वर्किंग वुमनला घर आणि बाहेरची जबाबदारी सांभाळावी लागते. याच कारणास्तव काहीवेळेस सकाळी ऑफिसला जाण्यापू्र्वी व्यवस्थितीत तयारी करता सुद्धा येत नाही. परंतु जर तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असाल तर प्रत्येकवेळी तुम्हाला अप-टू-डेट रहावे लागते. अशातच गरजेचे आहे की, तुम्ही तुमच्या बॅगेत काही मेकअप प्रोडक्ट्स जरुर ठेवले पाहिजेत. (Working women bag)
बीबी क्रीम
घाईघाईत जर तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चराइजर किंवा एखादी उत्तम क्रिम लावण्यास विसरला असाल तर तुमच्या बॅगेमध्ये असलेली बीबी क्रीम लावू शकता. हे मॉइश्चराइजरचे काम सुद्धा करते आणि सूर्याच्या युवी किरणांपासून तुम्ही तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करू शकता. तसेच चेहऱ्याला एक नॅच्युरल लूक देते. यामुळे ही क्रिम नेहमीच तुमच्या बॅगेत ठेवा.
काजळ
काजळ मेकअप किटमधील सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण डोळ्यांना हाइलाइट करण्यासह चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. त्यामुळे नेहमीच बॅगेत वॉटरप्रुफ काजळ आपल्या मेकअप किटमध्ये ठेवावा. याचा वापर तुम्ही आयलाइनर प्रमाणेही करू शकता.
कंसीलर
काही वेळेस चेहऱ्यावर पिंपल्स किंवा डाग पडतात. यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडले जाते. तसेच काही प्रोडक्ट्स वापरले तरीही ते लपले जात नाहीत. अशातच तुम्ही कंसीलरचा वापर करू शकता. डाग आलेल्या ठिकाणी कंसीलरचा वापर केल्यास ते दिसणार नाहीत.
लिपस्टिक
तुमच्या ऑफिसचा लूक कंप्लिट करण्यासाठी लिपस्टिक फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या बॅगेत लिपस्टिकच्या काही शेड्स ठेवा. गरज भासल्यास मॅट किंवा ग्लॉसी लिपस्टिकचा वापर करू शकता. लिपस्टिकचा वापर तुम्ही ब्लश प्रमाणेही करू शकता. खरंतर काही वेळेस आपण मीटिंगवेळी वेगळे दिसावे म्हणून लिपस्टिकचा वापर ब्लश म्हणून करू शकता. तसेच लिपस्टिक लावल्यानंतर दोन्ही ओठांमध्ये टिश्यू पेपर ठेवून ओठ एकमेकांवर प्रेस करा. त्यानंतर लिपस्टिक पुन्हा लावा. असे केल्याने लिपस्टिक दीर्घकाळ ओठांवर राहते. (Working women bag)
परफ्युम
ऑफिसमध्ये पूर्ण दिवस फ्रेश राहणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही एखाद्या परफ्युमचा वापर करू शकता. काही वेळेस प्रवास केल्यानंतर किंवा पूर्ण दिवस काम करताना परफ्युमचा वास निघून जाते. त्यामुळे बॅगेत एक बॉडी मिस्ट जरुर ठेवा. वेळोवेळी याचा वापर का. बॉडी मिस्ट खरेदी करताना हे पहा की, अधिक स्ट्राँन्ग नसावा.
हेही वाचा- Make up kit दुसऱ्यांसोबत शेअर केल्याने होईल नुकसान