Home » किम जोंग उन याचा वारसा कोणाकडे जाणार ?

किम जोंग उन याचा वारसा कोणाकडे जाणार ?

by Team Gajawaja
0 comment
Kim Jong Un
Share

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) याचा वारसा कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु झाली आहे.  किमची बहिण त्याचा वारसा चालवेल, असा अंदाज होता.  मात्र आता बहिणीच्या जागी किमच्या दहा वर्षाच्या मुलीचा नाव पुढे आले आहे.  हुकुमशहा किमच्या उद्दामपणाच्या बातम्या रोज येत आहेत.  किमच्या ताफ्यातील शस्त्रास्त्रांमुळे जगभर काळजी व्यक्त करण्यात येते.  अशाच या हुकुमशहाची तब्बेत बिघडल्याची बातमी आली आणि त्यासोबत किमचा वारसा त्याची मुलगी चालवणार ही सुद्धा चर्चा सुरु झाली. 

किमच्या मोठ्या मुलीचे वय 9 ते 12 वर्षाच्या दरम्यान आहे. तिचे नाव काय, तिचा वाढदिवस नेमका कधी आहे, हे सुद्धा अद्याप कोणाला माहित नाही.  मात्र किमच्या मुलीची चर्चा सुरु झाल्यावर दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थांनी तिचे नाव शोधून काढले.  किमच्या मुलीचे नाव किम जू ए आहे.  हिच किम आता उत्तर कोरियाची सर्वेसर्वो होण्याची शक्यता आहे. किमची ही मुलगी किम जू, अतिशय निरागस आहे, मात्र फोटोप्रमाणे तिचा स्वभाव आहे, की ती तिच्या वडिलांसारखी हुकूमशाही करणार का याचीही चर्चा सुरु झाली आहे.  (Kim Jong Un)

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हा दिवसेंदिवस अधिक घातक होत आहे.  आपल्या शेजारच्या दक्षिण कोरियावर किमनं नुकतेच मोठ्या प्रमाणात बॉम्ब फेकले आहेत.  तसेच अमेरिकेलाही किमनं युद्धाची धमकी दिली आहे.  हुकुमशहा किम याचा स्वभाव सनकी असल्याचे सांगितले जाते.  याच किमची तब्बेत काही दिवसापासून खराब झाल्याच्या बातम्या आहेत. 

त्यासोबत त्याचा उत्तराधिकारी कोण असेल याची चर्चा सुरु झाली.  यात पहिल्या क्रमांकावर नाव होते ते, किमची बहिण किम यो जोंग चे.  किम यो जोंग ही उत्तर कोरियातील सर्वात शक्तिमान महिला समजली जाते. स्वतः किम आपल्या बहिणीचा सल्ला घेतो आणि तो मानतोही.  बहिणीनं घेतलेल्या अनेक निर्णयांवर किम फक्त सही करतो, अशीही माहिती आहे. किमपेक्षा ही त्याची बहिण अतिशय निष्ठूर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे किमनंतर किम यो जोंग हीच उत्तर कोरियाची अध्यक्ष होईल अशी अटकळ बांधली जात होती.  मात्र किमने आपल्या मुलीची उत्तराधिकारी म्हणून निवड केल्याची माहिती पुढे आली आहे.  

हुकुमशहा किमला किती मुले आहेत, हे सुद्धा कोणाला माहित नव्हेत.  मात्र गेल्या वर्षापासून किमनं आपल्या मोठ्या मुलीला जनतेसमोर आणायला सुरुवात केली.  एका क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान किम आपली मोठी मुलगी किम जू ए सह आला होता.  यानंतर प्रत्येक सरकारी समारंभामध्ये किम आपल्या याच मुलीसह आला आहे.  या मुलीला किम सैनिकांच्या परेडमध्येही घेऊन जात आहे.  यातून किम आपल्या मुलीला उत्तराधिकारी म्हणून तयार करीत असल्याचा दावा दक्षिण कोरियानं केला आहे.  

===========

हे देखील वाचा : चमकदार त्वचेसाठी घरच्याघरी असा बनवा मटार फेसपॅक

===========

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम 2 जानेवारीला 40 वर्षाचा झाल्याचे सांगण्यात येते.  किमला मधुमेह आहे.  तसेच त्याला अन्यही शारीरिक दुखणी आहेत.  त्यासाठी किम महागड्या औषधोपचारांचा उपयोग करतो.  गेल्या वर्षी किम जवळपास तीन महिने जनतेसमोर आला नव्हता.  यावेळी किमचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या आल्या.  मात्र तीन महिन्यानंतर जनतेसमोर आलेल्या किमचे वजन बरेच कमी झाल्याचे स्पष्ट झाले.  यावरुन त्याची तब्बेत ठिक नसल्याचा अनुमान काढण्यात आला आहे.  याच गंभीर आजारामुळे किम आपला उत्तराधिकारी निवडणार आहे.   हा उत्तराधिकारी म्हणजे, त्याची दहा वर्षाची मुलगी किम जू ए असल्याचे आता स्पष्ट  झाले आहे.  (Kim Jong Un)

किम जू ए ही दहा वर्षाची आहे.  सध्या ही किम आपल्या वडिलांसोबत सर्वच कार्यक्रमात दिसत आहे.  उत्तर कोरियामधील वृत्तपत्रात आणि टिव्हीवरही किमची ही लाडकी लेकच दिसत आहे.  एवढेच नाही तर उत्तर कोरियाच्या लष्करातील जनरल आणि वरिष्ठ अधिकारी किमला उत्तराधिकारी मानू लागले आहेत.  या लहानश्या किमसमोर हे लष्करी अधिकारी वाकून नमस्कार करतात.  त्यावरुन किम जू ए  ही उत्तर कोरियाची पुढची शासक असेल, असा अंदाज दक्षिण कोरियाच्या अधिका-यांनी व्यक्त केला आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.