Home » Winter Healthy Beverages : हिवाळ्यात मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी हॉट बेव्हरेज! रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या 5 स्वादिष्ट ड्रिंक्स

Winter Healthy Beverages : हिवाळ्यात मुलांसाठी हेल्दी आणि टेस्टी हॉट बेव्हरेज! रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या 5 स्वादिष्ट ड्रिंक्स

by Team Gajawaja
0 comment
Winter Healthy Beverages
Share

 Winter Healthy Beverages   : हिवाळा सुरू झाला की मुलांच्या तब्येतीची सर्वात जास्त काळजी पालकांना लागते. थंडीमुळे सर्दी-खोकला, ताप, घसा बसणे यांसारख्या समस्या वाढतात. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे आहार आणि गरम पेय मुलांना दिल्यास त्यांचे आरोग्य चांगले राखता येते. गरम, पौष्टिक आणि चविष्ट ड्रिंक्स मुलांना सहज आवडतात आणि शरीरात उष्णता देखील ठेवतात. चला तर जाणून घेऊया अशाच काही हेल्दी आणि टेस्टी हॉट बेव्हरेज आयडियाज, जे तुम्ही घरच्या घरी झटपट बनवू शकता. ( Winter Healthy Beverages)

Winter Healthy  Beverages

Winter Healthy Beverages

हळद-दुध: नैसर्गिक अँटीबायोटिक हळद आणि दूध हे घराघरात मिळणारे आरोग्यदायी संयोजन. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक गुण असतात. थंडीमध्ये मुलांच्या घशाच्या त्रासावर, सर्दी-खोकल्यावर हळद-दूध रामबाण उपाय आहे. झोपण्यापूर्वी गरम हळद-दूध दिल्यास झोपही चांगली लागते आणि शरीराची ताकद वाढते. आणखी पौष्टिकतेसाठी त्यात थोडे मध किंवा खजूर घालू शकता. ( Winter Healthy Beverages)

Winter Healthy  Beverages

Winter Healthy Beverages

 हॉट चॉकलेट: मुलांचा आवडता ड्रिंक हिवाळ्यात मुलांना सर्वात जास्त आवडणारा ड्रिंक म्हणजे हॉट चॉकलेट! परंतु बाजारातील जास्त साखर असलेल्या पावडरऐवजी घरच्या घरी डार्क कोको वापरून बनवा. त्यात दूध, थोडा मध किंवा गूळ मिसळा. चॉकलेटमधील अँटिऑक्सिडंट्स शरीराला ताकद देतात आणि मूडमध्ये उत्साह निर्माण करतात. शिवाय मुलांना हे आवर्जून प्यायला आवडतेच!

=====================

हे देखील वाचा :

Winter : थंडीच्या दिवसात कशा पद्धतीचा आहार असावा?

Turmeric Water : थंडीच्या दिवसात हळदीचे पाणी पिण्याचे फायदे                                                                        

Weight Loss : दिवाळी झाली मात्र आता वजन वाढीची चिंता सतावते? मग फॉलो करा ‘या’ टिप्स

======================

Winter Healthy  Beverages

Winter Healthy Beverages

ड्रायफ्रूट मिल्क: ताकद आणि उर्जा देणारे काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांसारख्या सुकामेव्यामुळे हिवाळ्यात मुलांची उर्जा आणि पचनक्षमता दोन्ही चांगली राहते. गरम दुधात सुकामेव्याची पेस्ट घालून हे हेल्दी ड्रिंक तयार करता येते. रोज रात्री किंवा सकाळी एक ग्लास दिल्यास वजन चांगले वाढते आणि स्मरणशक्ती सुधारते. शाळा किंवा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हा परफेक्ट पर्याय.

Winter Healthy  Beverages

Winter Healthy Beverages

सूप: व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा खजिनाहिवाळ्यात भाज्यांचे सूप मुलांना पचायलाही सोपे आणि चवीलाही छान. टोमॅटो सूप, पालक सूप, गाजर-बीट सूप हे सर्व व्हिटॅमिन्स आणि आयर्नने परिपूर्ण असतात. गरमागरम सूप मुलांच्या शरीरात उष्णता निर्माण करतं आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट करतं. थोडे क्रुटॉन्स किंवा पालक-चीज घातल्यास मुलांना आणखी आवडेल. ( Winter Health Beverages)

Winter Healthy  Beverages

Winter Healthy Beverages

 आले-मध चहा: खोकल्यावर उपाय मुलांना चहा जास्त देऊ नये, परंतु हिवाळ्यात आले-मध घालून अगदी हलकासा चहा दिल्यास सर्दी-खोकला दूर होतो. आले शरीर गरम ठेवते आणि मध घशातील खवखव कमी करतो. परंतु हे पेय फक्त 5 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आणि तेही अधूनमधून देणे योग्य. या सर्व गरम पेयांसोबत मुलांना कोमट पाणी, पुरेशी झोप, आणि संतुलित आहार देणेदेखील महत्वाचे आहे. घरच्या घरी बनणारी ही हेल्दी आणि स्वादिष्ट ड्रिंक्स मुलांना आवडतीलच, शिवाय हिवाळ्यातील तब्येतीच्या तक्रारींनाही दूर ठेवतील. ( Winter Healthy Beverages)

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.