Home » अजिंक्य – शार्दुलची चिवट फलंदाजी, तरी ऑस्ट्रेलियाला आघाडी

अजिंक्य – शार्दुलची चिवट फलंदाजी, तरी ऑस्ट्रेलियाला आघाडी

by Team Gajawaja
0 comment
IND vs AUS
Share

आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर पुनरागमन करणारा अजिंक्य रहाणे ( १२९ चेंडूत ८९ धावा ) आणि शार्दुल ठाकूर ( १०९ चेंडूत ५१ धावा ) यांच्या झुंझार फलंदाजीच्या बळावर जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात भारतावरील फॉलोऑनची नामुष्की टळली. तिसरा दिवस संपतांना ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात ४ बळी गमावून १२३ धावा करत २९६ धावांची भक्कम आघाडी घेतली. पहिल्या डावातील या आघाडीमुळे ऑस्ट्रेलिया या सामन्यात मजबूत स्थितीत पोहोचला असून सामन्यात पुनरागमन करायचे झाल्यास भारताला कांगारूंचा दुसरा डाव लवकरात लवकर आटोपावा लागेल.(IND vs AUS)

भारताचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात काही चांगली झाली नाही. सलामीवीर डेव्हिड वार्नर अवघ्या एका धावेवर असतांना मोहम्मद सिराजने त्याला भारतकरवी झेलबाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. ऑस्ट्रेलियाला उस्मान ख्वाजाच्या रुपात दुसरा धक्का बसला. अवघ्या १३ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर असतांना त्याला माघारी परतावे लागले. पहिल्या डावातील शतकवीर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लबुशेन यांनी संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या डावाला थोड्या वेळासाठी स्थिरता दिली. स्मिथ आणि ट्रवीस हेडला जडेजाने बाद केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लबूशेन आणि ग्रीन खेळपट्टीवर फलंदाजी करत होते.(IND vs AUS)

तत्पूर्वी आपल्या ५ बाद १५१ वरून पुढे खेळण्यास भारतीय संघाने सुरुवात केली. सुरुवातीच्या पडझडीनंतर अजिंक्य राहणेने भारताचा डाव सांभाळला. अष्टपैलू शार्दुल ठाकूरसोबत शतकी भागीदारी करत भारताची सामन्यातील स्थिती सुधारण्यास त्याने मदत केली. ऑस्ट्रेलियन भेदक माऱ्याचा संयमाने सामना करत उपहारापर्यंत त्यांनी भारताचा एकही बळी जाऊ दिला नाही. उपहारानंतर अजिंक्य रहाणे बाद झाला आणि भारतीय फलंदाजीला गळती लागली. तळाच्या फलंदाजांना फारशी कमाल दाखवता आली नाही. भारताचा डाव सर्वबाद २९६ धावांवर संपुष्टात आला. (IND vs AUS)

=========

हे देखील वाचा : यशस्वी जयस्वाल!

=========

अजिंक्य रहाणेने या सामन्यात उत्तम फलंदाजी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आपल्या कसोटी कारकिर्दीत अजिंक्य राहणेने ५००० धावांचा टप्पा पार केला. कसोटी क्रिकेटमध्ये पाच हजार धावांचा टप्पा पार करणारा तो १३ वा फलंदाज ठरला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. शार्दुल ठाकूरने अर्धशतक ठोकत द ओव्हल मैदानावर सलग तीन अर्धशतके ठोकण्याचा पराक्रम आपल्या नावावर केला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.