भारतावर सतत या ना त्या कारणाने कुरघोडी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ५ नोव्हेंबरच दिवस खूपच खास ठरला आहे. कारण नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील महापौर पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांमध्ये भारतीय वंशाचे जोरहान ममदानी यांनी दणदणीत विजय मिळवला असून, ते न्यूयॉर्कचे महापौर बनले आहेत. भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक उमेदवार जोहरान ममदानी यांनी न्यू यॉर्क शहराच्या मेयरच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर संपूर्ण जगभर त्यांच्या विजयाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. (zohran mamdani)
जोहरान ममदानी हे न्यू यॉर्कचे पहिले मुस्लिम मेयर झाले आहेत. ममदानी यांना सतत विरोध करणाऱ्या आणि त्यांच्यावर टीका करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जर ममदानी जिंकले तर न्यू यॉर्कला निधी देणे बंद करण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली होती. तरी देखील लोकांनी या धमकीला न जुमानता जोहरान ममदानी यांनाच आपली पसंती देत त्यांना आपला महापौर बनवले आहे. (Marathi News)
बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये, ममदानी यांनी त्यांच्या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत हा अभूतपूर्व मोठा विजय मिळवला. जोहरान ममदानी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले न्यू यॉर्कचे माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन उमेदवार कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला. यापूर्वी, विद्यमान मेयर एरिक अॅडम्स यांनी सप्टेंबरमध्ये निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतली होती. (Top Marathi Headline)
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रूथ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ममदानी यांना विरोध करताना मतदारांना म्हटले होते की, जर ते निवडून आले तर न्यूयॉर्क शहराला ‘आर्थिक आणि सामाजिक आपत्ती क्षेत्र म्हणून जाहीर केले जाईल, अशी थेट धमकी दिली होती. एवढेच नाही तर ट्रम्प यांनी ममदानी यांना ‘डावे’ उमेदवार म्हणून संबोधत माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांना आपला पाठिंबा दिला होता. मात्र, या प्रचंड राजकीय विरोधाला न जुमानता, न्यूयॉर्कच्या मतदारांनी ममदानी यांच्या बाजूचे आपला कौल दिला, ज्यामुळे ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. (Todays Marathi Headline)

कोण आहेत जोहरान ममदानी?
ममदानी यांचा जन्म युगांडाच्या कंपालामध्ये झाला. वयाच्या सातव्या वर्षी ते न्यूयॉर्कमध्ये स्थलांतरित झाले. पुढे त्यांना न्यूयॉर्कचे नागरिकत्व मिळाले. ममदानी यांनी त्यांच्या कॉलेजच्या पॅलस्टाईनमधील स्टुडंट्स फॉर या संस्थेची स्थापना केली आहे. यातूनच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते न्ययूॉर्क शहरातील माजी महापौर ॲंड्र्यू कुओमा यांच्याविरोधात महापौर पदाच्या निवडणूकीसाठी उभे होते. न्ययूॉर्कमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी अलेक्झांड्रिया ओकासिओ-कार्टेझ यांचा पाठिंबा त्यांना मिळाला होता. ममदानी हे न्यूयॉर्कचे पहिले दक्षिण आशियाई आणि पहिले मुस्लीम महापौर बनले आहेत. (Latest Marathi News)
जोहरान ममदानी यांचे भारताशी असलेले नाते खूप खास आहे. त्यांची आई मीरा नायर या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आहेत. तर वडील महमूद ममदानी हे युगांडातील प्रसिद्ध लेखक आणि भारतीय वंशाचे मार्क्सवादी विद्वान आहेत. जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कमध्ये बँक स्ट्रीट स्कूल फॉर चिल्ड्रेन आणि ब्रॉन्क्स हाय स्कूल ऑफ सायन्स येथे शिक्षण घेतले. २०१४ मध्ये त्यांनी बॉडोइन कॉलेजमधून आफ्रिकाना स्टडीजमध्ये पदवी प्राप्त केली. याच कॉलेजमध्ये त्यांनी ‘पॅलेस्टाईनमधील न्यायासाठी विद्यार्थी’ (या संघटनेची सह-स्थापना केली. (Top Marathi News)
ममदानी यांनी आपल्या उमेदवारीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला, ज्यामुळे ते पक्षात लोकप्रिय झाले. मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षात वैचारिक मतभेद निर्माण झाले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यूयॉर्कच्या राजकारणात लक्ष घालत, ममदानी यांच्यावर ‘कम्युनिस्ट’ असा खोटा शिक्का मारून त्यांचा विरोध केला. या ३४ वर्षीय ममदानी यांचा प्रचार मोहिमेचा मुख्य भर न्यूयॉर्क शहर अधिक परवडणारे बनवण्यावर होता. त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित केल्या, ज्यामुळे ते सामान्य जनतेचे आवडते उमेदवार बनले. (Latest Marathi Headline)
यासोबतच, ममदानी यांनी २०३० पर्यंत किमान वेतन $३० प्रति तास वाढवण्यास पाठिंबा दिला. हा निधी अब्जाधीश आणि कॉर्पोरेशन्सवर अधिक कर लावून जमा करण्याची त्यांची योजना होती. त्यांनी पोलिस संसाधने सामुदायिक सेवांकडे वळवण्याची तसेच सार्वजनिक वाहतूक आणि सायकलसाठी पायाभूत सुविधा वाढवण्याची मागणी देखील केली होती. जोहरान यांची आई मीरा नायर या सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आहेत. मीरा नायर यांचा जन्म १९५७ मध्ये राउरकेला येथे झाला होता. ‘सलाम बॉम्बे!’, ‘मिसीसीपी मसाला’, ‘मॉनसून वेडिंग’ आणि ‘द नेम्सकेक’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्या ओळखल्या जातात. (Top Trending News)
=======
True Crime Story : फक्त ८ मिनिटांत त्यांनी ८२० कोटी चोरले…तेही दिवसाढवळ्या!
=======
तर ममदानी यांचे वडील महमूद ममदानी यांचा जन्म १९४६ मध्ये मुंबईत झाला आणि ते आफ्रिकेतील वसाहतवाद आणि राजकीय हिंसेविरोधातील प्रतिष्ठित विद्वान म्हणून ओळखले जातात. ते सध्या कोलंबिया विद्यापीठात ‘गव्हर्नमेंट आणि अँथ्रोपोलॉजी’ चे प्राध्यापक आहेत. राजकारणात येण्यापूर्वी, ममदानी यांनी हाऊसिंग काऊन्सिलर म्हणून काम केले, जिथे त्यांनी कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना घरे आणि बेघर होण्यापासून वाचवण्यासाठी मदत केली. या अनुभवातूनच त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. ते न्यूयॉर्क राज्य असेंब्लीचे सदस्य आणि डेमोक्रेटिक सोशलिस्ट आहेत. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
