Home » जगातील सर्वात महागडी उशी, बनवायला लागली तब्बल १५ वर्षे

जगातील सर्वात महागडी उशी, बनवायला लागली तब्बल १५ वर्षे

0 comment
Share

जर एखादी व्यक्ती चांगली झोप घेत नसेल, तर त्याचा थेट परिणाम त्याच्या आरोग्यावर होतो. म्हणून, दिवसातून किमान ६ ते ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. चांगल्या झोपेसाठी चांगला बेड आणि उशी खूप महत्त्वाची असते. जर हे दोन्ही नसेल, तर नीट झोपणे थोडे कठीण होते. भारतात बहुतेक घरांमध्ये कापसाने भरलेल्या गाद्या आणि उशा वापरल्या जातात. पण बदलत्या काळानुसार उशीमध्ये वेगवेगळ्या क्वालिटी येऊ लागल्या आहेत. यापैकी काही आरोग्याला लक्षात घेऊन बनवण्यात आले आहेत, परंतु त्यांची किंमत जाणून तुम्हाला धक्का बसेल. (Expensive Pillow)

खरं तर, आजकाल अशा उशा बाजारात उपलब्ध आहेत, ज्याच्या जागेवर तुम्ही आयफोन १३ देखील खरेदी करू शकता. एवढ्या महागड्या उशीवर डोकं ठेवून झोपणं किती अवघड आहे, याची कल्पना आता तुम्ही करू शकता. (Expensive Pillow)

जगातील सर्वात महाग उशी

जगातील सर्वात महागडी उशी नेदरलँडमध्ये बनवली आहे. या उशीला खास फिजिओथेरपिस्टने आरोग्य लक्षात घेऊन तयार केले आहे. यामुळेच त्याची किंमत खूप जास्त आहे. (Expensive Pillow)

काय आहे उशीची किंमत?

या उशीची वैशिष्ट्ये जाणून घेण्यापूर्वी त्याची किंमत जाणून घेऊया. या एका उशीची किंमत ५७ हजार डॉलर्स, म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ४५ लाख रुपये आहे. (Expensive Pillow)

हे देखील वाचा: ‘या’ मंदिरात प्रसादात पेढे नव्हे, तर मिळतात ब्राउनी, बर्गर आणि सँडविच

‘यामुळे’ इतकी महाग आहे उशी

या उशीवर नीलम, सोने आणि हिरा जडलेला आहे. त्यामुळेच त्याची किंमत एवढी वाढली आहे. तसेच, ही उशी चोरीला जाण्याचीही भीती कायम आहे. (Expensive Pillow)

निराळ्या उशीची वैशिष्ट्ये

– या उशीच्या आत भरलेला कापूस रोबोटिक मिलिंग मशीनचा आहे.
– या उशीच्या झिपमध्ये चार हिरे जडले गेले आहेत. यासोबत एक नीलमही जोडलेला आहे. 
– उशी अशीच मिळणार नाही. तर ती एका ब्रँडेड बॉक्समध्ये ठेवलेली आहे.
– या उशीला बनवणाऱ्यांचा दावा आहे की, जे लोक निद्रानाशाने ग्रस्त आहेत, ते या उशीवर शांतपणे झोपू शकतील. (Expensive Pillow)

१५ वर्षांच्या मेहनतीनंतर तयार झालीय उशी

ही उशी तयार करण्यासाठी तब्बल पंधरा वर्षांची मेहनत घेतली आहे. खरं तर, यामागे खूप संशोधन झाले आहे, म्हणून ही उशी तयार करायला इतकी वर्षे लागली आहेत. (Expensive Pillow)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.