Home » थंडीत फिरण्यासाठी जाणार असाल तर आधी ‘हे’ वाचा

थंडीत फिरण्यासाठी जाणार असाल तर आधी ‘हे’ वाचा

by Team Gajawaja
0 comment
Winter Vacation Travelling
Share

नाताळ आणि नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या दरम्यान आपल्या धकाधकीच्या शेड्युलमधून सुट्टी घेत शहराबाहेर जाण्यासाठी बहुतांश जण प्लॅन करतात. कारण फिरण्यासाठी जाणे हे मनाला शांत, शरिराचा थकवा दुर करण्यास मदत करते. फिरल्यामुळे व्यक्ती तणावातून थोडा बाहेर येतो आणि नव्या उर्जेसह कामावर परततो. जर तुम्ही सुद्धा या सुट्ट्यांमध्ये परिवारासह फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.(Winter Vacation Travelling)

-तिकिटांची प्री-बुकिंग करा
प्रवास करतेवेळी सर्वाधिक मोठी चिंता अशी असते की, येण्याजाण्यासाठी तिकिट मिळेल की नाही. तिकिटासह पिकअप आणि ड्रॉप ऑफ बद्ददल काही प्लॅनिंग केले पाहिजे. जर ते नसेल तर गोंधळ होऊ शकतो. अखेरच्या क्षणी जर तु्म्ही ही गोष्ट करणार असाल तर तुमचा मूड खराब होऊ शकतो आणि तुम्ही तणावाखाली येऊ शकता. काही वेळा प्लॅन केलेल्या गोष्टी सुद्धा वेळेवर होत नाहीत. त्यामुळे गरजेचे आहे की, तुम्ही आधीपासूनच तिकिट बुकिंग करा.

Winter Vacation Travelling
Winter Vacation Travelling

-योग्य माहिती एकत्रित करा
जर तु्म्ही प्रवास करण्यासाठी एका ठिकाणी जात असाल किंवा यापूर्वी जाऊन आला असाल तर तेथील वातावरण, रस्त्यांची स्थिती, टॅक्सी किंवा राहण्याची व्यवस्था याबद्दलची माहिती असते. मात्र तरीही पुन्हा एकदा त्यासंदर्भातील माहिती मिळवा. जर तुम्ही या गोष्टी प्लॅन करुन कराल तर अखेरच्या क्षणी तुम्हाला धावपळ करावी लागणार नाही.

-औषधं सोबत ठेवा
जर तुम्हाला आरोग्यासंदर्भातील एखादी समस्या असेल तर त्यावरील औषधं आपल्यासोबत घ्या. जर एखाद्या नव्या ठिकाणी आपत्कालीन स्थिती आल्यास तर प्राथमिक उपचारासाठी काही औषधं असणे गरजेचे आहे.(Winter Vacation Travelling)

-या काही महत्वाच्या गोष्टी
थंडीच्या दिवसात हॉटेल ग्राहक काही सुविधा देतात. लक्षात ठेवा की, तुम्हाला हॉटेलकडून एक्स्ट्रा फॅसिलिटी दिली जात आहे की नाही हे सुद्धा पहा. काही खास पर्यटन ठिकाणांपैकी अशा ठिकाणी जा जेथे गर्दी कमी असेल आणि तुम्हाला घरातील मंडळींसोबत उत्तम वेळ घालवता येईल. तुमच्यासोबत डेबिट आणि क्रेडिट कार्ड सुद्धा ठेवाच. पण काही पैसे ही असू द्या.

हे देखील वाचा- जेवल्यानंतर शतपावली करण्याचे काय फायदे होतात?

-सामानाची काळजी घ्या
प्रवास करताना तुमच्याकडे एकापेक्षा अधिक बॅग्स असतात. त्यामुळे काही वेळेस सामानाची अदलाबदली होती. त्यामुळे तुमच्या बॅगला प्रवास करताना एखादा टॅग लावा. ज्यावर तुमचे नाव सुद्धा असेल. यामुळे तु्म्हाला जरी बॅग इथेतिथे गेली तरी ती मिळण्यास मदत होईल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.