. हे काम केवळ रजिस्टर्ड चार्टर्ड अकाउंटेंट करु शकतो. (YouTube Monetization Rules)
हेही वाचा- Threads आणि Twitter मधील नेमका फरक काय?
या व्यतिरिक्त सध्या बहुतांश लोक युट्यूबच्या माध्यमातून कमाई करत असतातच. पण युट्यूब दररोज काही ना काही नवे अपडेट घेऊन येते. त्यामुळे युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावण्याच्या पद्धतीत ही बदल होत राहतो. गेल्या काही वर्षांपासून युट्यूबने आपल्या पार्टनर प्रोग्रामच्या नियमात खुप बदल केले आहेत. त्यामुळेच युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी काही लोक आपल्या चॅनलला Monetize करतता. मात्र युट्यूबने Monetization च्या नियमात सुद्धा काही बदल केले आहेत.