Winter Care Tips : काहीजणांना हिवाळा असो किंवा उन्हाळा घाम येण्याची समस्या जाणवते. याला वैज्ञानिक भाषेत हाइपरहाइड्रोसिस नावाने ओळखले जाते. खरंतर ही गंभीर समस्या नाही. पण यामुळे काही लोकांना लाज वाटते. पायांना घाम येत असल्याने शूज घालणे ही मुश्किल होते. कारण शूज आणि पायांमधून निघाणाऱ्या घामामुळे दुर्गंधी येते. तुम्ही सुद्धा हातापायांना येणाऱ्या घामाच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? पुढील काही उपाय नक्की करू शकता.
ग्रीन टी
अँटी-ऑक्सिडेंट्स आणि माइक्रोन्युट्रिएंट्सयुक्त ग्रीन टी आपल्या शरीराला हेल्दी राहण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. यामुळे दररोज ग्रीन टी प्या.
कॅमोमाइल टी
ही चहा थंड असून यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स, अँन्टी-इंफ्लेमेंटरी आणि अँन्टी-पर्सपिरेंट गुणधर्म असतात. ज्या लोकांना हाय हाइड्रोसिसची समस्या असते त्यांनी कॅमोमाइल टी चे सेवन करावे.

Winter Care Tips
टी ट्री ऑइल
तज्ञांच्या मते, टी ट्री ऑइलचा वापर केल्याने घामाच्या माध्यमातून निघणाऱ्या दुर्गंधीची समस्या कमी होते. यासाठी घाम येणाऱ्या ठिकाणी तुम्ही टी ट्री ऑइलचा वापर करा. टी ट्री ऑइल लावण्यासाठी त्यामध्ये नारळाचे तेल मिक्स करा आणि नंतरच लावा. (Winter Care Tips)
दूधी
असे मानले जाते की, हात किंवा पायांना दूधी घासल्याने घाम येण्याची समस्या कमी होऊ शकते. यासाठी दूधी कापून घेऊन त्याचा सफेद भाग घाम येणाऱ्या ठिकाणी घासा. पण हा उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.
टीप : या लेखात माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘kalakrutimedia.com’ याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.