अमेरिकेतील विद्यापीठात सुरु असलेल्या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढली आहे. येथील ५० हून अधिक विद्यापीठात आंदोलन सुरु असून हे लोण अन्य विद्यापीठातही पसरण्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दोन आठवड्यापासून सुरु असलेल्या या आंदोलनात प्रथम आंदोलक विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित हार्वर्ड(Harvard University) विद्यापीठावर पॅलेस्टिनी ध्वज फडकवला. या घटनेनं संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली. हार्वर्ड विद्यापीठ अमेरिकेच्या शिरेपेचात मानाचा तुरा असल्याची भावना तेथील जनतेत आहे. अशावेळी या विद्यापीठाचा आंदोलनासाठी उपयोग व्हावा म्हणून नाराजी व्यक्त झाली.
यावेळी तब्बल ९०० विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. पण यांनी विद्यार्थी आंदोलन शांत झालेच नाही, तर या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आता अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गोंधळ घातला आहे. यावेळी चक्क विद्यापीठाची इमारतच विद्यार्थ्यांनी ताब्यात घेतली. विद्यापीठातील प्रतिष्ठीत अशा इमारतींचे नाव बदलले. हे सर्व चालू असतांना विद्यापीठात पोलीसांना प्रवेश करता आला नाही. पोलीसांना रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या फर्निचरचा वापर केला. अखेर वीस तासांनंतर पोलीस जबरदस्तीनं विद्यापीठात गेले. त्यांनी ५० अधिक विद्यार्थ्यांना अटक केली आहे. अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात गेल्या २ आठवड्यांपासून हा गोंधळ सुरु आहे. या आंदोलनामुळे अनेकांना दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विश्वविद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाची आठवण येत आहे.
जेएनयुमध्ये झालेले हे आंदोलनही अशाच स्वरुपाचे होते. येथील आंदोलनताही विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध टिका करत विद्यापीठ ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले होते. या विद्यार्थ्यांना काहींनी पाठिंबा दिला तर काहींनी त्यांचा विरोध केला. यात विद्यापीठाचे खूप नुकसान झाले. आता अमेरिकेतील प्रतिष्ठीत हार्वर्ड आणि कोलंबिया सारख्या विद्यापीठातही विद्यार्थी अशापद्धतीने आंदोलन करीत आहेत. या विद्यार्थ्यांनाही काही एनजीओ पैसे देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विद्यर्थ्यांना आणि त्यांच्या मागे उभ्या असणा-यांवर वेळीच कारवाई करावी अशी मागणी होत आहे. हार्वर्ड(Harvard University) आणि कोलंबिया मधील माजी विद्यार्थ्यांनीही या घटनेचा निषेध करत, विद्यापीठाची प्रतिष्ठा डागाळू नका असे आवाहन केले आहे.
अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात गेल्या २ आठवड्यांपासून गोंधळ सुरू आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस बळजबरीनं ताब्यात घेत आहेत. अनेक विद्यापीठात विद्यार्थी तंबू ठोकून आंदोलन करीत आहेत. या परिस्थितीनं विद्यापीठातील प्रशासन आणि पोलीसही गोंधळात पडले आहेत. आता या आंदोलकांचे उग्र स्वरुप पहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी चक्क पहाटेच एक होत कोलंबिया विद्यापीठाच्या इमारतीवर कब्जा केला. पॅलेस्टिनी ध्वज या इमारतीवर फडकवला. ‘फ्री पॅलेस्टाईन’ बॅनर या इमारतीवर लावण्यात आला. विद्यार्थ्यांनी या सर्व घटनेचे व्हिडिओ शूट करुन रेडिओ स्टेशनवरून प्रसारित केले. या विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाने माघार घ्यायला सांगून निलंबनाची भीती घातली. पण त्यानेही विद्यार्थी मागे झाले नाहीत.(Harvard University)
त्यांनी थेट विद्यापीठाच्या हॅमिल्टन बिल्डिंगमध्ये प्रवेश केला. हॅमिल्टन हे नाव बदलून ‘हिंद हॉल’ असे नाव लिहिलेले पोस्टर या इमारतीवर लावण्यात आले. हिंद रजब ही गाझामध्ये राहणारी ६ वर्षांची मुलगी होती. तिचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या सर्वात विद्यापीठाचे प्रचंड नुकसान आंदोलकांनी केले. शेवटी विद्यापीठाच्या इमारतीवर पोलीसांनी वीस तासांनी प्रवेश केला. त्यासाठी त्यांना शिड्यांचा वापर करावा लागला. त्यांनी पॅलेस्टिनी पोशाख घातलेल्या जवळपास १०० विद्यार्थ्यांना अटक केली. विद्यापीठ प्रशासनानं नंतर केलेल्या पाहणीत विद्यापीठाचे खूप मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच विद्यापीठातील अन्य विद्यार्थ्यांमध्ये भयाचे वातावरण आहे. त्यामुळे १७ मे पर्यंत पोलीसांना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच थांबण्याची विनंती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या ५० विद्यापीठात असेच वातावण असून यातून सुमारे हजारहून अधिक विद्यार्थ्यांना पोलीसांनी अटक केली आहे.
=========
हे देखील पहा : आंतरराष्ट्रीय विमानातील एअर हॉस्टेसचा किती असतो पगार?
=========
अमेरिकेत पेटलेल्या या विद्यार्थी आंदोलनात दिल्लीमधील जेएनयुच्या आंदोलनाची आठवण काढली जात आहे. जेएनयुमध्ये ९ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी भारताविरोधी घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा अनेकांनी निषेध केला. जेएनयुमधील विद्यार्थी आंदोलनही काही दिवस चालेल. त्यामुळे जेएनयुसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठावर प्रश्नचिन्ह विचारण्यात आले. याप्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमार आणि त्याचे दोन सहकारी उमर खालिद आणि अनिर्बन यांना अटक करण्यात आली होती. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत याच कन्हैया कुमारला कॉंग्रेस पक्षाने उत्तर पूर्वी दिल्लीच्या मतदारसंघातून तिकिट दिले आहे.(Harvard University)
सई बने