Home » SHC Explained : आग नाही, केमिकल नाही तरी लोकं जळून राख व्हायची!

SHC Explained : आग नाही, केमिकल नाही तरी लोकं जळून राख व्हायची!

by Team Gajawaja
0 comment
SHC Explained
Share

२ जुलै १९५१ रोजी अमेरिकेतील सेंट पीटर्सबर्ग इथल्या एका अपार्टमेंटमध्ये एक धक्कादायक घटना घडली, ती घटना तेव्हा कळाली जेव्हा एका अपार्टमेंटच्या ओनरने तिच्या भाडेकरूच्या दारावर ठोठावलं, पण बराच वेळ दार उघडलं गेलं नाही. मग ओनरने जोरात दार ठोकला तेव्हा दार उघडलं गेलं, कारण ते दार ओपनच होतं. दार उघडल्यानंतर समोर जे दृश्य होतं ते पाहून घरमालकाच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या रूममध्ये समोरच्या खुर्चीवर ६७ वर्षांची मॅरी रिसर जळून पूर्ण राख झाली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजूबाजूची खुर्ची, भिंती, फर्निचर सगळं आहे तसं होतं. (SHC Explained)

फक्त मॅरीचं शरीर जळून गेलं होतं. पोलिसांना बोलावलं गेलं, त्यांनी तपास केला, पण त्यांना ठोस असं उत्तर सापडलं नाही. शेवटी असा निष्कर्ष काढला की, मॅरी सिगारेट ओढायची आणि सिगारेट पिता पिता ती जळून राख झाली. आता ही खरंतर अतिशयोक्ती झाली पण अशारीतीने तो मॅटर क्लोज झाला. पण ती बाई कशी मेली? हे यावेळीही रहस्यच राहिलं. आता तुम्हाला प्रश्न असेल या वेळी म्हणजे? म्हणजे या पूर्वीसुद्धा अशा पद्धतीने माणसं राख होण्याच्या घटना घडल्या होत्या. म्हणजे फक्त ती माणसं जळाली होती पण त्यांच्या आजूबाजूचं काहीचं नाही. कोणी जाळलं नाही, स्वतःला जाळून घेतलं नाही मग लोकांची राख कशी होत होती. काय होतं या घटनांमागचं रहस्य? जाणून घेऊ.

 SHC Explained

१७२५ साली फ्रान्समध्ये रेम्स शहरात निकोल मिलेट नावाची एक बाईचा तिच्या स्वयंपाकघरात पूर्ण राख झालेला मृतदेह सापडला. तिच्या नवऱ्यावर खुनाचा आरोप झाला, पण नंतर निर्दोष सुटका झाली, कारण कोणत्याही आगीचा पुरावा नव्हता. तिच्या शरीराखालील गादीही जळाली नव्हती. त्यानंतर १७३१ मध्ये इटलीत आणखी एक केस घडली, ज्यात एका बाईचं शरीर आगीशिवाय जळून गेलं. या घटना इतक्या विचित्र होत्या, की शास्त्रज्ञांना त्यावर अभ्यास करावा लागला.(SHC Explained)

यातूनच समोर आलं ‘स्पॉन्टेनियस ह्यूमन कंबशन’ म्हणजेच SHC! SHC म्हणजे, माणसाचं शरीर कोणत्याही बाह्य स्रोताशिवाय आतून जळून राख होणं. Genrally एखाद्या शरीराला जळण्यासाठी बाहेरून काहीतरी ज्वलनशील स्रोत हवा…. आग किंवा कोणतं केमिकल.. पण SHC च्या केसेसमध्ये असा काही स्रोत सापडत नाही. शास्त्रज्ञ सांगतात, की हे शरीराच्या आतून सुरू होतं, माणसाच्या पोटातून इतकी गरमी तयार होते जी नंतर हळू हळू संपूर्ण शरीरात पसरते. यामुळे संपूर्ण शरीर जळून राख होतं. पण या गरमीमुळे फक्त शरीराआत आगे सारखी प्रक्रिया होते, पण तिचा परिणाम बाहेरील वस्तूंवर होत नाही.

१९६६ मध्ये अमेरिकेत जॉन इर्विंग बेंटली नावाचा ९२ वर्षांचा डॉक्टरचा मृतदेह त्याच्या बाथरूममध्ये राख झालेला सापडला. अशा केसेस पाहून शास्त्रज्ञांनी अनेक थेअरी मांडल्या. पहिली थेअरी आहे ‘वीक इफेक्ट’. यात सांगितलं जातं, की माणसाचं शरीर मेणबत्तीसारखं असतं – कपडे बत्तीप्रमाणे आणि शरीरातील फॅट मेणासारखं. जर छोटीशी ठिणगी लागली, तर फॅट जळत राहतं आणि शरीर हळूहळू जळतं. पण SHC मध्ये ठिणगी कुठून येते? हे स्पष्ट होत नाही, त्यामुळे ही थेअरी पूर्णपणे स्वीकारली गेली नाही. दुसरी थेअरी आहे ‘स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी’. तुम्हाला आठवत असेल, केसात कंगवा फिरवला की कागद चिकटतो. असा स्टॅटिक चार्ज शरीरात तयार होऊन आग लागू शकते, असं काही म्हणतात. पण ही इलेक्ट्रिसिटी इतकी कमकुवत असते, की ती आग लावू शकत नाही. (Top Stories)

===============

हे देखील वाचा : Atharva Sudame : सोशल मीडिया स्टार असलेला अथर्व सुदामे किती पैसे कमावतो?

===============

मग आली ‘एन्झायमॅटिक एनिग्मा’ थेअरी. आपल्या पोटात मीथेन आणि हायड्रोजन गॅस तयार होतात, जे ज्वलनशील असतात. जर हे गॅस जमा झाले आणि ठिणगी मिळाली, तर आग लागू शकते. पण माणसात इतकं मीथेन नसतं. गायींमध्ये जास्त असतं, पण त्यांच्यात SHC च्या केसेस पाहिल्या मिळाल्या नाहीत. (SHC Explained)

त्यानंतर आली ‘अल्कोहल थेअरी’. दारू पितात, त्यांच्या शरीरात अल्कोहलमुळे ज्वलनशीलता वाढते. पण या केसेस अशा लोकांसोबत पण घडल्या होत्या जे दारू पित नव्हते. म्हणून या थेअरीवर सुद्धा विश्वास ठेवता येतं नाही. मग आली आणखी एक थेओरी ती म्हणजे कीटोसिस थिअरी. डायबिटीज किंवा उपवासामुळे शरीरात ग्लूकोज कमी होतं, तेव्हा लिव्हर फॅटपासून कीटोन्स बनवतं, ज्यात एसीटोन असतं, जे ज्वलनशील आहे. पण जे आजारी नव्हते त्या लोकांनाही SHC झालं, त्यामुळे या सगळ्या थेओरीज चुकीच्या ठरवल्या गेल्या.

आजही SHC चं नक्की कारण काय, हे शास्त्रज्ञांना ठोसपणे सांगता येत नाही. ज्यांची अचानक राख झाली ती कशी झाली याचं रहस्यसुद्धा आजही रहस्यच आहे.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.