श्रीकृष्ण जन्माष्टमी जशी जवळ येत आहे, तसा भक्तांमधला उत्साह अधिकाधिक वाढताना दिसत आहे. भारतातील महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणून जन्माष्टमीच्या सणाला ओळखले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री १२ च्या सुमारास श्रीकृष्णाचा जन्म झाला. कृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्याच दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. आजही राज्यभरात विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. (Dahihandi 2025)
मुंबई ठाण्यामध्ये तर दहीहंडीचे एक वेगळेच रूप आणि एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकंही सज्ज होतात. उंच दहीहंडी फोडण्यासाठी अनेक दिवस आधी या पथकांची तयारी सुरु होते, सराव सुरु होतात. दहीहंडीला सरकारने २०२२ मध्ये साहसी खेळ म्हणून मान्यता दिली आहे. मात्र या खेळामध्ये अनेक गोविंदांना यात आपले प्राण गमवावे लागतात तर काही जखमी होतात तर काहींना कायमस्वरूपाचे अपंगत्व येते. मात्र, दहीहंडी, गोपाळकालाचा इतिहास आणि याचे महत्त्व नक्की काय? याबद्दल माहिती जाणून घेऊयात. (Marathi News)
दहीहंडी हा भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांचे प्रतीक असलेला एक आनंदी सण आहे. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे. तिथे पोहचण्यासाठी श्रीकृष्ण त्याच्या मित्रांची मदत घ्यायचा. मित्रांच्या खांद्यावर चढून तो लोण्यापर्यंत पोहचायचा. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये दहीहंडी १६ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे, तर जन्माष्टमीचा उत्सव १५ ऑगस्टला साजरा होईल. द्वापार युगापासून सुरू झालेला हा उत्सव आजपर्यंत तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. (Todays Marathi Headline)
गोपाळकाला साजरा करण्यासाठी, प्रथम एक गोल मातीचे भांडे अर्थात हंडी दही किंवा लोणीने भरले जाते आणि उंच टांगले जाते. यानंतर गोविंदांची टीम किंवा पथक पिरॅमिड बनवून ही हंडी फोडण्याचा प्रयत्न करते आणि ती तोडणाऱ्या गोविंदांच्या टीमला विजेता म्हणतात आणि त्यांना बक्षीसही दिले जाते. दहीहंडीलाच गोपाळकाला किंवा गोविंद उत्सव म्हणूनही ओळखले जाते. या पथकात तरुण-तरुणींचा समावेश असतो. एक व्यक्ती दुसऱ्याच्या खांद्यावर उभे राहून मानवी मनोरा बनवते आणि सर्वात वर असलेली व्यक्ती हंडी फोडते. या मडक्याचा तुकडा मिळाला तर घरी आणून सांभाळून ठेवला जातो. त्याने घरात समृद्धी येते अशी भावना आहे.(Marathi Trending Headline)
धार्मिक कथांनुसार, श्रीकृष्ण लहानपणी शेजारच्या घरातून भांडी फोडून लोणी चोरत असत. म्हणूनच त्यांचे एक नाव माखनचोर होते. भगवान श्रीकृष्णाच्या या बालपणाला ठळकपणे किंवा चित्रित करण्यासाठी दरवर्षी जन्माष्टमीनंतर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. याला गोपाळकाला किंवा दहीकाला असेही म्हणतात. जन्माष्टमीमध्ये दहीहंडी सणाला विशेष महत्त्व आहे. भगवान श्री कृष्णाच्या बालपणीच्या करमणुकीचा हा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग असल्यामुळे दहीहंडी हा सण त्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की, ज्या घरात लोणी चोरण्यासाठी भांडे फोडले जाते, तेथे दु:ख नसते आणि घर सुखाने भरून जाते. (Top Trending News)
कृष्णाचा जन्म अनेक उद्देशांनी झाला होता. त्यांच्या जन्माच्या लीला अनेक आहेत त्यातल्या त्यात दहीहंडी ही देखील त्यांची एक लीला आहे. दही लोणी चोरण्याच्या कृष्णाच्या अनेक कथा मिळतात. श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. यासाठी ते आपल्या मित्रांसोबत आजूबाजूच्या गवळणींच्या घरीही दही लोणी चोरी करत असत. (Top Marathi News)
गोपाळकाला म्हणजे पांढर्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा मेळ. काल्यातील प्रमुख घटक म्हणजे पोहे, दही, दूध, ताक आणि लोणी हे काल्यातील प्रमुख घटक. पोहे म्हणजे वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक अर्थात काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी. तर दही म्हणजे वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्या मातृभक्तीचे प्रतीक. गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक असते काल्यातील दूध. ताक हे गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक आहे. लोणी म्हणजे सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. (Latest Marathi News)
==============
हे देखील वाचा : Janmashtami : मथुरेमध्ये स्थित आहे कुब्जा मंदिर, जिथे दर्शन घेतल्याने दूर होतात त्वचाविकार
===============
मान्यता आहे की, भगवान श्रीकृष्णाने आपल्या बालस्वरूपात भगवान इंद्राच्या क्रोधापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. या घटनेनंतर गोपींनी कृष्णाची स्तुती करत दहीहंडी बांधली होती आणि तरुणांना ती फोडण्याचे आव्हान दिले. तेव्हापासून ही परंपरा हळूहळू संपूर्ण देशात पसरली आणि तो विशेष दिवस दहीहंडी उत्सव म्हणून साजरा केला जाऊ लागला. दहीहंडी फोडणे हे भगवान श्रीकृष्णावरील भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक मानले जाते. दहीहंडीचा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील मथुरा, वृंदावन आणि गोकुळ यांसारख्या ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि ठाणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics