24
प्रसिद्ध लेखिका मीना देशपांडे यांचे निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना संसर्गानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. मीना देशपांडे या महान साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या कन्या होत्या.
साहित्यिक वडील आचार्य अत्रे आणि लेखिका बहीण शिरीष पै यांच्या साथीने मीना देशपांडे यांचे साहित्यही बहरले.आचार्य अत्र्यांच्या आठवणी सांगणारे ‘अश्रूंचे नाते’, आचार्य अत्रे – प्रतिभा आणि प्रतिमा, पपा – एक महाकाव्य अशी साहित्यसंपदा त्यांनी लिहिली. याशिवाय ये तारुण्या ये, हुतात्मा, महासंग्राम असे कथा-कादंबऱ्यांचे लेखनही त्यांनी केले. अमेरिकेतील जॉर्जियामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र स्थानिक वेळेनुसार 6 सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.