Home » हिवाळ्यात संत्री खा आणि निरोगी राहा

हिवाळ्यात संत्री खा आणि निरोगी राहा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Oranges for Health
Share

ऋतू बदलला की बाजारात मिळणाऱ्या गोष्टींमध्ये देखील बदल होताना दिसतो. म्हणजे पावसाळ्यात मिळणाऱ्या छत्र्या, रेनकोटची जागा थंडी लागली की, स्वेटर कानटोप्या घेतात. तसेच भाज्या आणि फळांच्या बाबतीतही असते. ऋतूनुसार बाजारात त्या त्या सिझनमधली फळे आणि भाज्या यायला सुरुवात होते. थंडीच्या दिवसात पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर येतात तसेच फळांमध्ये संत्र्याची अवाक खूप वाढलेली दिसते.

आजच्या काळात तर कोणतेही फळ क्वचित अपवाद वगळता वर्षभर मिळतात. मात्र त्या त्या सीझनमध्ये मिळणाऱ्या फळांचे आणि भाज्यांचे महत्व त्याच सीझनमध्ये असल्याने प्रत्येक सीझनचे वैशिष्ट्य असणारे पदार्थ इतर वेळेस खाल्ले तर चालते मात्र त्या सीझनमध्ये खाल्लेच पाहिजे. प्रत्येक सीझनमध्ये काही ठराविक फळं येतात. फळं खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक अर्थाने चांगले आहे.

फळांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. फळे जीवनसत्त्वे आणि खनिजे, फायटोन्यूट्रिएंट्सचे भांडार आहेत. दुसरीकडे, बहुतेक फळांमध्ये कॅलरीज देखील कमी प्रमाणात आढळतात आणि ते फायबरने समृद्ध असतात. त्यामुळे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांमध्ये या फळांचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. आता संत्री या फळाचे घ्या. हिवाळ्यात संत्री मोठ्या प्रमाणावर मिळते. थंडीच्या दिवसात बाजारात संत्र्यांची विक्री वाढते. सफरचंद आणि डाळिंबांबरोबरच संत्र देखील बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.

थंडीच्या दिवसात शरीराचा समतोल राखण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हंगामी फळे आणि भाज्या खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायक असते. संत्र्याला हिवाळ्यातील सुपरफूड देखील म्हटले जाते. ते रोज खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. संत्रींमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, जे हिवाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

आंबट, गोड रसाळ संत्री सर्वांनाच आवडते. हिवाळ्यात लोक हे फळ भरपूर खातात. मात्र ही संत्री थंडीच्या दिवसात घशाला त्रास होईल म्हणून, सर्दी खोकला होईल म्हणून खाणे अनेक लोकं टाळतात. मात्र जर हिवाळ्यात योग्य वेळेला संत्री खाल्ली तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला दिसून येईल. संत्री दुपारी १२ च्या आसपास खाऊ शकता. यामुळे तुम्हाला खोकला तसेच घश्यात खवखव देखील होणार नाही. संत्री संध्याकाळी किंवा रात्री खाणे टाळा.

जाणून घेऊया हिवाळ्यात संत्री खाण्याचे फायदे.

Oranges for Health

प्रतिकारशक्तीसाठी उत्तम
हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करता येते. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि मुक्त रॅडिकल्सपासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करते. हे रोज खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. संत्र्यामध्ये अँटीव्हायरल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म देखील आढळतात.

हृदयासाठी उत्तम
संत्री खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते. संत्र्यात असलेले फ्लेव्होनॉइड्स हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करतात. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी संत्री उत्तम आहे. एका अभ्यासानुसार संत्र्याचा रस प्यायल्याने उच्च रक्तदाब आणि वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. एका अभ्यासात असं दिसून आलं आहे, की संत्र्याच्या रसाचे दीर्घकाळ सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते, तर चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.

सर्दीपासून बचाव
थंडीत मध्ये आपल्या शरीरात व्हिटॅमिनसची कमतरता झाल्याने सर्दी होते. शरीरात सामान्य सर्दीमध्ये व्हिटॅमिन सी फायदेशीर असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने सर्दीपासून बचाव होतो.

वजन कमी होण्यास मदत
संत्र्यांमध्ये असलेले फायबर तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. कारण संत्र्यातील फायबर आपल्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते किंवा जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करते. यात फायबरदेखील चांगल्या प्रमाणात असते, जे पाचन आरोग्यास प्रोत्साहित करते.

त्वचेसाठी उत्तम
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे त्वचेसाठी चांगलं मानलं जातं. हे दररोज खाल्ल्याने त्वचा मुलायम आणि गुळगुळीत राहण्यास मदत होते. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-ए आणि ई देखील आढळतात. हे तिन्ही घटक त्वचा तरुण आणि सुंदर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. व्हिटॅमिन-सी त्वचेच्या थरांमध्ये कोलेजन तयार करते, ज्यामुळे आपली त्वचा तरुण दिसते. म्हणूनच त्वचेच्या आरोग्याच्या दृष्टीने संत्री खूप उपयुक्त आहे.

दात आणि हाडे मजबूतीसाठी
करतात संत्री दात आणि हाडांसाठीही खूप फायदेशीर आहे. कारण त्यात कॅल्शियम देखील आढळते, जे दात आणि हाडे मजबूत करते. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन-सी दातांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे या ऋतूत संत्री जरूर खावीत.

याशिवाय संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि विविध फ्लेव्होनॉइड्स यांसारख्या अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना हानिकारक फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जास्त वेळ पोट भरलेले राहण्यासाठी हे खाणे फायदेशीर ठरते. संत्री डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.