Home » सर्दी-खोकला झाल्यानंतर या फळांचे सेवन करणे टाळा

सर्दी-खोकला झाल्यानंतर या फळांचे सेवन करणे टाळा

हिवाळ्याचे दिवस सुरू झाल्याने काही आजार मागे लागतात. अशातच आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. पण सर्दी-खोकला झाल्यानंतर कोणत्या फळांचे सेवन करू नये याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
Winter Health Care
Share

Winter Health Care: हिवाळ्यात सर्दी-खोकला होणे सामान्य बाब आहे. पण सर्दी झाल्यानंतर त्यावर योग्य वेळीच उपचार करणे देखील महत्त्वाचे असते. याशिवाय यादरम्यान खाण्यापिण्याच्या सवयींकडेही लक्ष द्यावे. खासकरून कोणते पदार्थ खाऊ नयेत हे माहित असले पाहिजे. जेणेकरून सर्दी-खोकल्याचा त्रास वाढला जाऊ शकतो.

सर्दी-खोकला झाल्यानंतर कोणती फळं खाऊ नयेत हे देखील लक्षात ठेवणे तितकेच महत्त्वाचे असते. याबद्दलच जाणून घेऊया अधिक….

आंबट फळं
रात्री संत्र, लिंबू सारखी आंबट फळांचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास वाढला जाऊ शकतो. आंबट फळांमुळे रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power) वाढली जाते. पण सर्दी-खोकला झाल्यास अशी फळं खाणे टाळले पाहिजे.

उस
उसाचा रस उन्हाळ्यात बहुतांशजण पितात. यामुळे शरीर आतमधून थंड राहण्यास मदत होते. पण हिवाळ्यात उसाच्या रसाचे सेवन करणे टाळावे. उसाचा रस प्यायल्याने सर्दी-खोकल्याचा त्रास वाढला जाऊ शकतो.

Eating Fruits: Avoid These 5 Common Mistakes

केळं
केळं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. यामध्ये कॅरोटीनॉइड, ल्यूटिन, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन ए सारखे गुणधर्म असतात. मात्र सर्दी-खोकला झाल्यास केळं खाणे टाळावे. केळं खाल्ल्याने शरीरात म्यूकस वाढले जाते आणि अशातच सर्दी-खोकल्याचा त्रास बरा होण्याऐवजी वाढला जातो.

पेरू
पेरूमध्ये भरपूर प्रमाणात पोषण तत्त्वे असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन खूप प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. परंतु सर्दी-खोकला झाल्यानंतर याचे सेवन करणे टाळावे. यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होण्याऐवजी वाढेल. लक्षात ठेवा पेरूचे नेहमी सकाळच्या वेळेस सेवन करावे. कारण रात्री खाल्ल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. (Winter Health Care)

स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमध्ये कार्बोहाइड्रेट, कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, प्रथिने, मॅग्नेशिअम, फायबर, फ्रुक्टोज, सुक्रोज, व्हिटॅबिन बी6 आणि अन्य पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. पण सर्दी-खोकला झाला असल्यास स्ट्रॉबेरीचे सेवन करू नये. कारण यावेळी स्ट्रॉहेरी शरीरात हिस्टामाइन कंपाउंड रिलीज होत सर्दी-खोकल्याचा त्रास वाढला जातो.

टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.


आणखी वाचा: 
वजन कमी करण्यासाठी Intermittent Fasting करताय? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
हेल्दी राहण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर ‘या’ चूका करणे टाळा
थंडीत हातपाय सूजतात का? करा हे घरगुती उपाय

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.