Home » पृथ्वीवर 4 लाख किलो वजनाची वस्तू पडणार ?

पृथ्वीवर 4 लाख किलो वजनाची वस्तू पडणार ?

by Team Gajawaja
0 comment
Damage Earth
Share

4 लाख किलो वजनाची एखादी वस्तू पृथ्वीवर पडली तर काय होईल.  अर्थातच विचारही करता येणार नाही, येवढे मोठे नुकसान पृथ्वीचे होणार आहे.  शिवाय अंतराळातून ती वस्तू येतांना तिचा वेग किती असेल यावरही हे नुकसान अवलंबून राहणार आहे.  या सर्वांबाबत आता नासा, म्हणजेच अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था स्वतंत्ररित्या अभ्यास करीत आहे.  म्हणजेच भविष्यात पृथ्वीवर  4 लाख किलो वजनाची वस्तू पडण्याची भीती नासाला वाटत आहे.  ही वस्तू म्हणजे, मानवनिर्मित आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे. (Damage Earth)

अनेक देशांच्या सहभागातून तयार झालेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक सध्या या देशांसाठी धोकादायक ठरले आहे.  हे स्थानक अंतराळ संशोधकांसाठी मोठे वरदान ठरले होते.  पण त्याचा खर्चही तेवढाच मोठा आहे.  हा खर्च आता या देशांसाठी मोठी अडचण ठरला आहे.  अमेरिकेनंही आपल्या अंतराळ संशोधन खर्चात मोठी कपात केल्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे भविष्य धोक्यात आले आहे. 

त्यामुळेच हे स्थानक बंद करुन ते पृथ्वीवर आणण्यात येणार आहे.  मात्र हे करतांना जराही चूक झाली तर हे स्थानक थेट पृथ्वीवर कोसळण्याची भीती आता नासाला वाटतेय.  त्यामुळेच हे स्थानक स्थलांतरीत करतांना काय काय काळजी घ्यायला हवी, यासाठी नासानं स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.  मात्र तोपर्यंत हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीवासीयांसाठी धोकादायकच असणार आहे. (Damage Earth) 

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीवर पडण्याची शक्यता नासाने व्यक्त केली आहे. अमेरिका, रशिया, कॅनडा आणि जपानसह जगातील 20 देशांनी मिळून 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अवकाशात पाठवले होते.  15 वर्षे अंतराळात असलेल्या या स्थानकाला आता पृथ्वीवर परत आणण्याची तयारी सुरू आहे.(Damage Earth)

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे 2011 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आले होते.  हे स्थानक आतापर्यंतचे सर्वात मोठे मध्यस्थ म्हणून कार्यरत राहिले.  विज्ञानाचा अनोखा अविष्कार म्हणून त्याच्याकडे बघितले गेले.  हे स्थानक म्हणजे, फुटबॉल मैदानापेक्षा मोठे आहे.  हा प्रकल्प राबवण्यासाठी जगभरातील सोळा देश एकत्र आले. त्यात अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि 10 युरोपीय देशांचा प्रत्यक्ष सहभाग आहे.  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक 27,724 किलोमीटर वेगाने पृथ्वीभोवती फिरते.  याच स्थानकाच्या माध्यमातून अनेक अंतराळ मोहिमा या देशांनी यशस्वी केल्या आहेत. 

आता हेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीवर पडू शकते, असा इशारा अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दिला आहे.  15 वर्षे कार्यरत असणारे हे स्थानक पृथ्वीवर परत आणण्याची मोठी जबाबदारी आता नासाला पार पाडायची आहे.  आत्तापर्यंत अनेक अंतराळवीरांनी या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक वापर अवकाशाशी संबंधित रहस्ये सोडवण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी केला आहे.  200 अधिक अंतराळवीर या स्थानकात राहिले आहेत.  आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून सुमारे 410 किलोमीटर अंतरावर आहे. 109 मीटर लांब अंतराळ स्थानकाचे वजन 4 लाख 50 हजार किलो आहे.  या स्थानकाच्या उभारणीसाठी $150 दशलक्ष खर्च झाले आहेत. 

त्यामुळेच हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजे, अवकाशातील जगातील सर्वात महाग वस्तू म्हणूनही ओळखले जाते.  अशा या महागड्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या देखभालीवरही हजारो डॉलर अमेरिकेला खर्च करावा लागत आहे.  हा खर्च आता परवडेनासा झाल्यामुळे मुदतीच्या आतच हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बंद करण्याची वेळ आली आहे.  नासाला हे स्थानक आणखी काही वर्षे अंतराळात ठेवायचे आहे.  परंतु ते जेवढे अधिक काळ अंतराळात राहिल, तेवढा त्याचा खर्च वाढेल आणि परत आणण्यासाठीचा खर्च आणि त्यातील धोकाही वाढणार असा एक निष्कर्ष काढण्यात आला.   हजारो कोटी रुपये या स्थानकाच्या पृथ्वीवरील स्थलांतरणासाठी खर्च होणार आहेत. (Damage Earth)

===========

हे देखील वाचा : घरात दररोज ‘या’ दिशेला लावा दिवा, होईल धनवर्षाव

===========

अमेरिकेने काही काळापूर्वी अंतराळ बजेटमध्ये कपात केल्यामुळे भविष्यातील यापेक्षाही अधिक खर्च उचलण्यास नासा असमर्थ आहे.  त्यामुळेच हे महत्त्वकांक्षी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक परत पृथ्वीवर आणण्यात येईल.  मात्र त्याच्यात अगदी काही सेकंदाचीही चूक झाली तर हा सर्व ढाचा थेट पृथ्वीच्यावरच आदळणार आहे.  यामुळे पृथ्वीला मोठा धोका असण्याची भीती आता नासानंच व्यक्त केली आहे.  नासाचे म्हणणे आहे की आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे लँडिंग नासासाठी सोपे नसेल. या प्रक्रियेदरम्यान काही निष्काळजीपणा झाल्यास पृथ्वीचे मोठे नुकसान होऊ शकते. (Damage Earth)

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आकाराने खूप मोठे आहे, त्यामुळे त्याला हानी झाली तर पृथ्वीवरील मोठ्या लोकसंख्येची हानी होऊ शकते.   नासा हे स्थानक, समुद्रात लॅंडींग करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.  पण नासाला वाटणा-या भीतीमुळे, चिंता व्यक्त होत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.