लोकसभा अन राज्यसभेच्या प्रतिनिधींच्या चर्चा टीव्हीवर तुम्ही बऱ्याच वेळा बघितल्या असतील. वर्तमानपत्रात विधिमंडळ सदस्यांच्या येणाऱ्या बातम्यांसोबत त्यांच्या सभागृहातील फोटोवर अन सभागृहाच्या फोटोवर नजर फिरवल्यावर एक फरक आपल्या कायम लक्षात येत राहतो. लोकसभा आणि राज्यसभा यांच्यात बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य असले तरी तो एक फरक मात्र प्रकर्षाने आपल्याला जाणवत राहतो. तो म्हणजे या दोन्ही सभागृहातील कार्पेटच्या रंगातील असलेला फरक! (Carpet Color)
तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल तर लोकसभेतील कार्पेटचा रंग (Carpet Color) हिरवा, तर राज्यसभेतील कार्पेटचा रंग (Carpet Color) लाल असतो. दोन्ही सभागृहातील कार्पेटच्या रंगात फरक का असतो? जाणून घेऊया.

संसदेची दोन सभागृहे आहेत. लोकसभा अन राज्यसभा. लोकसभेतील प्रतिनिधी हे थेट लोकांमधून निवडून जातात. पंचवार्षिक निवडणुकांमध्ये निवडले जाणारे प्रतिनिधी हे या सभागृहाचे सदस्य होतात. थेट लोकांमधून निवडून गेल्यामुळे या प्रतिनिधींची नाळ ही अगदी जमिनीच्या लोकांशी जोडलेली असते. हिरवा रंग हा गवताचा, शेतीचा अन झाडांचा रंग म्हणजेच अगदी तळागाळातील लोकांचा रंग. लोकसभेतील प्रतिनिधींच्या थेट लोकांशी असलेल्या संबंधांचे प्रतिक म्हणून येथील कार्पेटचा रंग (Carpet Color) हिरवा असतो.
राज्यसभेचे सदस्य हे थेट लोकांमधून निवडून गेलेले नसतात. लोकांमधून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या मतांवरून राज्यसभेच्या प्रतिनिधींची निवड केली जाते. त्यामुळे येथील सदस्यांचा तळागाळातील लोकांशी थेट संबंध नसतो. लाल रंग हा राजवैभव अन शहीद सैनिकांचं बलिदान यांचं प्रतिक मानला जातो आणि म्हणून राज्यसभेतील कार्पेट लाल रंगाचे असते. (Carpet Color)
एखाद्या प्रश्नाच्या चर्चेसाठी जेव्हा राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांना एकत्र बसायची पाळी येते, तेव्हा दोन्ही सभागृहातील सदस्य संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात जमतात. संसदेची इमारत वर्तुळाकार आकारची असून एडविन ल्युट्न्स या ब्रिटीश अर्कीटेक्टने या इमारतीचे बांधकाम केलेले आहे.
========
हे देखील वाचा : क्लिओपेत्रा ही आहे तरी कोण?
========
12 जानेवारी १९२१ रोजी संसद भवन बांधण्यास सुरुवात झाली. संपूर्ण संसद भवन बांधून पूर्ण होण्यास सुमारे सहा वर्षांचा कालावधी लागला. मध्यप्रदेशात चौसठ योगिनी नावाने ओळखले जाणारे एक प्राचीन मंदिर आहे आणि संसद भवनाची रचना या मंदिराच्या रचनेपासून प्रेरित आहे, असे समजले जाते. संसद भवन त्याकाळात जवळपास ८३ लाख रुपयांची अवाढव्य रक्कम खर्चून बांधण्यात आले होते. संसद भवनात सुसज्ज असे ग्रंथालय उभारण्यात आलेले आहे. देशातील सर्वात मोठे ग्रंथालय, म्हणून या ग्रंथालयाची ख्याती प्रसिद्ध आहे.
