Home » इलॉन मस्क भविष्यात ट्विटरची सर्व धुरा भारतीयाच्या खांद्यावर देणार?

इलॉन मस्क भविष्यात ट्विटरची सर्व धुरा भारतीयाच्या खांद्यावर देणार?

by Team Gajawaja
0 comment
Twitter Blue Tick
Share

सध्या दोन गोष्टी मोठ्या ट्रेंडवर आहेत.  एकतर ट्विटर आणि दुसरे म्हणजे ट्विटरचे सर्वेसर्वा झालेले इलॉन मस्क…इलॉन मस्क यांनी सोशल मिडीयाचे प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरवर आपले संपूर्ण नियंत्रण मिळवल्यावर सर्वत्र या दोघांचीच चर्चा आहे.  ट्विटरचा ताबा मिळाल्यावर इलॉन मस्क यांनी ट्विरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिका-यांना घरचा रस्ता दाखवला.  सोबतच ट्विटरवर ब्लू टिकसाठी पैसेही द्यावे लागणार हे स्पष्ट केलंय.  इलॉन मस्क हे असेच वादळी व्यक्तिमत्व आहे.  त्यांच्या पसंतीस उतरणं म्हणजे मोठी परीक्षाच असते.  पण असे असूनही एका भारतीयांनी मात्र त्यांना भुरळ घातली आहे.  इकतेच नाही तर इलॉन मस्क भविष्यात ट्विटरची सर्व धुरा या भारतीयाच्या खांद्यावर देणार अशी चर्चा आहे.  हा भारतीय म्हणजे श्रीराम कृष्णन.   मुळ चेन्नईचे असलेले श्रीराम कृष्णन यांनी मायक्रोस्फॉफ्ट सारख्या अनेक मान्यवर आयटी कंपन्यांमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे.  आता हेच श्रीराम (Indian Shri Ram Krishnan)इलॉन मस्क यांचे विश्वासू झाले आहेत.  लवकरच त्यांना ट्विटरमध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा चालू आहे.   

इलॉन मस्क यांनी ट्विटरची कमान हाती घेतल्यापासून ट्विटरमध्ये दररोज काही ना काही बदल करत आहेत.   प्रथम इलॉन मस्क यांनी पराग अग्रवाल या भारतीय अभियंत्याला सीईओ या पदावरुन दूर केले.  तेव्हा इलॉन मस्क भारतीयांच्या विरोधी आहेत, अशीही ओरड झाली.  मात्र इलॉन मस्क यांचा स्वभाव हा पक्का व्यावसायिक आहे.  जिथून आपल्याला फायदा मिळतो, तिथे ते कायम असतात.  त्यामुळे एका भारतीयाला काढून त्याच्या जागी दुस-या भारतीयावर त्यांनी विश्वास ठेवला आहे.  या भारतीयाचे नाव आहे, श्रीराम कृष्णन(Indian Shri Ram Krishnan).  ट्विटर ताब्यात घेतल्यावर इलॉन मस्क यांनी श्रीराम यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.  श्रीराम कृष्णन चेन्नईचे आहेत.  कृष्णन आणि त्यांची पत्नी आरती राममूर्ती या दोघांचा जन्म चेन्नईत झाला.   या दोघांची भेट 2003 मध्ये इंजिनिअर कॉलेजमध्ये झाली.  दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होते.   पदवी घेतल्यावर त्यांनी लग्न केले.  आता या जोडप्याला 2 वर्षांची मुलगी आहे.  2005 मध्ये हे कुटुंब अमेरिकेला स्थायिक झाले.  

कृष्णन यांनी ट्विटर पूर्वी याहू, फेसबूकमध्येही महत्त्वाचा पदावर काम केले आहे. मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी ट्विटरवरही काम केले आहे.  2017 मध्ये श्रीराम (Indian Shri Ram Krishnan)यांनी ट्विटरच्या मुख्य ग्राहक उत्पादन टीमचे नेतृत्व केले होते.  विशेषतः श्रीराम ट्विटरवर यूजर इंटरफेस हाताळत होते.  एवढचं नाही तर फेसबुक मध्ये काम करतांना त्यांनी मोबाइल जाहिरातींची प्रणाली विकसीत केली.   इलॉन मस्क  आणि श्रीराम कृष्णन यांची भेट एक टिव्ही शोच्या दरम्यान झाल्याचे सांगण्यात येते.  इलॉन मस्क यांनी श्रीराम यांच्या कामाची माहिती घेऊन त्यांना ट्विटरमध्ये आपल्या सोबत घेतले आहे.  श्रीराम कृष्णन यांना क्रिप्टोकरन्सीमध्येही खूप रस आहे.  म्हणूनच ते क्रिप्टो करन्सी स्टारअप्सवरही लक्ष ठेवतात.  यामुळेही इलॉन मस्क आणि त्यांची जवळीक वाढल्याचे सांगितले जाते.  अलीकडेच कृष्णन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ट्विटर (Indian Shri Ram Krishnan)चालवण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती म्हणजे इलॉन मस्क असल्याचे म्हटले आहे,  यावरुनच इलॉन मस्क आणि श्रीराम कृष्णन यांची किती जवळीक आहे, याचा अनुमान काढण्यात येतोय. 

==========

हे देखील वाचा : ऋषी सुनक यांच्यासोबत प्रज्वल पांडे नावाच्या 19 वर्षीय तरुणाचेही नाव चर्चेत

========== 

श्रीराम कृष्णन ट्विटरमध्ये मोठे बदल करू शकतात.  इलॉन मस्क ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यासाठी उत्सुक आहेत.  या बदलांमध्ये श्रीराम कृष्णन त्यांचे भागीदार असतील.  ट्विटर आता ब्लू टिक व्हेरिफिकेशनसाठी युजर्सकडून शुल्क आकारणार आहे.टेस्ला, रॉकेट कंपनी स्पेसएक्स,  ब्रेन-चिप स्टार्टअप न्यूरालिंक,  द बोरिंग यासारख्या मोठ्या कंपन्यांचे सीईओ असलेले इलॉन मस्क आता ट्विटरचेही सर्वसर्वा झाले आहेत.  पण या ट्विटरचा अधिभार लवकरच श्रीराम कृष्णन यांच्याकडे देऊन ते स्पेसएक्सच्या आगामी चंद्रमोहीमांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याची चर्चा आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.