जगात सर्वात जास्त चर्चिली जाणारी गाडी कोणती असं विचारलं, तर टेस्ला (Tesla) हे नाव उच्चारले जाते. सध्याच्या घडीला सगळीकडेच या गाडीची चर्चा आहे. आपण सर्वानी बाकी गाड्यांच्या जाहिराती दूरचित्रवाहिनीवर पहिल्या असतील. पण टेस्ला कंपनी गाड्यांची जाहिरात कधीही करताना दिसत नाही. तरी त्या कंपनीच्या गाड्या घेणाऱ्या ग्राहकांची संख्या खूप मोठी असल्याचे दिसून येत असते.
ऑटोमोटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये जाहिरात करण्यासाठी चढाओढ लागलेली असते. पण टेस्ला (Tesla) कंपनी मात्र कधीही त्यांच्या कार किंवा दुसऱ्या उत्पादनांची जाहिरात करताना दिसत नाही. तरीही टेस्ला कार घेणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. टेस्ला कंपनीची तुलना पहिल्या दहा कार कंपन्यांशी केल्यावर उरलेल्या ९ कंपन्यांची एकत्रित विक्रीही टेस्ला कंपनीला मागे टाकत नाही.
यावरूनच तुम्ही समजू शकता की, टेस्ला (Tesla) कंपनीच्या गाड्या घेणाऱ्या ग्राहकांची संख्या जगभरात किती जास्त आहे. टेस्ला ही गाडी जरी किमतीने महाग असली तरी तिची मागणी कायम वाढतेच आहे. या कंपनीचे मार्केट जवळपास १ मिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे. ऑटोमोटिव्ह गाड्यांची तुलना केली तर बाकी गाड्या मोठ्या प्रमाणावर जाहिरातींवर खर्च करत असून त्या प्रमाणात टेस्ला कंपनी मात्र एक रुपयाही खर्च करत नाही.
भारत देशात सर्वात जास्त गाड्यांची विक्री होते मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्यांची. या कंपनीचा वर्षाचा जाहिरातींवरील खर्च जवळपास ७०० ते ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आपण रस्त्याने चाललो, वर्तमानपत्रे उघडले किंवा दूरचित्रवाहिनीवर एखादा चित्रपट लावला, तर हमखास मारुती सुझुकीची जाहिरात दिसते.
विना जाहिरात टेस्ला (Tesla) कंपनीच्या गाड्या कशा विकल्या जातात हे मोठे रहस्य आहे. टेस्ला (Tesla) कंपनी जाहिरातीवर केला जाणारा खर्च रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागात केला जातो. त्यामुळे त्यांच्या गाड्यांमध्ये नव नवीन टेकनॉलॉजीचा वापर केला जातो. “कंपनीच्या संशोधन आणि तंत्रज्ञान विभागावर लक्ष केंद्रित करून त्यावर खर्च केल्यामुळे कंपनीला अधिक फायदा होतो”, असे ट्विट एलॉन मस्क यांनी केले होते.
सध्याच्या घडीला कोणाला म्हटले की, जगातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती कोण आहे, तर सगळे एलॉन मस्क नाव सांगून मोकळे होतील. मस्कच्या एका ट्विटवर शेअर बाजार वर खाली होतो तर कधी त्याच्या एका ट्विटवर नवीन कंपनीला फायदा मिळून जातो. काही लोकांसाठी मस्क हे प्रेरणादायी व्यक्ती आहेत त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे लोकांचे बारीक लक्ष असते.
====
हे देखील वाचा: मलेशियन एअरलाइन्स फ्लाईट 370 – एक न उलगलेलं कोडं!
====
टेस्ला कंपनी त्यांच्या गाड्यांमध्ये अशा सुविधा देते ज्यांचा लोकांनी फक्त स्वप्नात विचार केला असेल. गाडी चालवायला ड्रॉयव्हरची गरज पडते पण टेस्ला कंपनीने विना ड्रायव्हर गाडी चालवण्याची टेकनॉलॉजी शोधून काढलेली आहे. या गाड्यांमध्ये ऑटो पायलट, सॅन्ट्री मोड आणि डॉग मोड हे पर्याय दिलेले असतात.
स्पेस एक्स कंपनीच्या माध्यमातून एलॉन मस्क जेव्हा नवीन एखादे रॉकेट लाँच करत असतो तेव्हा अंतराळवीर टेस्ला कंपनीच्या गाड्यांचा वापर करतात. त्यामुळे गाड्यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात होते. सोबतच यु ट्यूब लाइव्हच्या माध्यमातून नवीन गाड्यांचे प्रमोशन कार्यक्रम होत असल्यामुळे विक्रीत आपोआपच वाढ होते.
====
हे देखील वाचा: Rahul Bajaj Passes Away: राहुल बजाज काळाच्या पडद्याआड!
====
सोशल मीडियावर सक्रिय असणारा मस्कचे ट्विटरवर त्याचे तब्ब्ल ६ कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर मस्क सातत्याने आपल्या उत्पादनाबद्दल ट्विट करतो. त्यामुळे मस्कला फॉलो करणाऱ्या लोकांकडून नकळत जाहिरात केली जाते. त्याचे नाव हाच एक ब्रँड असून दूरचित्रवाहिनी, वर्तमानपत्र आणि सोशल मीडिया सगळीकडे त्याचीच जादू चालू असते.
मस्कचा एखादा फोटो जरी पहिला तरी लोक चर्चा करतात ती त्याच्या कंपनीबद्दल! काही दिवसांपूर्वी रितेश देशमुख या मराठमोळ्या अभिनेत्याने टेस्ला गाडी घेतली होती. त्यानंतर सोशल मीडियावर सगळीकडे त्याचीच चर्चा होती. एलॉन मस्क हे नाव म्हणजेच एक ब्रँड आहे.
– विवेक पानमंद