हिवाळ्यामध्ये अनेकांना सर्दी खोकल्यामुळे कानदुखीचा त्रास होतो. बर्याचदा लोकांना असे वाटते की कानदुखी ही फक्त थंड हवामान आणि वाऱ्यामुळे होते, परंतु त्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. कानाचे दुखणे असह्य आणि वेदनादायी असते. कान दुखण्यामागची कारणे निरनिराळी असू शकतात. कधी इनफेक्शन तर कधी कानात मळ साचल्यामुळे कान दुखू लागतो. बऱ्याचदा थंडीत वातावरणात बदल झाल्यामुळे कानातून वेदना जाणवतात. कानात पाणी गेल्यास अथवा थंड हवा शिरल्यास कान प्रचंड दुखतात. त्यामुळे ऐकू कमी येते, डोके दुखू लागते. (Ear Pain)
अशावेळेस आपण कानात टाकण्यासाठी विविध प्रकारचे इअर ड्रॉप्स देखील आणतो मात्र त्याचा देखील फार उपयोग होत नाही. दुखापत, संसर्ग, कानात जळजळ यामुळे कान दुखू शकतात. जबडा किंवा दातदुखीमुळेही कान दुखीची समस्या निर्माण होते. संसर्गामुळे कानात वेदना होतात. याशिवाय पोहणे, हेडफोन वापरणे, कानात कापूस किंवा बोट घातल्यामुळे कानाच्या बाहेरील बाजूसही संक्रमण होऊ शकते. कानाच्या आतील त्वचा सोलली गेल्यामुळे किंवा कानात पाणी गेल्यामुळे संसर्ग होऊ शकतो. (Winter and ear pain)
श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे कानात मध्यभागी संसर्ग होऊ शकतो. कानात गोठलेले द्रव स्त्राव देखील बॅक्टेरियांना कारणीभूत ठरतो. लॅबीरिंथाइटिसमुळे कान आतून सूजण्यास सुरुवात होते. याशिवाय हवेचा दाब, कानातला मळ, घसादुखी, सायनस इन्फेक्शन, कानात शॅम्पू किंवा पाणी जाणे, कापूस घालणे, टेम्पोरोमेडीब्युलर जॉइंट सिंड्रोम, कान टोचणे, दात दुखी, कानात एक्झिमा ही देखील कान दुखीची करणे आहेत. मात्र जर थंडीत वातावरण बदलल्यामुळे कान दुखत असतील तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.
कान झाकून ठेवा
कानांचे रक्षण करण्यासाठी टोपी, हेडबँड किंवा इअरमफ्स वापरा. कानांची झाकणी गरम ठेवण्यासाठी जाड आणि उबदार सामग्रीच्या हेडगियरचा वापर करा. (Health Care)
कानांना मसाज करा
कानांना सौम्य मसाज करा, यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि कान गरम होतात. हळुवारपणे कानांच्या पाठीवर आणि कानांच्या आसपासच्या भागावर हलके मसाज करा.

आल्याचा रस
कान दुखीपासून सुटका मिळण्यासाठी कानात आल्याचा रस टाकला जातो. कारण आलं हे अॅंटि इनफ्लैमटरी आहे. ज्यामुळे कानाचे दुखणे यामुळे लगेच बरे होते. यासाठी नारळाच्या तेलात थोडा आल्याचा रस मिसळा आणि थोडं कोमट करून थंड झाल्यावर कानात टाका.
गरम कपड्यांचा वापर करा
जर कान गार होऊन ठणकायला लागले असतील तर एक गरम टॉवेल किंवा गरम पॅड कानांच्या जवळ ठेवा. हे तुमच्या कानांना उब देईल. थोड्या वेळासाठी कानांवर गरम पाण्याचे बोट ठेवूनही आराम मिळू शकतो. (Winter Health)
तुळशीचा रस
तुळशीची पानं वाटून त्याचा रस कानात घालावा. दिवसात असं किमान दोन ते तीन वेळा करावं. यामुळे कान दुखणं कमी होतं आणि इन्फेक्शनही जातं.
तापमान नियंत्रित ठेवा
थंड वातावरणात बाहेर पडताना किंवा हिवाळ्यात घरचे वातावरण देखील थंड झाले असेल तर तापमान नियंत्रित ठेवा. घरातील आणि बाहेरच्या हवेमधील मोठ्या फरकामुळे कानात ठणके येऊ शकतात. (Marathi)
लसूण
कानाचे दुखणे बरे करण्यासाठी लसूण अतिशय प्रभावी घरगुती औषध आहे. कारण लसणामध्ये अॅंटी बॅक्टेरिअल गुणधर्म आहेत. ज्यामुळे कानात झालेले इनफेक्शन लगेच बरे होते. यासाठी तेलात चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून ते गरम करा आणि थंड झाल्यावर हे तेल कानात घाला. (Todays Marathi Headline)
कांदा
कांद्यामध्ये शरीराला थंडावा देणारे गुणधर्म आहेत. कानात इनफेक्शन झाल्यास कान जोरात ठणकू लागतो. अशा वेळी कानातून येणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा वापर करू शकता. यासाठी कांद्याचा रस काढा आणि कानात त्याचे काही थेंब टाका. (Marathi News)
टी ट्री ऑईल
कानाचे इनफेक्शन कमी करण्यासाठी तुम्ही कानात टी ट्री ऑईल टाकू शकता. यासाठी तिळाच्या तेलात दोन ते चार थेंब टी ट्री ऑईल टाका आणि कोमट करून थंड झाल्यावर कानात टाका. ज्यामुळे काही वेळात तुमच्या कानातील वेदना नक्कीच कमी होतील. (Latest Marathi News)
कान धुवा आणि कोरडे ठेवा
थंडीमुळे कान गार होऊ शकतात. जर कान ओले झाले असतील, तर त्यांना लगेच कोरडे करा. ओले कान असेल तर संक्रमण होऊ शकते. त्यामुळे कान कोरडे ठेवणे महत्त्वाचे आहे. (Top Marathi Headline)
कडुलिंब
दोन ते तीन थेंब कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा कडुलिंबाच्या तेलाचे दोन ते तीन थेंब कानात घालावे. यामुळे कान दुखीपासून आराम मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडुलिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात टाकली तर कोणतंही इन्फेक्शन होत नाही.
=========
Migraine : हिवाळ्यात वाढतो का माइग्रेनचा धोका? तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे मार्गदर्शन
Alcohol : हिवाळ्यात दारू प्यायल्याने खरंच सर्दी खोकला बरा होतो? जाणून घ्या सत्यता
Thyroid : जगभरात वाढत आहेत थायरॉईड कॅन्सरचे रुग्ण ही आजारपणं लाइलाज आहे का ?
=========
कानांचे इन्फेक्शन टाळा
कान ठणकण्याची एक कारण इन्फेक्शन देखील असू शकते. कान प्रचंड ठणकत असेल, तसेच कानातून पिळवट द्रव येत असेल तर डॉक्टरांची मदत घ्या. (Top Stories)
नियमित तपासणी करा
थंडीत, विशेषत: लहान मुलांच्या कानांमध्ये ठणकणे, ऐकण्यासंबंधी समस्यांचा धोका वाढतो. त्यामुळे मुलांचे कान आणि शरीराच्या इतर भागांची काळजी घ्या. (Top Trending News)
कानात तेलाचा वापर करा
कानात हलके औषधी तेल तुम्ही घालू शकता, जसे की ऑलिव्ह ऑईल, बदाम तेल कानात टाकून कानांचा मऊपणा राखता येऊ शकतो. ते कानांना नॅचरल मॉइश्चरायझेशन देण्याचे काम करतील. (Social News)
(टीप : कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
