Yoga for weight gain- लठ्ठपणाप्रमाणेच वजन कमी असणे हे सुद्धा शारीरिक समस्यांपैकी एक कारण असू शकते. जर एखाद्या व्यक्तीचे वजन कमी आहे तर त्याला महत्वाची पोषक तत्व मिळत नाही आहेत. पोषक तत्वांच्या अभावामुळे शरिर कमकुवत होते आणि शारिरिक विकासाची प्रक्रिया ही मंदावते किंवा थांबते. दरम्यान, कमी वजन असण्यामागे काही कारणं असू शकतात. ज्यामध्ये अनुवांशिक, एखादा गंभीर आजार किंवा कुपोषण याचा समावेश असू शकतो. परंतु कमी वजन असण्याची स्थिती ही ठिक करता येत नाही असे नव्हे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला तुमचे वजन कसे वाढवाल या संदर्भातील काही सोप्पी योगासने सांगणार आहोत. तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यात संतुलित आहार घ्याल तेव्ही ही त्याचा फायदा तुमच्या शरिराला होईल. मात्र जर तुमचे वजन एखाद्या गंभीर आजारामुळे कमी असेल अशातच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपचार करा.
वजन वाढवण्यासाठी योगासन कशा प्रकारे मदत करतात?
जर तुम्ही योगासन करता किंवा त्या बद्दल तुम्हाला माहिती असते तेव्हा तुम्हाला योगासन केल्याने काय फायदे होतात हे माहिती असते. प्राचीन काळापासून चालत आलेल्या या विद्येला संपूर्ण विश्वाने आपलेसे केले आहे. योगाला मानसिक आणि शारिरिक आरोग्याची चावी असल्याचे मानले आहे. शरिरासंबंधित कोणत्या ही समस्येचा उपाय हा योगाद्वारे संभव होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला नियमित योगासन आणि संतुलित आहार घ्यावा लागणार आहे.योगासन करुन फक्त लठ्ठपणाच नव्हे तर वजन ही वाढवता येते.
वजन वाढवण्यासाठी काही सोप्पी योगासन
–भुजंगासन
वजन कमी असल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही भुजंगासन करु शकता. याचा थेट परिणाम पाचनक्रियेवर होतो. त्यामुळे भुक लागण्यास मदत होते. या व्यतिरिक्त हे आसान केल्यानं मेटाबॉलिज्म ठिक राहते आणि श्वास घेण्यास सुधारणा होते.
-वज्रासन
हे असे एक आसन आहे जे जेवल्यानंतर लगेच करता येते. याचा थेट परिणाम पाचक्रियेवर होते आणि मेटाबॉलिज्म नियंत्रित करण्यास काम करतो. या व्यतिरिक्त या आसनामुळे मन शांत ही राहते. वजन कमी असण्याची समस्या ही या आसनामुळे दूर होऊ शकते.(Yoga for weight gain)
हे देखील वाचा- हाताची चरबी कशी कमी कराल? जाणून घ्या व्यायाम आणि सोप्प्या ट्रिक्स
-सूर्यनमस्कार
वजन कमी असण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सुर्यनमस्कार करु शकता. सुर्यनमस्कारमध्ये १२ मुद्रांचा समावेश असतो. ही सर्व आसन मिळून तुमचे पाचन तंत्र ते हृदयाचे आरोग्य आणि रक्तवाहिन्या उत्तम ठेवण्यास मदत करते. घटलेले वजन संतुलित करण्यासाठी सूर्य नमस्कारचा आधार घेऊ शकतो. हे अगदी सहजपणे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी ही काम करते. त्यामुळे तुम्हाला भूक लागण्याची सवयीत सुधारणा होईल आणि तुमचा बीएमआय वाढेल.
-पवनमुक्तासन
कमी वजनापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही पवनमुक्तासन करु शकता. या आसमानुळे तुमची पाचन क्रिया सुधारते आणि नियंत्रत ही राहते. पवनमुक्तासह अतिसक्रिय मेटाबॉलिज्म शांत करण्याचे काम करते. या व्यतिरिक्त हे आसन शरिराद्वारे उत्तम पद्धतीने पोषक तत्वे अॅब्जॉर्ब करण्यास ही मदत करतात. वजन वाढवायचे असेल तर तुम्ही हे आसन दररोज करु शकता.