चीन तिबेटमधील यारलुंग त्सांगपो नदीवर जगातील सर्वात मोठा जलविद्युत धरण बांधत आहे. हे धरण भारतासाठी वॉटर बॉम्ब असल्याचा इशारा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी दिला आहे. चीनचे सरकार कधी काय करेल, याचा कधीही भरवसा देता येत नाही. त्यामुळेच या जगातील सर्वात मोठ्या धरणाबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. (Yarlung Tsangpo)
हे धरण बांधतांना चीनने आंतरराष्ट्रीय जल करारांवर स्वाक्षरी केलेली नाही, त्यामुळे चीन या धरणातून कधीही पाणी सोडू शकणार आहे. असे झाले तर अरुणाचल प्रदेशमधील मोठा परिसर जलमय होऊन येथील शेती आणि जनजीवन पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे. चीन हा बेभरवश्याचा देश आहे. मुख्यतः आपल्या शेजारी देशांचा चीन कधीही मान ठेवत नाही. भारताची ब्रह्मपुत्रा नदी ही तिबेटमध्ये यारलुंग त्सांगपो नावानं ओळखली जाते. याच नदीवर चीन हे सुपर धरण बांधत आहे. ग्रेट बेंड धरण या नावानं बांधण्यात येणारे हे धरण पूर्ण भरले तर त्याच्या भारानं पृथ्वीच्या भ्रमण क्षमतेवरही परिणाम होणार असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. तिबेटमधील मेडोग काउंटीमध्ये बांधले जात असलेल्या या धरणाची वीज निर्मिती क्षमता 60000 मेगावॅट आहे. पण या ग्रेड बेंड धरणामुळे भारतातील मोठ्या प्रदेशाला कायम धोका रहाणार आहे. शिवाय भूकंपाच्या छायेत हा प्रदेश रहाणार आहे. त्यामुळेच या धरणाचा उल्लेख भारतासाठी वॉटर बॉम्ब म्हणून करण्यात येत आहे. (Trending News)
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी चीनमधील सर्वात मोठ्या धराणामुळे आपल्या राज्यासह संपूर्ण देशाला मोठा धोका असल्याचे वक्तव्य केले आहे. अरुणाचल राज्याच्या सीमेजवळ चीनने बांधलेला हे जगातील सर्वात मोठे धरण असल्याचा दावा चीन करीत आहे. वास्तविक हे धरण म्हणजे, वॉटर बॉम्ब असल्याचे पेमा खांडू यांनी सांगून काळजी व्यक्त केली आहे. यारलुंग त्सांगपो नदीवरील जगातील सर्वात मोठा धरण प्रकल्प हा गंभीर चिंतेचा विषय झाला आहे. कारण हे धरण बांधण्यापूर्वी चीनने आंतरराष्ट्रीय जल करारांवर स्वाक्षरी केलेली नाही. (Yarlung Tsangpo)
या करारावर चीननं स्वाक्षरी केली असती तर दोन देशांमधील सीमेवर असलेल्या धरणाबाबत जे आंतरराष्ट्रीय नियम तयार करण्यात आले आहेत, त्याला चीनचे सरकार बांधिल असते. मात्र आता चीनला रोखण्यासाठी कुठलाही कायदा उपयोगात येणार नाही. चीन आधीच भारतासाठी डोकेदुखी आहे. 2020 मध्ये गलवान घाटीमध्ये भारतीय सैन्यानं चीनी सैन्यावर मात केली होती. तेव्हापासून या दोन्ही देशांमधील सीमावाद अधिक चिघळला आहे. अलिकडे याबाबत दोन्ही देश चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तयार झाले आहेत. पण चीनच्या सरकारवर आणि सैन्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. इथे हे लक्षात घ्यायला हवं की, चीनच्या सैन्याच्या हालचाली टिपता येतात, आणि चिनी सैन्य काय करेल याचाही अंदाज बांधता येतो. मात्र तिबेटच्या यारलुंग त्सांगपो नदीवर चीननं जे ग्रेट बेंड नावाचे धरण बांधले आहे, त्याचा उपयोग चीन कसा करेल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. चीन या धरणाचा वॉटर बॉम्ब सारखा वापर करणार अशी शक्यता अनेकांना वाटत आहे. (Trending News)
त्सांगपो नदीला भारतात ब्रह्मपुत्रा नदी म्हणतात. या नदीवर ग्रेट बेंड नावाचे धरण बांधून चीन मोठ्या प्रमाणात उर्जा निर्मिती करणार आहे. या धरणाची बांधणी सुरु झाली, तेव्हापासून चीनच्या हेतूबदद्ल शंका व्यक्त कऱण्यात आली. हे धरण आतापर्यंत बांधलेल्या सर्वात मोठ्या धरणापेक्षा, थ्री गॉर्जेसपेक्षा तिप्पट मोठे आहे. या धरणाची घोषणा 2021 मध्ये चीनचे तत्कालीन पंतप्रधान ली केकियांग यांनी केली. चीनने 2024 मध्ये 137 अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्चाच्या या पाच वर्षांच्या प्रकल्पाच्या बांधकामाला मान्यता दिली. या प्रकल्पातून 60000 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या धरणाचा वापर करुन चीन ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी कधीही थांबवू आणि सोडू शकणार आहे. जर चीनने पाणी थांबवले तर अनेक नद्या कोरड्या पडणार आहेत. शिवाय चीननं अचानक पाणी सोडले तर पुरामुळे मोठ्या प्रमाणात विनाश होऊ शकतो. त्यातही चीननं आंतरराष्ट्रीय जल करारावर स्वाक्षरी केलेली नाही. तसे झाले असते तर हे धरण भारतासाठी वरदान ठरू शकले असते. यामुळे अरुणाचल प्रदेश, आसाम आणि बांगलादेशमध्येही पावसात येणारे पूर रोखता आला असता. (Yarlung Tsangpo)
=============
हे ही वाचा : China : 60 लाख गाढवांची कत्तल करुन चीन करतो काय !
===============
पण आता चीनच्या मनमानी स्वभावावर या प्रदेशाचे अस्तित्व अवलंबून रहाणार आहे. अरुणाचलमधील अनेक आदिवासी जनजाती फक्त शेतीवर अवलंबून आहेत. पण या धरणाच्या भीतीनं या आदिवासी जनजातींचे जनजीवन धोक्यात आले आहे. चीनच्या धरणाचा सर्वात धोका हिमालयीन शिखरांना आहे. कारण हिमालयात या धरणाच्या दाबामुळे भूकंप येण्याचे प्रमाण वाढणार असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. अर्थात या धरणाचा भारताला असलेला धोका लक्षात घेऊन भारत सरकारनं सियांग अप्पर मल्टीपर्पज प्रोजेक्ट नावाचा एक प्रकल्प सुरु केला आहे. भारताने अरुणाचल प्रदेशातील 10 गिगावॅट जलविद्युत प्रकल्प असलेल्या सियांग अप्पर बहुउद्देशीय प्रकल्पाची सुरुवात केली आहे. यामुळे लोकांचे पुरापासून संरक्षण करता येणार आहे. (Trending News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics