डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतील. त्यावेळी ट्रम्प हे 79 वर्षाचे असतील. त्यामुळे पुन्हा चार वर्षांनी होणा-या निवडणुकीमध्ये ट्रम्प उभे राहणार नाहीत. मग त्यांच्याऐवजी कोण उभं राहणार हा प्रश्न खुद्द ट्रम्प यांनाच विचारला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर X चे सीईओ एलॉन मस्क विराजमान होणार आहेत का? हा प्रश्न तमाम अमेरिकन जनतेच्या मनात आहे. (America)
सध्या एलॉन मस्क (Elon Musk) ट्रम्प यांचे खास व्यक्ती म्हणून त्यांच्या मंत्रीमंडळात आहेत. ट्रम्प यांच्या विजयात एलॉन मस्क यांचे स्थान महत्त्वाचे आहे. मस्क यांनी करोडो रुपये ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार अभियनात खर्च केले आहेत. कमला हॅरिस यांच्याविरोधात उभे असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना मस्क यांनी मोठा आधार दिला. मस्क यांनी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेची जबाबदारी घेतली आणि एखादी जादूची कांडी फिरावी असा विजय ट्रम्प यांचा झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनीही आपल्या विजयामध्ये एलॉन मस्क यांचा मोठा हातभार असून त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले होते. (International News)
याशिवाय आपल्या सरकारमध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली. हे सर्व होत असतांना अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्यानंतर एलॉन मस्कच राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. अनेक सोशल मिडिया माध्यमातून मस्क यांचा भावी राष्ट्रध्यक्ष म्हणून उल्लेख कऱण्यात येत आहे. आता हा प्रश्न थेट डोनाल्ड ट्रम्प यांनाच विचारण्यात आला. मात्र त्यावर ट्रम्प यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून एलॉन मस्क यांचा विचार होणार का? हा प्रश्न भर कार्यक्रमात खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनाच विचारण्यात आला. जाहीर कार्यक्रमात विचारलेल्या या प्रश्नानं एक क्षण ट्रम्प गडबडले. मात्र त्यांनी स्वतःला सांभाळत या प्रश्नाचे मजेशीर आणि मुद्देसूद उत्तर दिले. (America)
फिनिक्स, ऍरिझोना येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांना हा प्रश्न विचारला गेला. तेव्हा ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांची तोंडभरुन स्तुती केली. टेस्लाचे मालक, , सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा अब्जाधीश, एलोन मस्क हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. पण ते कधीही राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाहीत, हे सांगून ट्रम्प यांनी उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याला कारण म्हणजे, अमेरिकेची राज्यघटना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मस्क हे खूप हुशार आहेत आणि विश्वासूही आहेत. पण ते अमेरिकेच्या अध्यक्षपदावर बसू शकत नाहीत किंवा भविष्यात निवडणूकही लढवू शकणार नाहीत, असे ट्रम्प यांनी सांगितले. कारण एलॉन मस्क यांचा जन्म अमेरिकेत झाला नाही. अमेरिकन राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हा जन्मतःच नागरिक असणे आवश्यक आहे आणि एलॉन मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. हे सांगताना ट्रम्प यांनी आपल्यालाही खेद वाटत असल्याची भावमुद्रा व्यक्त केली. (International News)
एलॉन मस्क यांनी सर्वांर्थानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीची जबाबदारी पार पाडली आहे. मस्कनी ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी 238.5 दशलक्ष डॉलर्स खर्च केले आहेत. आत्तापर्यंत अमेरिकन निवडणुकीत सर्वात जास्त रक्कम देणारे देणगीदार म्हणून एलॉन मस्क यांची नोंद झाली आहे. ट्रम्प यांनी मस्क यांना त्यांच्या मंत्रीमंडळात स्थान दिले आहे. मस्क यांनी अमेरिकन (America) सरकारमधील कर्मचा-यांबाबत कॉस्ट कटिंग आणि रेग्युलेशनची कल्पना मांडली होती. ती कल्पना स्विकारत ट्रम्प यांनी त्याची जबाबदारी मस्क यांच्यावरच सोपवली आहे. यासाठी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी नावाची तात्पुरती एजन्सी स्थापन करण्यात आली आहे. या एजन्सीचे नेतृत्व एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी करणार आहेत. (America)
=======
हे देखील वाचा : Kashmir : काश्मीरच्या थंडीत कांगरीची गर्मी !
Coconut Oil : आणि खोबरेल तेलाचे कोडे सुटले !
=======
नुकतेच जेव्हा अमेरिकेतील सरकारी कर्मचा-यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हा खर्चाचे विधेयक आणले गेले तेव्हा ट्रम्प यांच्यासह एलॉन मस्क यांनी रिपब्लिकन खासदारांवर त्या विधेयकाला पाठिंबा देऊ नये म्हणून खूप दबाव आणला होता. त्यामुळे अमेरिकेत शटडाऊनची परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती एवढी कठीण होती की, सध्याचे अध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) हे आपली ख्रिसमस सुट्टी अर्धवट टाकून व्हाईट हाऊसवर परतले होते. या घटनेनं एलॉन मस्क यांच्यावर टिका करण्यात आली. अमेरिकेची प्रतिमा या शटडाऊनमळे जगात काळवंडली गेली, असा आरोप ठेवण्यात आला. निवडून न आलेल्या नागरिकाला सरकारमध्ये इतके अधिकार कसे असा प्रश्न विचारत एलॉन मस्क यांना उपरोधीकपणे प्रेसिडंड ऑफ फ्यूचर अशी उपाधीही दिली. याच सर्वांचे पडसाद ट्रम्प यांच्या पक्षाच्या कार्यक्रमातही उमटले. मात्र ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राज्य़घटनेतील तरतूद सांगत प्रश्नकर्त्यांना समर्पक असे उत्तर दिले. (International News)
सई बने