बहुतांश आयफोन युजर्सला आपल्या मोबाईलवर युट्युब (YouTube) पाहताना काही समस्यांचा सामना करावा लागतो. जसे की, युट्यूब पाहत असताना फोन लॉक केल्यास तर युट्यूब ही बंद होऊन जाते. खरंतर आयफोनच्या ब्रॅकग्राउंडला युट्यूब ऑडिओ ऐकण्यासाठी त्याचे प्रीमियम सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागते. परंतु आम्ही तुम्हाला आज अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही सब्सक्रिप्शन शिवाय आयफोनच्या बॅकग्राउंडला म्युझिक प्ले करु शकता.
युट्यूबने आपल्या व्हिडिओ अॅपमध्ये एक फिचर दिले आहे. त्यात तुम्ही बॅकग्राउंड म्युजिक सुरु ठेवू शकता. परंतु तुम्ही हे तेव्हाच करु शकता जेव्हा तुमच्याकडे प्रीमियम सब्सक्रिप्शन असेल. त्यासाठी तु्म्हाला ९८९ रुपये प्रति महिना शुल्क द्यावा लागतो.
आयफोनवर सब्सक्रिप्शनशिवाय असे ऐका म्युजिक
जर तुम्ही युट्युब होस्टेड ऑडिओ कंटेट जसे की, पॉडकास्ट, म्युजिक ऐकत असाल तर तुम्ही तुमचा फोन लॉक केल्यानंतर ते ऐकू शकता. यासाठी कोणताही शुल्क मोजावा लागत नाही. केवळ तुम्हाला वर्कराउंडमध्ये अॅप्पलच्या सफारीचा वापर करावा लागणार आहे. अॅप्पल सफारी तुमचे डिवाइस लॉक असेल तरीही व्हिडिओ सुरु ठेवण्याची परवानगी देतो. मोबाईलवर व्हिडिओ स्ट्रिमिंग पाहण्याऐवजी तुम्हाला त्याच्या डेस्कटॉप वर्जनवर स्विच करावे लागमार आहे.
आयफोनवर युट्यूब व्हिडिओ कसे चालवाल?
-यासाठी सर्वात प्रथम आपल्या आयफोनच्या सफारीत जा आणि युट्युब डॉट कॉमवर जा.
-येथे तुम्हाला जो व्हिडिओ ऐकायचा आहे त्यावर क्लिक करा
-सफारी मेन्यू बटण aA वर क्लिक करा
-आता डेस्कटॉप वेबसाइटसाठी रिस्क्वेस्ट करुन ऑप्शन निवडा
-व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी प्ले बटणावर क्लिक करा. याच दरम्यान जर एखादा पॉप-अप आल्यास तर तुम्हाला युट्यूब मोबाईल अॅपचा पर्याय देतो पण त्याकडे दुर्लक्ष करा (YouTube)
-आता तुम्ही आपल्या आयफोनवर लॉक करुन कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय म्युजिक ऐकू शकता.
हेही वाचा- चोरी झालेला iPhone पुन्हा मिळेल, केवळ करा ‘या’ सेटिंग्स
या व्यतिरिक्त युट्यूबने Go Live Together नावाचे फिचर ही लॉन्च केले आहे. या फिचरच्या माध्यमातून कंटेट क्रिएटर्सला आपल्या एका गेस्टला इनवाइट करता येणार आहे. त्याचसोबत ते त्याच्याशी लाइव्ह बातचीत करु शकतील. याबद्दलची माहिती युट्यूबने आपल्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून दिली होती. त्याचसोबत असे ही सांगितले होते की, या फिचरचा वापर काही निवड क्रिएटर्सच करु शकतात. तर हे फिचर डेस्कटॉप वर्जनसाठी लॉन्च करण्यात आलेले नाही.