Home » थंडीमुळे त्वचा कोरडी होऊन काळवंडलिये? उजळ त्वचेसाठी करा हे ६ उपाय (Winter care tips)

थंडीमुळे त्वचा कोरडी होऊन काळवंडलिये? उजळ त्वचेसाठी करा हे ६ उपाय (Winter care tips)

by Correspondent
0 comment
Winter care tips: 6 tips to maintain skin glow Marathi info
Share

अचानक वाढलेल्या थंडीमध्ये त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. चेहऱ्यावर ग्लो येणं काही वेळा कठिण वाटू लागतं कारण बदलतं तापमान आणि प्रदुषणाचा सगळ्यात वाईट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. याचा अनुभव तुम्ही सध्याच्या थंडीत घेतच असाल. हिवाळ्यात कोरडेपणामुळे आपल्या चेहऱ्याची चमक जाते. आपण आपल्या शरीराकडे जितकं लक्ष देतो तेवढं आपण आपल्या त्वचेकडे देत नाही. चेहऱ्यासोबतच त्वचेची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. 

कडाक्याच्या थंडीत तुमची त्वचा निर्जीव, रखरखीत आणि कोरडी दिसायला लागली आहे का? सतत बदलणाऱ्या तापमानात त्वचेची, चेहऱ्याची नेमकी काळजी कशी घ्यायची, असा प्रश्न पडलाय का?  काळजी करु नका, काही घरगुती उपाय करुन (Winter care tips) आपण थंडीतही आपली त्वचा टवटवीत, मुलायम, ग्लोईंग ठेऊ शकतो. 

तजेलदार त्वचेसाठी ६ महत्वाच्या टिप्स (Winter care tips) –

१. फेस वॉश आणि मॉइश्चराइझर्स बदलणे: 

बदलत्या ऋतुनुसार आपण आपले फेस वॉश आणि मॉइश्चराइझर्स बदलणे फार आवश्यक आहे. फेसवॉश आणि मॉइश्चराइझरची निवड करताना त्यातील घटक हवामानातील बदलाप्रमाणे तुमच्या त्वचेवर सकारात्मक परिणाम करणारे असतील, याची खात्री करुन घ्या. 

२. आंघोळीचं पाणी कोमट असणे:

थंडी वाढली म्हणून वाफाळलेल्या कडक गरम पाण्याने आघोंळ करणं त्वचेसाठी अपायकारक ठरु शकतं. त्यामुळे हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी. अति गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. आंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावायला विसरु नका. त्यामुळे तुमची त्वचा मऊ होईल.

३. योग्य प्रमाणात पाणी पिणे:

हिवाळ्यात आपल्याला तहान कमी लागते, परिणामी आपण पाणी कमी पितो. त्यामुळे त्वचेचा ओलावा नाहीसा होऊन त्वचा कोरडी दिसू लागते. जर दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी किंवा फळांचे ज्यूस प्यायलो, तर त्वचेचा ओलावा टिकून राहायला मदत होते. त्यासाठी पाणी, लिंबूपाणी, नारळपाणी प्यायला हवं.

४. आहाराकडे लक्ष देणे:

हिवाळ्यात हंगामी फळं बाजारात उपलब्ध असतात. या मोसमात मिळणाऱ्या हिरव्या भाज्या, फळं यांचा आहारात समावेश करुन घेणं, आपल्या त्वचेसाठीही फायद्याचं असतं. यामुळे आपली त्वचा निरोगी, चमकदार राहायला मदत होते.

५. त्वचेची स्वच्छता राखणे:

त्वचेची काळजी घेताना त्वचा स्वच्छ ठेवणे महत्त्वाचं आहे. यासाठी बेसन (हरभरा डाळीचं पिठ), चिमुटभर हळद आणि दोन चमचे दही एकत्र मिक्स करुन तयार केलेला पॅक चेहऱ्याला लाऊ शकता.

६. खोबरेल तेल वापरणे:

खोबरेल तेलामुळे त्वचेचं पोषण होतं. त्वचा निरोगी बनवण्यासोबतच खोबरेल तेल त्वचेचं आरोग्य सुधारायला मदत करतं, याने त्वचेचा टोन देखील संतुलित राहतो. यासाठी आंघोळीपूर्वी तुम्ही खोबरेल तेलाने मालिश करु शकता. यामुळे तुमची त्वचा दिवसभर चमकदार राहिल.

बऱ्याच जणांची त्वचा नाजूक म्हणजेच सेन्सिटिव्ह असते. अशावेळी सौम्य स्क्रब वापरणे, दुधाने चेहरा धुणे, लिपबाम वापरणे, फेशिअल करणे आणि व्हिटॅमिन सी युक्त सौंदर्य प्रसाधनं वापरणे आवश्यक आहेत.

टीप: ही प्राथमिक माहिती आहे. या टिप्सच्या आधारे (Winter care tips) कोणताही प्रयोग तुमच्या त्वचेवर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.

– वेदश्री ताम्हणे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.