मध ही अशी एक गोष्ट आहे ज्याचा वापर आपले पुर्वज सुद्धा करायचे. याला अत्यंत पवित्र गोष्ट मानली जाते. पूजाविधीत सुद्धा मधाचा वापर केला जाते. अशातच सर्वसान्यपणे मध हे आपल्याला जवळच्या किराणा दुकानात अथवा मॉलमध्ये सहज मिळते. याची किंमत फारशी सुद्धा नसते. तर मध आरोग्य आणि चवीने परिपूर्ण आहे. त्यात अनेक पोषक घटक असतात. ते तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून वाचवण्याचे काम करतात. त्याचे अनेक प्रकारे सेवन केले जाते. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप चांगले असते. तुम्ही दूध किंवा पाण्यासोबत एक चमचा मध घेऊ शकता. (World expensive honey)
पण आम्ही तुम्हाला ज्या मधाची किंमत सांगणार आहोत ते खरंतर जगातील सर्वाधिक महागडे मध असल्याचे सांगितले जाते. याची किंमत ऐवढी आहे की, तुम्ही त्या पैशांत एक उत्तम कार खरेदी करु शकता.
हे मधं तुर्कीएच्या सेनटोरी कंपनीचे आहे. ही कंपनी जगातील सर्वाधिक महागड्या मधाची विक्री करते. याची पुष्टी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटनुसार, या कंपनीचे मध संपूर्ण जगात सर्वाधिक महागडे विकले जाते. याच्या एक किलोची किंमत १० हजार युरो. म्हणजेच भारतीय रुपयांत याची किंमत होते तब्बल ९ लाख रुपयांपेक्षा ही अधिक.
या मधाची सर्वाधिक खास गोष्ट अशी की, हे सर्वसामान्यपणे मिळणाऱ्या मधाप्रमाणे गोड नव्हे तर थोडेसं कडवट असते. पण आरोग्यासाठी हे अतिशय रामबाण असल्याचे मानले जाते. असे सांगितले जाते की, या मधात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँन्टिऑक्सिडेंट्स सारखे काही न्युट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. या मधाला अधिक महाग अशा कारणास्तव विकले जाते कारण ते सामान्य मधाप्रमाणे एक-दोन वेळा नव्हे तर एकाच काढले जाते.(World expensive honey)
हे देखील वाचा- हिट-स्ट्रोक ठरु शकतो जीवघेणा, बचाव करण्यासाठी कामी येतील ‘हे’ उपाय
तसेच हे मधं तयार करण्याची प्रक्रिया सुद्धा अत्यंत खास आहे. त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी कंपनी ते रहिवाशी परिसरापासून दूर जंगलातील एका गुहेत तयार करते. हा गुहेच्या चहूबाजूंना औषधी झाडं लावली जातात. जाणेकरुन मधमाश्या त्यांच्या फुलातील गोड रस पिऊन एक औषधीय मध तयार करु शकतील. हे मध बाजारात विक्री करण्यापूर्वी तुर्कीए फूड इंस्टिट्युट द्वारे याची गुणवत्ता तपासतात. त्यानंतरच ते ग्राहकांना विक्री केले जाते.